आज ४ जानेवारी, जगभरात ‘जागतिक ब्रेल दिवस’ साजरा केला जातो. कारण हा दिवस लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. ब्रेल भाषेचा आविष्कार करणारे फ्रांसीसी शिक्षण लुई ब्रेल यांना हा दिवस समपर्मित आहे. लुई ब्रेल यांना एका अपघातात आपले डोळे गमवावे लागले. पण तरीही ब्रेल लिपीच्या माध्यमातून त्यांनी दृष्टिहीन लोकांसाठी फार मोठे कार्य केले. अशातच जाणून घेऊयात ब्रेल लिपी म्हणजे काय, या दिवसाचे महत्व आणि कोण होते लुई ब्रेल यांच्याबद्दल अधिक. (World Braille Day 2023)
जागतिक ब्रेल दिवसाचा इतिहास
संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एक प्रस्ताव पारित केला गेला. त्यामध्ये प्रत्येक वर्षी ४ जानेवारी हा ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या वाढदिवसाला जागतिक ब्रेल दिवसाच्या रुपात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी पहिल्यांदा जागतिक ब्रेल दिवस साजरा केला गेला. संयुक्त राष्ट्रातील जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रिपोर्टनुसार जगात जवळजवळ ३९ मिलियन लोक नेत्रहीन आहेत. तर जवळजवळ २५३ मिलियन लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्या डोळ्यांची समस्या आहे. अशा लोकांसाठी ब्रेल लिपी फार त्यांच्या मदतीसाठी येते.

कोण होते लुईस ब्रेल?
ब्रेल लिपिचे जनक लुई ब्रेल ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रांस मधील कुप्रे मध्ये जन्मले, मात्र लहानपणी झालेल्या एका अपघातात लुई ब्रेल यांना आपले डोळे गमवावे लागले. खरंतर त्यांच्या एका डोळ्याला चाकू लागला होता. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने हळूहळू त्यांचा दुसरा डोळा सुद्धा पूर्णपणे खराब झाला. त्यानंतर लुई ब्रेल यांना खुप समस्यांचा सामना करावा लागला. तरीही कधीच हार न मानता आणि आपल्या सारख्या लोकांची समस्या समजून घेत वयाच्या अवघ्या १५ वर्षात त्यांनी ब्रेल लिपिचा आविष्कार केला. जो आज दृष्टिहीन लोकांसाठी एक मोठे वरदान ठरले आहे.(World Braille Day 2023)
हे देखील वाचा- समाजात महिलांच्या अस्तित्वाला हक्क मिळवून देणाऱ्या ‘सावित्री बाई फुले’
ब्रेल लिपि म्हणजे काय?
ब्रेल लिपि ही अशी एक भाषा आहे ज्याचा वापर नेत्रहीन लोकांना वाचण्यासाठी, शिक्षणासाठी केला जातो. ही लिपि ते लोक स्पर्शाच्या माध्यमातून वाचतात-शिकतात. या लिपित एका कागदावर काही ठिपक्यांच्या माध्यमातून अक्षरे काढली जातात आणि त्यामधूनच त्यांना शिक्षण दिले जाते. शिक्षणासह या लिपितील पुस्तके ही लिहिली जाऊ शकतात. ज्या प्रकारे टाइपराइटरच्या माध्यमातून पुस्तके लिहिली जातात त्याच प्रमाणे ब्रेल लिपिच्या रचनेसाठी ब्रेलाइटरचा वापर केला जातो.