Home » जगातील सर्वाधिक महागडी नेल पॉलिश, किंमत ऐकून व्हाल हैराण

जगातील सर्वाधिक महागडी नेल पॉलिश, किंमत ऐकून व्हाल हैराण

by Team Gajawaja
0 comment
World Expensive nail polish
Share

प्रत्येक तरुणीला आपण सुंदर दिसावे असे नेहमीच वाटत असते. त्यामुळे आपल्या सौंदर्याबद्दलच्या विविध ट्रिटमेंटकडे त्या अधिक लक्ष देतात. यामध्ये सर्वाधिक महत्वाचे म्हणचे मेकअप. तो करताना मुली लिपस्टिक आणि नेल पॉलिशकडे जरुर लक्ष देतात. आजाकाल क्रिएटिव्ह नेल्स आणि नेल आर्टला फार महत्व दिले जाते. अशातच जगात अशी एक नेल पॉलिश आहे ज्याची किंमत ऐकून हैराण व्हाल. ऐवढेच नव्हे तर त्या किंमतीत तुम्ही घर, आलिशान गाडी अथवा सोन्या-हिऱ्याचे दागिने खरेदी कराल. (World Expensive nail polish)

आजपर्यंत आपण करोडो रुपयांच्या नेल पॉलिश बद्दल कधीच ऐकले नसेल. अधिकाधिक तर ५ हजार, १० हजार किंवा १ लाख अशा किंमती ऐकल्या असतील. पण जगातील सर्वाधिक महागडी नेल पॉलिश Azature आहे. खरंतर ती लॉस एंजेलिस डिझाइनस Azature Pogosian याने काळ्या रंगातील ही खास नेल पॉलिश तयार केली आहे. ही नेल पॉलिश नखांचे सौंदर्य वाढवतेच पण आलिशान लाइफस्टाइल तुम्ही जगत असल्याचे दर्शवते.

याच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास जवळजवळ २५०००० डॉलर म्हणजेच भारतीय बाजारात याची किंमत १ कोटी ९० लाख रुपये आहे. Azature Pogosian ला आलिशान ज्वेलरी डिझाइन करण्यासह ब्लॅक डायमंड किंगच्या नावाने ही ओळखले जाते. त्यामुळे शौक बडी चीज है असे बोलणे या नेल पॉलिशची किंमत पाहून योग्य ठरेल. तर जगातील आतापर्यंत केवळ ही नेल पॉलिस २५ लोकांनीच खरेदी केली आहे. (World Expensive nail polish)

हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक लहान फोन, डिझाइनही आहे हटके

नेल पॉलिशची खासियत
ही नेल पॉलिशचे डिझाइन करणाऱ्या डिझाइनर यांनी यामध्ये २६७ कॅरेटचे ब्लॅक डायमंड ही वापरले आहेत. हेच कारण आहे की, ही नेल पॉलिश ऐवढी महागडी आहे. दरम्यान, Azature Pogosian यांच्या नेल पॉलिश व्यतिरिक्त मार्केटमध्ये अन्य ही काही महागड्या नेल पॉलिश उपलब्ध आहेत. ज्या नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतात.

नखांची काळजी घेण्यासाठी काही ऑप्शन्स ही आहेत
जसे आपण चेहऱ्याची आणि केसांची काळजी घेतो. त्याच प्रमाणे नखांची सुद्धा काळजी घेतली जाते. त्यासाठी मार्केटमध्ये काही प्रोडक्ट्स ही येतात. जसे की, हँन्ड क्रिम, हँन्ड लोशन, मॅनिक्योर-पेडिक्योर किट ही मिळते. हातांच्या कॉस्मेटिक ट्रिटमेंटला मॅनिक्योर असे म्हटले जाते. खरंतर इंग्रजी शब्द मॅनिक्योर फ्रेंच मॅन्युकोर येथून घेतला गेला आहे. याचा अर्थ असा होतो की, हातांची काळजी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.