उन्हाळ्याच्या दिवसात शरिराला थंडावा मिळावा म्हणून थंड पेय किंवा आइस्क्रिम खाणे बेस्ट पर्याय मानला जातो. लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती सुद्धा आइस्क्रिम अगदी आनंदाने खातात. आइस्क्रिम उन्हाळ्याच्या दिवसातील पसंदीचे स्वीट डेसर्ट म्हणून खाल्ले तर जातेच पण याचे काही हेल्थ बेनिफिट्स सुद्धा आहेत. घरात तयार करण्यात येणाऱ्या आइस्क्रिममध्ये काही न्युट्रिएंटस असतात. जे आपल्या हेल्थसाठी अगदी फायदेशीर ठरतात. (World expensive ice cream)
बाजारात विविध प्रकारचे आइस्क्रिम मिळतात. परंतु तुम्हाला जगातील सर्वाधिक महागड्या आइस्क्रिम बद्दल माहितेय का? या आइस्क्रिमचा एक स्कुपची किंमत ही तुमच्या वार्षिक पगारापेक्षा ही अधिक आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्यामते. सेलेटो नावाचा एक जापानी ब्रँन्ड आहे. जो जगाील सर्वाधिक महागडे आइस्क्रिमची विक्री करतो. GWR च्या वेबसाइटनुसार या आइस्क्रिमच्या किंमतीत एक फॅमिली ट्रिपचा खर्च केला जाईल ऐवढी आहे.
बाकुया नावाचे आइस्क्रिम हे काही दुर्मिळ पदार्थांपासून तयार केले जाते. आइस्क्रिममध्ये गोल्ड लीफ, व्हाइट ट्रफल, पार्मिगियाने रेजिगो आणि सेक ली चा समानेश आहे. आइस्क्रिम हे ताडायोशी यामादा द्वारे तयार केली आहे. जे रिवी मध्ये हेड शेफ आहेत. शेफ यामादा पने कल्पनाशील फ्युजन पदार्थांसाठी ओळखले जातात. त्यांना खासकरुन बोलावले गेले होते.
GWR नुसार, या स्वादिष्ट आइस्क्रिमच्या एका सर्विंगची किंमत 873,400 जापानी येन म्हणजेच भारतीय चलनात ५ लाख रुपयांपेक्षा ही अधिक आहे. याच किंमतीत एखादा व्यक्ती काहीही करु शकतो.
ऐवढे महागडे आइस्क्रिमची चव कशी असेल हा प्रश्न तर साहजिकच मनात येणार. या आइस्क्रिमला व्हाइट ट्रफलचा खुप सुगंध येतो. तसेच पार्मिगियानो रेगिआनोच्या फळांची टेस्ट ही याला येते. विविध रिपोर्ट्सनुसार, आइस्क्रिम ब्रँन्ड सेलाटोच्या एका प्रतिनिधीने असे म्हटले की, त्याची टेस्ट उत्तम आहे की नाही हे पाहण्यासाठी काही परिक्षण ही केले जाते आणि त्यात काही कमतरता काढत ते बनवण्यासाठी १.५ वर्षापेक्षा अधिक काळ लागला. सर्वांच्या प्रयत्नाने तयार झालेला असा हा आइस्क्रिम गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये दाखल झाला आहे. (World expensive ice cream)
हेही वाचा- World Record : महिला शेफ सलग चक्क १०० तास जेवण बनवत राहिली…
या व्यतिरिक्त भारतातील इंदौर मधील सराफा बाजारात गोल्डमॅनची कुल्फी फार प्रसिद्ध आहे. खरंतर सोन्याची कुल्फी म्हणजेच कुल्फीवर सोन्याचा वर्ख लावून दिला जातो. ही कुल्फी खाण्यासाठी खुप गर्दी होते. या कुल्फीची किंमत ३५० रुपये आहे.