Home » जगातील सर्वाधिक महागड्या शाळा, फी भरण्यातच जाईल आयुष्यभराची कमाई

जगातील सर्वाधिक महागड्या शाळा, फी भरण्यातच जाईल आयुष्यभराची कमाई

by Team Gajawaja
0 comment
World expensive school
Share

जगभरातील प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते की, आपल्या मुलांना उत्तम शाळेत शिक्षण घ्यावे. याच कारणास्तव मुलांच्या विकासासाठी शिक्षण फार महत्वाचे असते. मुलांच्या शिक्षणासाठी आई-वडिल आपली सर्व बचत खर्च करण्यास तयार असतात. अशातच मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज ही मिळते. तसेच जगातील विविध ठिकाणी शासकीय आणि खासगी शाळा असतात. पण काही खासगी शाळांची फी ऐवढी असते की, त्या शाळेत घालणे प्रत्येक पालकाला परवडत नाहीत. मात्र जगात अशा काही शाळा आहेत ज्यांची फी ऐवढी आहे की, त्याच्या मध्ये तुमच्या आयुष्यभराची कमाई निघून जाईल. तर जाणून घेऊयात जगातील टॉप महागड्या शाळांबद्दल अधिक.(World expensive school)

स्विर्त्झलँन्ड मधील कॉलेज एल्पिन ब्यू सोलेइल स्कूल जगातील सर्वाधिक महागडे आहे. येथे २६० मुलं शिक्षण घेतात. या शाळेची वार्षिक फी १,५०,००० स्विस फ्रँन्क म्हणजेच जवळजवळ १.२३ कोटी रुपये आहे. कॉलेज एल्पिन ब्यू सोलेइल मध्ये ५० विविध देशांतील मुल शिक्षण घेतात. येथे विद्यार्थी-शिक्षकांमधील रेश्यो 4:1 आहे. या स्कूलमध्ये फ्रेंच आणि इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जाते.

World expensive school
World expensive school

तसेच जगातील दुसरे महागडे स्कूल हे इंस्टिट्युट ले रोजी. ती सुद्धा स्विर्त्झलँन्ड मध्येच आहे. येथे ४२० मुलं दोन भाषांतून शिक्षण घेतात. या इंस्टिट्युटची वार्षिक फी १,२५,००० स्विस फ्रँक म्हणजेच एक कोटींहून अधिक आहे. या शाळेत आता ६५ पेक्षा अधिक देशांतील मुलं येऊन शिक्षण घेतात.

या व्यतिरिक्त ब्रिटेन मधील हर्टवुड हाउस स्कूल जगातील तिसरी महागडी शाळा आहे. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३५० आहे. प्रत्येक टर्मसाठी विद्यार्थ्यांकडून २५२८४ पाउंड म्हणजे जवळजवळ २२ लाख रुपये आहे. या शाळेत केवळ त्याच मुलांना शिक्षण दिले जाते जे इंटरव्यू क्रॅक करतात.

अमेरिकेतील थिंक ग्लोबल स्कूल जगातील सर्वाधिक महागडी शाळा आहे. ही शाळा आपल्या शिक्षण पद्धतीमुळे खुप प्रसिद्ध आहे. खरंतर ही शाळा एक ट्रॅवलिंग स्कूल आहे. अशा प्रकारे येथील ६० विद्यार्थ्यांना प्रत्येक चार देशांमध्ये राहून शिक्षण घ्यावे लागते. या शाळेची एकूण फी ९४,०५० डॉलर म्हणजे ७० लाख रुपये आहे. (World expensive school)

हे देखील वाचा- जापान मधील विचित्र परंपरा, तरुणी मागते मुलाच्या शर्टाचे दुसरे बटण

स्विर्त्झलँन्डच्या जवळील शहर लेसिन मध्ये स्थित अमेरिकन स्कूल जगातील पाचवी सर्वाधिक महागडी शाळा आहे. येथे ३४० विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेची फी १,०४,००० स्विस फ्रँन्क म्हणजे ८५ लाख रुपये आहे.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.