Home » World Music Day : माणसाला चहुबाजुंनी समृद्ध करणारे संगीत

World Music Day : माणसाला चहुबाजुंनी समृद्ध करणारे संगीत

by Jyotsna Kulkarni
0 comment
World Music Day
Share

संगीताशिवाय आपण आपल्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही. संगीत म्हणजे केवळ चित्रपटातील गाणी नाही. आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील संगीत असते. आपण करत असलेल्या कामात देखील संगीत असते. किचनमध्ये काम करताना येणारे विविध आवाज, पक्ष्यांचे आवाज, वस्तूंचे आवाज आदी सर्वच गोष्टींमध्ये असणारा आवाज हा एक प्रकारचे संगीतच आहे. या संगीताशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. असे हे संगीत आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. संगीताचे महत्व लक्षात घेऊन आज अनेक ठिकाणी ‘म्युझिक थेरपी’ वापरून उपचार केले जात आहेत. (World Music Day)

संगीत केवळ आपल्याला आनंदच देत नाही तर आपल्या अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांवर देखील उत्तम औषध आहे. संगीत माणसाला समृद्ध करते. अशा या संगीताचे मनुष्याच्या आयुष्यातील स्थान फार उंच आणि महत्वाचे आहे. ही गोष्ट लक्षात घेत २१ जून रोजी जागतिक पातळीवर जागतिक संगीत दिन साजरा केला जातो. हा दिवस संगीतप्रेमींसाठी मोठा उत्सव आहे. यानिमित्ताने वेगवेगळ्या देशांमध्ये संगीतमय कार्यक्रम, परफॉर्मन्स, स्ट्रीट कॉन्सर्ट्स आणि ओपन माइकचे आयोजन केले जाते. (Marathi News)

‘जागतिक संगीत दिन’ जगातील ३२ हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे सादर केले जातात. भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, अमेरिका, जपान, चीन, ब्राझील, मेक्सिको, अर्जेंटिना, ब्रिटेन, लक्जमबर्ग, जर्मनी, चीन, लेबनॉन, कोस्टा रिका या देशांमध्ये देखील हा दिन साजरा केला जाते. या देशांतील संगीतकार या दिवशी ते वादन, गायन करून सुंदर परफॉर्मन्स देतात. आणि संगीताप्रती आपले प्रेम व्यक्त करतात. (Todays Marathi Headline)

World Music Day

जागतिक संगीत दिनाचा इतिहास
जागतिक संगीत दिन पहिल्यांदा फ्रान्समध्ये २१ जून १९८२ रोजी साजरा करण्यात आला. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री मॉरिस फ्ल्युरेट यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, जो १९८१ मध्ये स्वीकारण्यात आला होता. यानंतर, फ्रान्सचे पुढील सांस्कृतिक मंत्री, जॅक लँग यांनी १९८२ मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर २१ जून १९८२ रोजी पहिल्यांदा ‘जागतिक संगीत दिवस’ साजरा करण्यात आला. या दिवसाला Fête de la Musique म्हणजेच संगीत महोत्सव असेही म्हणतात. २१ जून ही तारीख निवडण्यामागे देखील एक महत्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. २१ जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या निमित्ताने संगीतप्रेमी पुन्हा नव्याने संगीताशी जोडले जातील. हा विचार हळूहळू जगभर पसरला. कालांतराने हा सांगितिक दिवस फ्रान्सपुरता मर्यादित न राहता जगभर साजरा होऊ लागला. (Latest Marathi News)

या दिवशी जगभरात संगीत प्रेमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. रस्त्यांवर खुल्या जागी विविध वाद्ये वाजवत, गाणी गात परफॉर्मन्स देतात, शाळा-कॉलेजांमध्ये संगीत स्पर्धा, विविध प्रकारचे गायन-वादनाचे कार्यक्रम भरवले जातात. या सगळ्यांचा उद्देश एकच संगीतामधून प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणं. या दिवशी अनेक देशांत संगीताच्या विविध शैलींना समर्पित कार्यक्रम आयोजित करून संगीताच्या विविधतेचा सन्मान केला जातो. (Social news)

कालानुरूप जरी आज संगीताचे स्वरूप, रुपडे बदलले असले तरी या संगीताबद्दल प्रेम आणि या आवड कायम आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल काळातही संगीताची ताकद आणि लोकप्रियता कमी झालेली नाही. किंबहुना या काळात संगीत अधिकच जास्त लोकप्रिय होताना दिसत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्स, ऑनलाइन स्ट्रीमिंग अ‍ॅप्स आणि सोशल मीडियावर संगीताने मोठं स्थान मिळवले आहे. (Top Stories)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.