Home » जगातील सर्वाधिक लहान फोन, डिझाइनही आहे हटके

जगातील सर्वाधिक लहान फोन, डिझाइनही आहे हटके

by Team Gajawaja
0 comment
World smallest phone
Share

आजकाल मोबाईल फोनच्या स्क्रिन मोठ्या आकाराच्या येतात. यामुळेच फोन ही दिसाना मोठा दिसतो. बहुतांश फोनची लांबी ही ६ इंचापेक्षा अधिक झाली आहे. अशातच काही वेळेस फोन आपल्या सोबत हातात ठेवणे किंवा पॅन्टच्या खिशात ठेवणे कठीण होते. त्यामुळे काहींना लहान फोन वापरणे सोईस्कर वाटते. बाजारात सध्या आकाराने लहान असलेले ही फोन उपलब्ध आहेत. पण जगातील सर्वाधिक लहान फोनचा आकार हा काडेपेटीच्या बॉक्स ऐवढा असून ते भारतात तुम्हाला खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त जगातील सर्वाधिक लहान फोनचे डिझाइन ही अत्यंत युनिक आहे. (World smallest phone)

IKALL K91 हा फोन तुमच्या कानात फिट बसू शकतो. या फोनमध्ये तुम्हाला ०.८७ इंचाचा डिस्प्ले दिला जातो. फोनमध्ये सिंगल सिमचा सपोर्ट ही दिला गेला आहे. फोनची बॅटरी ही 5000mAh दिली गेली आहे. ऐवढेच नव्हे तर यामध्ये ब्लू टूथ डायरलही दिला गेला आहे. हा फोन तुम्ही अॅमझॉनवरुन खरेदी करु शकता.

World smallest phone
World smallest phone

तर Zanco T1 हा सुद्धा जगातील सर्वाधिक लहान मोबाईल आहे. हा फोन ऐवढा लहान आहे की, तुमच्या हातावर माचिस बॉक्स प्रमाणे वाटतो. याचा डिस्प्ले केवळ अर्धा इंच असून यामध्ये 32X64 पिक्सलची स्क्रिन दिली गेली आहे. या मोबाईलची लांबी ५ सेंटीमीटर पेक्षा ही कमी आहे. तसेच फोनमध्ये ३२ एमबीचे रॅम आणि ३२ जीबीचा इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे.

Mony Mint हा फोन क्रेडिट कार्ड समान आहे. यामध्ये ४जी कनेक्टिव्हिटी आहे. तसेच फोनचा डिस्प्ले ३ इंचाचा असून 1250mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोनमध्ये ३जीबी रॅम आणि ६ जीबीचा इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. फोनची निर्मिती चाइनीज कंपनी मॉनीने लॉन्च केला आहे. तसेच यामध्ये ५ इंचाचा रियर कॅमेरा आणि २ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. (World smallest phone)

हे देखील वाचा- WhatsApp बनलाय स्पॅमिंगचा अड्डा, ९५ टक्के युजर्सला येतात असे मेसेज

या व्यतिरिक्त जगातील सर्वाधिक लहान चार्जर सुद्धा आहे. जो सिडनी मधील कंज्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रांन्ड चार्जेजॅप यांनी असा चार्जर तयार केला आहे की, जो इअरबड्स ते लॅपटॉप ही चार्ज करणार आहे. या कंपनीने त्याला Zeus असे नाव दिले आहे. हा एक 270W GaN चार्जर आहे. जो च्युइंग गम बॉक्सच्या आकाराचा येतो.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.