सध्या मशरुमची शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच्या काही जाती सुद्धा जगभरात आढळून येतात. मशरुमचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. मशरुममध्ये प्रोटीन, विटामिन सी, विटामिन बी, विटामिन डी, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फोरस, सेलेनियम आणि अँन्टीऑक्सिडेंट सारखी पोषक तत्वे असतात. जे आरोग्यासंबंधित समस्यांना दूर ठेवण्यास मदत करतात. परंतु जगात मशरुमच्या अशा काही प्रजाती आहेत त्या सर्वाधिक महागड्या आहेत. त्यांची अॅडवान्स बुकिंग ही करावी लागते आणि लाखोंचा नफा ही मिळवून देतात. तर जाणून घेऊयात याच बद्दल अधिक. (World Expensive Mushroom)
युरोपियन व्हाइट ट्रफल मशरुम
युरोपियन व्हाइट ट्रफल मशरुम हे जगातील सर्वाधिक महागडे मशरुम असल्याचे म्हटले जातात. खरंतर हे एक फंगस आहे पण ते अत्यंत दुर्लक्ष मशरुम आहे. त्याची शेती केली जात नाही तर ते जुन्या झाडांवर आपोआप येतात. आपल्या चमत्कारी गुणांमुळे त्यांची नेहमीच खुप मागणी असते. जागतिक बाजारात युरोपियन व्हाइट ट्रफल मशरुमची किंमत ७-८ लाख प्रति किलोग्रॅम असल्याची सांगितली जाते.
मात्सुताके मशरुम
जापान मधील जगाील सर्वाधिक फळ, भाजी आणि धान्य उत्पादन असलेला देश मानला जातो. येथे जगातील सर्वाधिक दुमिळ मात्सुताके मशरुम आढळतो जो आपल्या सुगंधासाठी खुप प्रसिद्ध आहे. याची चव ही स्वादिष्ट असते. तो आंतरराष्ट्रीय बाजारात ३-५ लाखापर्यंत विक्री केला जातो.

ब्लू ऑयस्टर मशरुम
आपण व्हाइट ऑयस्टर मशरुम बद्दल खुप एकतो. मात्र ब्लू ऑयस्टर मशरुम मध्ये जे प्रोटीन, कार्बोहाइड्रेट, फायबर खुप प्रमाणात असतात. सध्या भारतीय शेतकऱ्यांमध्ये ते खुप लोकप्रिय आहे. शिंपल्याच्या आकाराचा हा मशरुम बाजारात १५० ते २०० रुपये प्रति किलोच्या भावाने विक्री केला जातो.
शँटरेल मशरुम
खरंतर बहुतांश मशरुम हे जंगलाच्या ठिकाणी आढळतात आणि नैसर्गिकरित्या उगवतात. परंतु शँटरेल मशरुम हे युरोप आणि युक्रेनच्या समुद्र तटांवर आढळतात. खरंतर त्याचे विविध रंग असतात. मात्र पिवळ्या रंगाचा शँटरेल मशरुम खुप खास आहे. जो आंतरराष्ट्रीय बाजारात ३० ते ४० हजार रुपये प्रति किलोग्रॅमच्या भावाने विक्री केला जातो.(World Expensive Mushroom)
हे देखील वाचा- थंडीच्या दिवसात पेरू खाण्याचे फायदे…
ब्लॅक ट्रफल मशरुम
युरोपातील व्हाइट ट्रफल मशरुम प्रमाणेच ब्लॅक ट्रफल मशरुमला ही खुप मागणी असते. हे अत्यंत दुर्लभ मशरुम आहेत. याचा शोध घेण्यासाठी प्रशिक्षण दिल्या गेलेल्या कुत्र्यांची मदत घेतली जाते. ब्लॅक ट्रफल मशरुमची परदेशातील बाजारामंध्ये १-२ लाख रुपये प्रति किलोग्रॅमच्या भावाने विक्री केली जाते.