Home » Science Day : जाणून घ्या आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक विज्ञानदिनाबद्दल

Science Day : जाणून घ्या आज साजऱ्या होत असलेल्या जागतिक विज्ञानदिनाबद्दल

by Jyotsna Kulkarni
0 comment
Science Day
Share

आजच्या काळात विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा मोठा भाग आहे. आजच्या आधुनिक काळात तर आपण सर्वच या ना त्या प्रकारे विज्ञानावर अवलंबून आहोत. आपला स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि पर्यायाने देशाचा विकास देखील याच विज्ञानावर आधारित आहे. म्हणूनच आपल्या देशात विज्ञानाचे महत्त्व ओळखून शाळेपासूनच विज्ञान शिकवले जाते. संपूर्ण जग याच विज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे या विज्ञानाचे महत्त्व सर्व लोकांना येणाऱ्या पिढीला कळावे यासाठीच १० नोव्हेंबर हा दिवस जागतिक विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. याशिवाय ‘शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन’ दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येतो. (Marathi)

यंदा २०२५ चा जागतिक विज्ञान उत्सव हा समरकंद, उझबेकिस्तान येथे युनेस्को जनरल कॉन्फरन्सच्या ४३ व्या अधिवेशनात साजरा केला जाणार आहे. विज्ञानाच्या समाजातील महत्त्वाच्या भूमिकेबद्दल आणि उदयोन्मुख वैज्ञानिक मुद्द्यांबाबत लोकांना गुंतवून घेण्याच्या गरजेवर प्रकाश टाकण्यासाठी सदर दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी आपण २५ वा जागतिक विज्ञान दिन साजरा करत आहोत. या दिनानिमित्त प्रत्येक वर्षी ठराविक थीम ठरवली जाते, जी त्या वर्षीच्या विज्ञान दिनाच्या मुख्य मुद्द्याला केंद्रस्थानी ठेवते. २०२५ ची जागतिक विज्ञान दिनाची थीम ही यंदा विश्वास, परिवर्तन यांवर आधारित २०५० साठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत जनजागृती निर्माण करणे अशी आहे. (Todays Marathi Headline)

Science Day

जागतिक विज्ञान दिनाच्या दिवशी आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मोठ्या उत्साहात उपक्रम राबवले जातात. २००१ मध्ये UNESCO ने हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २००२ मध्ये प्रथमच तो साजरा करण्यात आला. संपूर्ण जगामध्ये, सामान्य लोकांमध्ये विज्ञानबद्दल जागृती वाढावी आणि शांततेसाठी विज्ञानाचा वापर केला जावा यासाठी प्रकर्षाने विज्ञान दिन साजरा केला जातो. विविध देशांमध्ये वैज्ञानिक संशोधानांची देवाणघेवाण करणे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान समित्यांची अथवा व्यासपीठांची स्थापना करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे. तसेच, जगभरातून येणाऱ्या समस्यांकडे वैज्ञानिक जगताचे लक्ष वेधने हे देखील हा दिवस साजरा करण्यामागे उद्देश आहेत. (Top Marathi News)

युनेस्को आणि इंटरनॅशनल कौन्सिल फॉर सायन्स यांनी १९९९ मध्ये जागतिक विज्ञान परिषद भरवली होती. हा कार्यक्रम बुडापेस्ट येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात जागतिक पातळीवर प्रत्येक वर्षी विज्ञानाचा आणि शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा वापर, उद्दिष्टांची पूर्तता आणि त्यांची वचनबद्धता निश्चित केली जायची. याच कार्यक्रमात, इथिओपिया आणि मलावी येथील शिष्टमंडळांनी ब्रिटीश असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्सच्या सहकार्याने जागतिक विज्ञान दिनाचा सर्वांसमोर ठेवला. यानंतर सर्वांचे एकमत झाल्यावर ऑक्टोबर २००० मध्ये सर्वसाधारण परिषदेच्या १६२ व्या सत्रात या दिवसाला मान्यता देण्यात आली. (Latest Marathi Headline)

विज्ञानाला अधिक समाजाभिमुख करण्यासाठी जागतिक विज्ञान दिवस सामान्य माणसाला वैज्ञानिक शोधांबद्दल जागृत करते. सामान्यांना वैज्ञानिक शोधांची माहिती मिळावी त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात कसा करता येईल याबद्दल अधिक माहिती या दिवशी दिली जाते. शाश्वत विकास आणि पृथ्वीवरील सजीवसृष्टी अधिक समजून घेण्याचा प्रयत्न याद्वारे केला जातो. या दिवशी जगभरात विविध चर्चासत्रे, परिषद, प्रदर्शने, अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Top trending News)

=======

Thailand : मिस युनिव्हर्सपूर्वीच मिस मेक्सिकोचा स्वतंत्र बाणा !

=======

भारतामध्ये २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा होते. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतातील महान वैज्ञानिक चंद्रशेखर व्यंकट रमण (सी.व्ही. रमण) यांनी ‘रमण प्रभाव’चा शोध लावला होता. हा शोध भौतिकशास्त्रामधील एक महत्वाचा घटक आहे. या शोधासाठी डॉ. रमण यांना १९३० साली जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक मिळाले होते. भारताला विज्ञान विभागात मिळालेले हे पहिले नोबेल होते. म्हणून दरवर्षी या दिवशी संपूर्ण देशभर विज्ञान दिवस साजरा केला जातो. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.