सर्वांनाच बर्गर, पिझ्झा, पॉपकॉर्न आणि आईस्क्रिम खाणे कोणाला आवडत नाही. त्याचसोबत जंक फूड ते स्ट्रीट फूड पर्यंतची क्रेज सातत्याने लोकांमध्ये वाढत चालली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत जंक फूड आता आनंदाने खाणे पसंद करतात. परंतु आज आम्ही तुम्हाला जगातील अशा काही फूड्स बद्दल सांगणार आहोत ज्यासाठी तुम्हाला लाखो रुपयांची बचत करावी लागू शकते.(World Expensive Food)
लोकांना पिझ्झा खाणे तर आवडतेच. परंतु तुम्हाला जगातील सर्वाधिक महागडा पिझ्झा खायचा असेल तर तुम्हाला न्युयॉर्कला जावे लागणार आहे. कारण येथे पिझ्झाची किंमत १.५ लाख रुपये असून त्याला जीनियस वर्ल्ड रेकॉर्ड २४ कॅरेटचे नाव दिले गेले आहे. यामध्ये सोन्याचे चिली फ्लेक्सचा वापर केला जातो.
त्या व्यतिरिक्त अमेरिकेतील शिकागोच्या बेरको रेस्टॉरंटमध्ये पॉपकॉर्न खुप छान मिळतात. त्यांची किंमत ही लाखोंच्या घरात आहे. येथे ६.५ गॅलन टीनची किंमत १,८७,८५५ रुपये आहे. या पॉपकॉर्नला २४ कॅरेटच्या सोन्याने झाकले जाते आणि यामध्ये लेजो सॉल्टचा वापर केला जातो.
जंक फूड मधील आणखी एक आवडीचा पदार्थ म्हणजे बर्गर. मात्र जर तु्म्हाला एका बर्गरची किंमत लाखो रुपये असेल तर तुम्हाला नक्कीच प्रश्न पडेल नेमकं यामध्ये असे काय असते? अशातच नेदरलँन्डच्या De Altones Vpprthuizen नावाच्या रेस्टॉरंटमध्ये द गोल्डन बॉय नावाचा बर्गर बनवला जातो. या बर्गर शेफ Robert J de Veen बनवतात. याची किंमत तर ४.५० लाख रुपये आहे. कारण त्याला गोल्डन लीव्सने सजवले जाते. (World Expensive Food)
हे देखील वाचा- जगातील ‘हे’ आहेत सर्वाधिक महागडे मशरुम, अॅडवान्स बुकिंग ही करावे लागते
तर दुबईतील स्कूपी कॅफेमध्ये ६० हजार रुपयांचे ब्लॅड डायमंड आईस्क्रिम मिळते. हे आईस्क्रिम बनवण्यासाठी ईराण येथून केसर आणि ब्लॅक ट्रफल मागवले जातात. याच्यावर ३२ कॅरेटचे गोल्ड ही लावले जाते. तसेच काळ्या रंगाचा कलिंगड हा सुद्धा जगातील सर्वाधिक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. जो जापान मध्ये उगवले जाता. ते संपूर्ण वर्षभरात एक डजनच उगवतात. परंतु त्याची किंमत १७ पाउंड म्हणजेच ४ लाख रुपये असते.
तसेच कावियार हे सुद्धा महागड्या फूड्सपैकी एक आहे. हे खरंतर कावियर माशाची अंडी असतात. कावियर लंडन मधील केवियर हाउस आणि प्रुनियर नावाच्या स्टोरमध्ये मिळतात. यांची किंमत $34,500 म्हणजेच २५ लाख प्रति किलोग्रॅम असते.