सर्वसामान्यपणे अशी धारणा असते की, एकाच वेळी ३ पेक्षा अधिक मुलांचा जन्म झाल्यास तर त्यांची जिवीत राहण्याची शक्यता फार कमी असते. अशातच एका महिलेने आपल्या गर्भातून ९ मुलांना जन्म दिला. परंतु १९ महिने सातत्याने उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. मुलांवर उपचार मोरक्को मधील एका रुग्णालयात झाले. माली मधील एका महिलेने एकाच महिन्यात ९ मुलांना जन्म दिला. आश्चर्याची गोष्ट अशी की, सर्व ९ मुले ही जीवंत राहिली आहेत.(World Record Nonuplets)
माली मध्ये हलीमा सीसे नावाच्या एका महिलेने वयाच्या २५ व्या वर्षात ९ मुलांना जन्म दिला आहे. अल्ट्रासाउंड मध्ये जेव्हा ही गोष्ट समोर आली तेव्हा असे कळले की, हलीमा हिच्या पोटात ७ पेक्षा अधिक मुलं आहेत. त्यामुळे डिलिव्हरी करताना काही समस्या येऊ शकतात असा अंदाज बांधला गेला. त्यामुळे तिला २०२१ मध्ये मोरक्कोत पाठवण्यात आले. मुलांना कैसाब्लांकामध्ये मेडिकल सपोर्टवर ठेवण्यात आले होते. आता सर्व मुलं अगदी स्वस्थ असून आपल्या आईजवळच राहतात.
मुलं घरी आल्यानंतर वडिलांनी दिली अशी रिअॅक्शन
मालीची राजधानी बामको मध्ये परतल्यानंतर मुलांचा बाब अब्देल कादेर अर्बीने सरकारचे आभार मानले. त्याने असे म्हटले की, माझ्या परिवाराची आर्थिक मदत केली. त्यांने असे ही म्हटले की, अल्लाहने त्यांना आशीर्वाद दिला आहे. तो त्यांना अगदी व्यवस्थितीत सांभाळणार असल्याचे ही त्याने म्हटले. मालीचे आरोग्यमंत्री डायमिनतौ सांगरा यांनी असे म्हटले की, सरकारकडून परिवाराला नेहमीच पाठिंबा असणार आहे.
C सेक्शनच्या माध्यमातून जन्मली मुलं
९ मुलांमध्ये ५ मुली आणि ४ मुलगे आहेत. सर्वांचा जन्म सिजेरियन सेक्शनच्या माध्यमातून झाला होता. बीबीसीच्या एका रिपोर्ट्नुसार, मुलींची नावे कादिदिया, फतिमा, हवा, अदामा आणि ओउमौ आहे. मुलांचे नाव मोहम्मद, उमर, एल्हादजी आणि बाह आहे. जन्माच्या वेळी मुलांचे वजन ५०० ग्रॅम ते १ किलोग्रॅम दरम्यान होते.(World Record Nonuplets)
हे देखील वाचा- २०२३ मध्ये लॅबमध्ये जन्म घेतील मुलं तर जगात लाखो जणांचा होणार मृत्यू, बाबा वेंगांची भविष्यवाणी
…तर मुलांना जीवंत वाचवणे होते मुश्किल
जर मुलांना स्पेशल ट्रीटमेंट दिली नसती तर त्यांच्या आरोग्यासंबंधित समस्या वाढल्या असत्या. हेच कारण आहे की, त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आले. पहिल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात ठेवले. त्यानंतर एका अपार्टमेंट मध्ये नेण्यात आले जेथे एन बोरजा क्लिनिक मधून २४ तास त्यांची काळजी घेतली जायची.