जगातील नकाशामध्ये अशी काही शहरं आहेत ज्यांना नियतीने कायमचे गायबच केले. दीर्घकाळ चाललेली युद्ध, भयंकर नैसर्गिक आपत्ती यामुळे नागरी संस्कृती अचानक बाहेर पडल्यामुळे काही शहरे जगाच्या नकाशावरून गायब झाली. यामधील काही शहरांच्या किस्स्यामुळे जगाच्या आठवणींमध्ये कायम जीवंत आहेत. अशातच काही शहरं अशी आहेत जी इतिहासकार, पुरातत्व शास्रज्ञांच्या नजरेत शोध म्हणून सहभागी आहेत. तर याच बद्दल आज अधिक जाणून घेऊयात. (World Map)
-पॉम्पी शहर
ईसवी सन ७९ च्या काळात रोमन शहर म्हणून ओळखले जाणारे पॉम्पी हे त्याच्या जवळ असणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे नष्ट झाले होते. शहरातील संपूर्ण लोक ही ज्वालामुखीच्या लाव्यातून आणि खडकांच्या खाली दबले गेले. त्यावेळी पॉम्पी शहराची लोकसंख्या ही २० हजार ऐवढी होती. एकेकाळी संपूर्ण रोम हे सर्वाधिक शानदार आणि सुंदर पर्यटन स्थळ होते. १७४८ मध्ये पुन्हा त्याचा शोध घेण्यात आला होता.
-ट्रॉय, जे इतिहासाने पुन्हा शोधले
ट्रॉय आधुनिक तुर्कीमध्ये आजही स्थित आहे. परंतु हे ऐतिहासिक शहर ट्रोजन वॉरमुळे नेहमीच चर्चेत राहिले होते. हे एक अत्यंत जुने शहर होते जे १८७० मध्ये हेनरिच शीलमॅनन यांनी पुन्हा खोदकाम करुन शोधून काढले. जुना ट्रॉय स्कॅमेंडर नदीच्या किनाऱ्यावर वसला होता आणि लाकडांनी घेरलेला होता. सातत्याने खोदकाम आणि वाढत्या गुन्ह्यांमुळे ट्रॉयने पर्यटकांमध्ये प्रतिमा मलील केली आहे.
-एक रहस्यमयी शहर जेड
ब्राझीलच्या घनदाट जंगलात बसलेले जेड शहर. जगातील सर्वाधिक आधुनिक वसाहतीचे शहर म्हणून ओळखले जायचे. जेड शहरात पुल, रस्ते आणि मंदिरे होती. जेडचा शोध १७५३ मध्ये एका पोर्तुगिजाने लावला आणि त्याआधी ते कधीच चर्चेत आलेले नव्हते. त्यानंतर हे शहर संशोधकांसाठी फार आकर्षकाचा विषय बनला. १९२५ मध्ये त्याचा शोध घेणारा संशोधक पर्सी फेसवेट पुन्हा कधीच परतले नाही आणि त्यानंतर काही संधोशक ही गायब झाले. दरम्यान, नुकत्याच काही वर्षांमध्ये या शहराला कुहीकुगू नावाने अॅमेझॉनच्या जंगलात पुन्हा शोधण्यात आले.(World Map)
हे देखील वाचा- ग्वालियर किल्ल्यातील खजिना, ज्याच्या आजही एका हिस्स्याचे आहे रहस्य
-एंगकोर, मंदिरांचे केंद्र
ईसवी सन ८००च्या नंतर वसलेले शहर एंगकोर कंबोडियात स्थित आहे. १४३१ मध्ये थाई सैन्याने आक्रमण केल्यानंतर ते नष्ट झाले. या शहरात अनेक बुद्धांची मंदिर होती. सन १८०० पूर्वी या शहाराचे कोणताही ठावठिकाणा नव्हता. नंतर फ्रेंच पुरातत्व संशोधकांच्या एका टीमने ते पुन्हा शोधले.
-पेट्रा, जगातील सुंदर शहर
हे जगातील सर्वाधिक सुंदर शहरांपैकी एक असल्याचे मानले जात होते. पेट्रा हे जॉर्डनच्या जवळ वसलेले खुप जुने शहर होते. जे ईसवी सन ३६३ पूर्वी झालेल्या एका भयंकर भुकंपामुळे नष्ट झाले होते. लोक येथून पलायन करत होते. त्यानंतर स्विज संशोधकांनी १८१२ मध्ये पुन्हा शोधले.