Home » जगातील सर्वाधिक लहान Skin Cancer

जगातील सर्वाधिक लहान Skin Cancer

by Team Gajawaja
0 comment
World Smallest Skin Cancer
Share

शरिराच्या कोणत्याही भागावर आलेला डाग हा कॅन्सर संबंधित असू शकतो. अशातच अमेरिकेतील एका महिलेला सर्वाधिक लहान कॅन्सर झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. क्रिस्टी स्टाट्स हिचे असे म्हणणे आहे, तिच्या डोळ्याखाली दीर्घकाळापासून एक लाल रंगाची डाग आला होता. परंतु त्वचा रोग तज्ञांनी तो केवळ एक डागच आहे त्यामुळे नो टेंन्सन असे म्हटले होते. परंतु कालांतराने त्याचा आकार वाढत गेला. तेव्हा दुसऱ्या तज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. (World Smallest Skin Cancer)

डोळ्याखालील डागाच्या तपासणीसाठी ती ऑरेगॉन हेल्थ अॅन्ड युनिव्हर्सिटीच्या असिस्टेंट प्रोफेसर डॉ. अलेक्झेंडर विटकोव्स्की यांना भेटली. त्यांनी त्या डागाचा फोटो काढला आणि तो नक्की कसला आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. पुष्टी करण्यासाठी रेफ्लेक्टेंस कॉन्फोकल माइक्रोस्कोपी तपासणी केली. चाचणीत असे कळले की, त्यामध्ये अशा काही कोशिका आहेत ज्या स्किन कॅन्सरचा एक प्रकार आहेत. या कॅन्सरचा शोध घेणारे विटोकोव्स्कि यांनी असे म्हटले की सुरुवातीला याबद्दल कळल्याने उपचार करणे सोप्पे झाले.

याचा आकार केवळ ०.६५ मिलीमीटर होता. जो स्पष्टपणे डोळ्यांना दिसून येत होता. तपासात असे कळले की,त्या कोशिका म्हणजेच मेलानोमा आहे तो स्किन कॅन्सरचे सर्वाधिक वाईट रुप आहे. त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सन्मानित करण्यात आले. गिनीज बुकमध्ये याला जगातील सर्वाधिक लहान स्किन कॅन्सर म्हणून सहभागी करुन घेण्यात आले.

झिरो स्टेजचा अर्थ काय?
टीम म्हणते की मेलेनोमा त्याच्या झिरो स्टेजवर होती. याचा अर्थ असा की, कर्करोग त्वचेच्या सर्वात वरच्या थरात होता, ज्याला एपिडर्मिस म्हणतात. शस्त्रक्रियेच्या साहाय्याने त्यावर उपचार केले जाऊ शकतात आणि कर्करोगाच्या पेशी काढून टाकल्या जाऊ शकतात.

डॉक्टर अलेक्झांडर सांगतात, हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात कळला, तर उपचार करणे सोप्पे जाते. विशेषत: कर्करोगासारख्या प्रकरणांमध्ये कारण असे केल्याने आपण त्याचा संपूर्ण शरीरात प्रसार होण्यापासून थांबवतो. (World Smallest Skin Cancer)

यामधून शिकण्याची गरज
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, त्वचेवर डाग असल्यास, लाल रंगाची खूण असल्यास, फुगवटा असल्यास किंवा तीळ त्याचा आकार बदलत असल्यास किंवा रक्तस्त्राव होत असल्यास सतर्क राहण्याची गरज आहे. हे मेलेनोमाचे लक्षण असू शकते. त्याकडे दुर्लक्ष करू नका.

हेही वाचा- उन्हाळ्यात थंड पाणी पित असाल तर थांबा, आधी हे वाचा

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, दरवर्षी अमेरिकेत १७ हजार आणि ब्रिटनमध्ये १ लाख लोकांना मेलेनोमाचा सामना करावा लागतो. दरवर्षी या त्वचेच्या कर्करोगामुळे अमेरिकेत २३०० आणि ब्रिटनमध्ये ८ हजार मृत्यू होतात. याचे थेट कारण सूर्याच्या अतिनील किरणांना कारणीभूत ठरले आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.