Home » हत्ती दिन साजरा करण्याची कशी झाली सुरुवात? जाणून घ्या उद्देश आणि खास गोष्टी

हत्ती दिन साजरा करण्याची कशी झाली सुरुवात? जाणून घ्या उद्देश आणि खास गोष्टी

by Team Gajawaja
0 comment
World Elephant Day
Share

World Elephant Day- हत्ती हा आपल्या पृथ्वीतलावरील बलाढ्य असा प्राणी आहे. जो एखाद्या राजाप्रमाणे दिसतो. त्यामुळे युद्ध ते मिरवणूकीत त्याची आवर्जून उपस्थिती दिसून यायची. परंतु आता सध्या मिरवणूकीसाठी हत्तींचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पण केरळात काही खास कार्यक्रमांदरम्यान, उत्सवांच्या वेळी हत्तींचा श्रृंगार केला जातो. वाइल्डलाइफ प्रोटेक्शन अॅक्ट ऑफ इंडिया, १९७२ नुसार हत्तींना सर्वोच्च दर्जा दिला गेला आहे. तर आज जागतिक हत्ती दिन साजरा केला जात असल्याने आपण या दिवसाची सुरुवात का झाली आणि त्यामागील उद्देश काय याबद्दल जाणून घेणार आहोत.

खरंतर सिम्स आणि एलिफेंटच्या इंट्रोडक्शन फाउंडेशन द्वारे २०११ मध्ये त्याची सुरुवात झाली. पण अधिकृतपणे तो १२ ऑगस्ट २०१ पासून तो साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती. प्रत्येक वर्षी १२ ऑगस्टला साजरा केला जाणारा जागतिक हत्ती दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्देष असा की, दिवसागणिक हत्तींची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचसोबत यामागील कारणं काय असू शकतात याबद्दल नागरिकांनी जागृत व्हावे, त्यांच्या संरक्षणासाठी उपाय, त्यांचे पुनर्वसन, हत्तींच्या आरोग्याची काळजी, त्यांची होणारी तस्करी अशा विविध कारणास्तव गोष्टींबद्दल सांगितले जाते.

World Elephant Day
World Elephant Day

सध्याच्या काळात होणाऱ्या हत्तींची हत्या हा एक चिंतेचा विषय बनला आहे. काही हत्तींचा मुद्दाम मारले जाते तर काहींचा अपघातात मृत्यू होतो. हत्तींच्या मृत्यूसंदर्भात केरळ सर्वाधिक बदनाम झालेले राज्य आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी केरळातील पल्लकड जिल्ह्यात मन्नारकड मध्ये स्फोटकांनी भरलेला अननस खाल्ल्याने एका गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकारावर संपूर्ण देशाने संताप व्यक्त केला होता.

हत्तीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला गेला आहे. भारतात प्रत्येक पाच वर्षात हत्तींची मोजणी केली जाते. पर्यावरण, वन आणि जलावायु परिवर्तन मंत्रालयाच्या मते वर्ष २०१७ मध्ये देशात जवळजवळ २३ राज्यांमधील आकडेवारी पाहता २३,३१२ हत्ती होते. तर २०१२ मध्ये त्यांची संख्या २९,५७६ ऐवढी होती.(World Elephant Day)

हे देखील वाचा- जागतिक जैवइंधन दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

हत्तींसंदर्भात काही खास गोष्टी
-हत्तींच्या तीन विविध प्रजाती आढळतात. त्यामध्ये अफ्रीकी सवाना हत्ती, अफ्रीकी वन हत्ती आणि आशियाई हत्ती.
-हत्ती जगात सर्वाधिक प्राण्यांमध्ये एक बलाढ्य प्राणी आहे. नर अफ्रिकन हत्तींची लांबी तीन मीटर आणि वजन ४०००-७५०० किलोग्रॅम दरम्यान असते. तर आशियाई हत्ती लहान असतात. त्यांची लांबी २.७ मीटर आणि वजन ३०००-६००० किलोग्रॅम दरम्यान असते.
-नॅशनल जिओग्राफिक किड्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, हत्ती प्रत्येक दिवशी गवत, झाडं आणि फळं खाण्यात १२-१८ तास घालवतात.
-भारतात हत्तींची सर्वाधिक संख्या ही केरळात आहे. येथे सहा हजारांच्या आसपास हत्तींची संख्या आहे.
-संपूर्ण जगात हत्तींपैकी २५ टक्के हत्ती हे अफ्रिकी देशात बोत्सवाना येथे आढळून येतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.