आपण ज्यावेळी एखादा लॅपटॉप खरेदी करतो तेव्हा त्यासोबत तो ठेवण्यासाठी बॅग ही घेतो. कारण लॅपटॉपला काही झाले तर आपलेच नुकसान होते. त्यामुळे तो काळजीपूर्वक वापरण्यासह तो व्यवस्थिती ठेवावा असे नेहमीच सांगितले जाते. मात्र जगात असा एक लॅपटॉप आहे जो लॅपटॉपच्या हँन्डबॅगेसारखा दिसतो. पण त्याची किंमत ऐकून हैराण व्हालच. कारण त्या किंमतीत तुम्ही आलिशान घर खरेदी करु शकता. या लॅपटॉपचे नाव Tulip E-Go Diamond आहे. याची किंमत ३५५,००० अमेरिकन डॉलर (२ कोटी ९५ लाख रुपये) आहे. (World Expensive Laptop)
ट्युलिप ई-गो डायमंड लॅपटॉप महिलांच्या हँन्डबागसारखा दिसतो. तो आपल्या सोबत घेऊन जाताना एखाद्या पुस्तकासारखा पकडण्याची गरज नाही. तुम्ही तो एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अगदी सहज घेऊन जाऊ शकता. हा लॅपटॉप जगातील तिसरा महागडा लॅपटॉप आहे.
अँन्टी रिफ्लेक्शन स्किन
लॅपटॉपचा लुक हा एखाद्या हँन्डबॅग अथवा पर्स सारखा आहे. लॅपटॉप मध्ये इंटीग्रेटेड वेबकॅम मिळतो. ग्राहकांना लॅपटॉपसह अँन्टी रिफ्लेक्शन स्किन मिळते. ज्यामुळे लॅपटॉपचा वापर करताना आपल्या डोळ्यांवर कोणताही प्रभाव पडत नाही. या लॅपटॉप मध्ये AMD Turion 64-बिट CPU सु्द्धा दिला आहे. लॅपटॉपमध्ये एकूण 1GB-2GB मेमोरीचे २ स्लॉट मिळतात. या व्यतिरिक्त डिवाइसमध्ये 100GB, 160GB हाय ड्राइवचा सपोर्ट ही मिळतो. (World Expensive Laptop)
३ तासांचा बॅटरी बॅकअप
लॅपटॉपमध्ये बॅटरी बॅकअप ३ तासांपेक्षा अधिक आहे. लॅपटॉप मध्ये मायक्रोसॉफ्ट विंडोजची ऑपरेटिंग सिस्टिम ही दिली गेली आहे. यामध्ये २ युएसबी, २.० पोर्ट, १ युएसबी पोर्ट आणि ब्लूटूथ २.० चा सपोर्ट मिळतो. हा लॅपटॉप २००६ मध्ये तयार करण्यात आला होता. हेच कारण आहे की, याचे फिचर आजकालच्या लॅपटॉपच्या तुलनेत अधिक दमदार नाहीत.
हे देखील वाचा- जगातील सर्वाधिक महागड्या शाळा, फी भरण्यातच जाईल आयुष्यभराची कमाई
सोन आणि हिऱ्यांचा वापर
हा लॅपटॉपम ठोस फॅलेडियम पासून तयार करण्यात आला आहे. यामध्ये सफेद सोन आणि डायमंड्सने सजवण्यात आले होते. सोने आणि डायमंड्स असल्याकारणाने या लॅपटॉपची किंमत अधिक आहे. तर ट्युलिपने या लॅपटॉपचे काही युनिट्सच तयार करण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त Bling My Thing’s Golden Age Macbook Air हा खुप मोठ नाव असलेला लॅपटॉप आहे. परंतु त्याची किंमत $26,000 म्हणजेच २१३००० रुपये आहे. हा जगातील सर्वाधिक बड्या कंप्युटर एक्सपो CeBIT मध्ये लॉन्च करण्यात आला होता. याला २४ कॅरेट सोन आणि १२ हजार स्वारोवस्की क्रिस्टलने सजवण्यात आले आहे. याचे केवळ २० युनिट्सच तयार करण्यात आले होते.