Home » जगातील सर्वाधिक घाणेरड्या माणसाने चक्क ६७ वर्षानंतर पहिल्यांदा अंघोळ केल्यानंतर झाला मृत्यू?

जगातील सर्वाधिक घाणेरड्या माणसाने चक्क ६७ वर्षानंतर पहिल्यांदा अंघोळ केल्यानंतर झाला मृत्यू?

by Team Gajawaja
0 comment
World Dirtiest Man
Share

बहुतांश लोकांना थंडीच्या दिवसात अंघोळ करावीशी वाटत नाही. लहान मुलांपासून ते वृद्धांनासुद्धा अंघोळ करणे हे कंटाळवाणे वाटते. पण काही लोक अशी असतात की, थंडी असो वा उन्हाळ्याचे दिवस त्यांना अंघोळ करावीशीच वाटत नाही. अशा लोकांना आपण स्वच्छ राहिले पाहिजे याच्याशी काही घेणेदेणे नसते. अशातच ईराण मधील एक व्यक्ती याच कारणास्तव खुप चर्चेत होता. कारण त्याने १-२ दिवस नव्हे तर चक्क ६७ वर्षात कधीच अंघोळ केलेली नाही. जेव्हा त्याने पहिल्यांदा अंघोळ केली त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. (World Dirtiest Man)

एनडीटीव्हीच्या एका रिपोर्ट्नुसार ईराण मधील राहणारा आमू हाजी हा संपूर्ण जगातील सर्वाधिक घाणेरडा व्यक्ती म्हणून ओळखला जायचा. आयआरएनए न्यूज एजेंसीने त्याच्या मृत्यू झाल्याची बातमी दिली. तो ९४ वर्षाचा होता. टाइम्स नाउसह अन्य काही मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने ६७ वर्षात कधीच अंघोळ केलेली नाही.

World Dirtiest Man
World Dirtiest Man

भीतीपोटी अंघोळ नाही करायचा आमू हाजी
जवळजवळ ७ दशक अंघोळ न करण्यामागे आमूला एक विचित्र भीती वाटायची. त्याला पाण्याची भीती वाटायची. अशातच त्याला असे वाटायचे की, जर त्याने चुकून अंघोळ केली तर तो आजारी पडेल. आता कळतेय की, तो जो विचार करत होता तो कदाचित बरोबर ही असेल. रिपोर्ट्सनुसार, दक्षिण प्रांत फार्सच्या डेगाह गावात त्याचा मृत्यू झाला. पण मृत्यूचे कारण अंघोळ करणे नव्हे. (World Dirtiest Man)

हे देखील वाचा- टीपू सुल्तान कोण होते? महान योद्धे की हिंदू विरोधी?

लोकांनी अंघोळ घातल्याच्या काही महिन्यानंतर झाला मृत्यू
काही महिन्यांपूर्वी लोकांनी त्याला पकडून अंघोळ घातली होती. तेव्हापासून त्याची प्रकृती बिघडू लागली होती. पहिल्यांदा अंघोळ केल्यानंतर तो आजारी पडला आणि अशातच त्याचा मृत्यू झाला. ईराणी मीडियानुसार वर्ष २०१३ मध्ये त्याच्यावर एक डॉक्युमेंट्री सुद्धा बनवण्यात आली होती. त्यात त्याच्याबद्दल अधिक माहिती दिली गेली होती. त्याला मेलेल्या जनावरांचे मांस खाणे आवडायचे आणि तो सिगरेटच्या पाईपमध्ये मेलेल्या जनावरांची शी सुखवून टाकायचा.

झोपडीत रहायचा हाजी
हाजी एका झोपडीत रहायचा. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हाजीने आपल्या शरिराला खुप वर्षांपासून पाणीच लावले नव्हते. स्थानिक लोकांच्या मते त्याने तरुण वयात खुप काही गोष्टींचा सामना केला होता. त्यानंतर त्याने असे आयुष्य जगण्या निर्णय घेतला.

वाराणसीत सुद्धा असाच एक व्यक्ती होता
वर्ष २००९ मध्ये हिंदुस्तान टाइम्सच्या एका रिपोर्ट्सनुसार, हाजी प्रमाणेच वाराणसीच्या जवळपासच्या एका गावात कैलाश कलाऊ सिंह नावाच्या व्यक्तीने ३० वर्ष अंघोळच केली नव्हती. तो प्रत्येक संध्याकाळी शेकोटी पेटवून धुम्रपान करायचा. कलाऊ एका पायावर उभा राहून शंकराची पूजा सुद्धा करायचा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.