Home » ५० वर्षांपूर्वी ‘या’ दिवशी लॉन्च झाला होता जगातील पहिला व्हिडिओ गेम

५० वर्षांपूर्वी ‘या’ दिवशी लॉन्च झाला होता जगातील पहिला व्हिडिओ गेम

by Team Gajawaja
0 comment
World first video game
Share

सध्या व्हिडिओ गेम अत्यंत लोकप्रिय आहे. बहुतांश तरुण मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळताना दिसून येतात. व्हिडिओ गेमची लोकप्रियता अधिकाधिक वाढत चालली आहे. मोबाईलसाठी नवेनवे व्हिडिओ गेम हे लॉन्च केले जातात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, ५० वर्षांपूर्वी जगातील पहिला व्यावसायिक रुपात यशस्वी आणि अत्यंत प्रसिद्ध व्हिडिओ गेम ठरला होता. २९ नोव्हेंबरला 1972 रोजी पहिला यशस्वी गेम ‘पोंग’ हा लॉन्च करण्यात आला होता. तेव्हा हा पश्चिम देशांसह जगभरात ही लोकप्रिय झाला होता. (World first video game)

पोंग एक टेबल टेनिसची थीम असणारा ट्विच आर्केड स्पोर्ट्स व्हिडिओ गेम आहे. जो १९७२ मध्ये व्हिडिओ गेम बनवणारी कंपनी अटारी द्वारे बनवण्यात आला होता. हा सुरुवातीला आर्केड व्हिडिओ गेमपैकीच एक होता. हा अटारीचे सह-संस्थापनक नोलन बुशनेल द्वारे एलन अल्कोर्नचा सोपवण्यात गेलेल्या एका प्रशिक्षण अभ्यासाच्या रुपात बनवण्यात आला होता. मात्र बुशनेल आणि अटारीचे सहसंस्थापन टेड डाबनी, अल्कोर्नच्या कामामुळे हैराण होते. त्यांनी या व्हिडिओ गेमची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तो लॉन्च केला गेला.

World first video game
World first video game

पोंगने लॉन्च झाल्यानंतर केला होता धमाका
पोंग पहिलाच व्यावसायिक रुपात यशस्वी झालेला व्हिडिओ गेम होता. अटारीचे इंजिनियर एलन एल्कोर्न द्वारे डिझाइन हे हा व्हिडिओ गेम लॉन्च झाल्यानंतर धम्माल चालला होता. तो लॉन्च झाल्यानंतर लगेच काही कंपन्यांनी असे गेम बनवण्यास सुरुवात केली जे याच्या गेमप्ले सारखेच थोडेफार होते. अटारीच्या प्रतिस्पर्ध्यांनी नव्या प्रकारचे व्हिडिओ गेम आणले, जे पोंगच्या मूळ रुपापेक्षा थोडेफार वेगळे होते. अटारीने पोंगचे काही सिक्वेल ही आणले. जो नव्या सुविधांसह मूल गेमप्लेवर आधारित होते. १९७५ च्या ख्रिसमस सीजन दरम्यान, अटारीने विशेष रुपात सियर्स रिटेल स्टोरच्या माध्यमातून पोंगचे होम वर्जन लॉन्च केले. हे वर्जन अत्यंत यशस्वी सुद्धा झाले. लॉन्चिंगनंतर गेमला काही होम आणि पोर्टेबल प्लॅटफॉर्मवर बनवण्यात आले. पोंगने आपल्या सांस्कृतिक प्रभावाच्या कारणास्तव वॉशिंग्टन, डीसीमध्ये स्मिथसोनियन इंस्टिट्युशनच्या स्थायी संग्रहाचा हिस्सा आहे.(World first video game)

हे देखील वाचा- ओशनसॅट-३ व्यतिरिक्त आंतराळात काही नॅनो सॅटेलाइट्सची एन्ट्री

पोंगचे काही सिक्वल करण्यात आले होते रिलिज
त्या दरम्यान जेव्हा लोकांकडे स्मार्टफोन नव्हते तेव्हा अशा गेमची लोकप्रियता अधिक होती. याची प्रसिद्धता पाहून अटारीने तो काही प्लॅटफॉर्मवर रिमेक केला. १९७७ मध्ये पोंगचा व्हिडिओ ऑलेंम्पिकमध्ये सुद्धा दाखवण्यात आला. अटारीने पोंगचे काही सिक्वल आणि रिमेक सुद्धा लॉन्च केले होते. पोंगच्या मूळ रुपाव्यतिरिक्त पोंग डबल्स, सुपर पोंग, अल्ट्रा पोंग, पिन पोंग असे काही वर्जन रिलिज केले होते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.