Home » ‘ही’ लक्षणं दिसत असल्यास त्वरित करा मधुमेहाची चाचणी

‘ही’ लक्षणं दिसत असल्यास त्वरित करा मधुमेहाची चाचणी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Diabetes
Share

आज जागतिक मधुमेह दिन. डायबिटीज म्हणजेच मधुमेह हा आजार आजच्या काळात खूपच सामान्य झाला आहे. जगात या आजाराच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दुर्दैव म्हणजे डायबिटीस अर्थात मधुमेहाची जागतिक राजधानी म्हणून भारताने ओळख कमावली आहे. सगळ्यानांच माहित असलेला हा आजार दर दहा माणसांमागे ४ माणसांना होताना दिसतो. जगाच्या तुलनेने आपल्या भारत देशात मधुमेहींची संख्या खूप जास्त आहे.

मधुमेह म्हणजे नक्की काय आणि त्याची लक्षणं कोणती जाणून घेऊया. मधुमेह एक अशी समस्या आहे ज्यात रक्तामध्ये साखरेचा स्तर नियंत्रित राहत नाही. आपल्या शरीरात पेंक्रीयाझ नावाची एक ग्रंथी असते. यातून इन्सुलिन नावाचं हार्मोन तयार होत असतं. हेच इन्सुलिन आपली शरीरातील रक्तात तयार होणाऱ्या ग्लुकोज वा साखरेची मात्रा नियंत्रित ठेवण्याचे काम करते. पण शारीरिक बदलासह पेंक्रीयाझ इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि साखरेचा स्तर वाढत जातो. शेवटी तो मनुष्य मधुमेहाला बळी पडतो. या आजाराला स्लो पॉयझन देखील म्हटले जाते. या आजाराच्या बद्दल लोकांमध्ये अधिक जनजागृती केली जात आहे. यामुळे दरवर्षी 14 नोव्हेंबर रोजी World Diabetes Day 2024 साजरा केला जातो. जाणून घेऊया मधुमेहाची प्राथमिक लक्षणं कोणती आहेत ते.

वारंवार लघवी होणे
जर तुम्हाला वारंवार लघवीला होत असेल किंवा सतत तहान लागत असेल तर हे मधुमेहाचे लक्षण असून शकते. हाय ब्लड शुगर लेव्हलमुळे व्यक्तीला वारंवार लघवीला होऊ शकते. जास्त तहान लागत असल्यामुळे आपण भरपूर पाणी प्यायला लागतो. त्यामुळे आपल्याला वारंवार लघवीला होते.

जास्त थकवा येणे
अनियंत्रित डायबिटीजमुळे कोणत्याही व्यक्तीचा एनर्जी लेव्हल ढासळू लागते. त्यामुळे त्यावर इतर सर्वसामान्य व्यक्ती पेक्षा थकायला लवकर होते.

Diabetes

ब्लर व्हिजन होणे
जर तुमचे व्हिजन ब्लर झाले असेल अर्थात तुम्हाला अंधूक आणि धूसर दिसत असेल तर कदाचित हे देखील मधुमेहाचे लक्षण असू शकते. त्यामुळे या संकेताकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. जेव्हा आपली ब्लड शुगर लेव्हल प्रचंड वेगाने वाढलेली असते. डोळ्यांनी धुरकट दिसणे. तसेच काळे डाग दिसणे तसेच कधी-कधी दृष्टी अधू होण्यापर्यंत धोका असू शकतो.

प्रयत्न न करता वजन कमी होणे
जर तुमचे वजन प्रयत्न न करता देखील अचानक काही कारण न नसताना कमी होत असेल, तर या हलक्यात घेऊ नका. कारण अचानक आपले वजन कमी होणे हे देखील डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक आहे.

सतत इन्फेक्शन होणे
आपल्या रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने वारंवार आपल्या इन्फेक्शन होण्याचा देखील त्रास होतो. त्यामुळे वारंवार त्वचेचे इन्फेक्शन होणे हे देखील एक डायबिटीजच्या सुरुवातीच्या लक्षणापैकी एक आहे.खास करुन यात जेनिटल यीस्ट इन्फेक्शनचा धोका वाढत जातो.

हाता–पायांना मुंग्या येणे
ब्लड शुगर लेव्हल वाढल्याने आपल्या मज्जा संस्थेवर परिणाम होत असतो. ज्यामुळे काही वेळा हाता-पायांना सुन्नता येणे, झिणझिण्या येणे, आणि हात पाय दुखणे असा त्रास सुरु होतो.

मानेजवळ पिग्मेंटेशन
इन्सुलिन रेजिस्टेंसच्या कारणांनी मानेजवळ, काखेत आणि कंबरेवरील त्वचेवर गडद डाग पडतात.ते सर्वसाधारणपणे हायब्लड शुगरमुलळे दिसतात.

ऊर्जा कमी होणे आणि भूक अधिक लागणे
मधुमेहाच्या सुरुवातीच्या काळात अचानक मोठ्या प्रमाणावर भूक लागण्यास सुरुवात होते. तर शरीरातील उज कमी होऊ लागते. ऊर्जेच्या कमतरतेमुळे अजून एक समस्या निर्माण होते ती म्हणजे शरीर खूप थकत जाते. अति मेहनतीची कामे करणे शक्य होत नाही आणि आळस वाढत जातो.

त्वचेचा पोत बदलणे
जेव्हा मधुमेह होतो तेव्हा पायांची आणि तळव्यांची त्वचा कठीण होऊ लागते. तुम्हाला अचानक हा बदल जाणवल्यास त्वरित तपासण्या करा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.