Home » जागतिक एड्स दिवस का साजरा केला जातो?

जागतिक एड्स दिवस का साजरा केला जातो?

by Team Gajawaja
0 comment
World AIDS Day
Share

World AIDS Day: प्रत्येक वर्षी १ डिसेंबरला जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील एचआयव्हीच्या विरोधातील लढाईत एकत्रित येण्यासाठी, एचआयव्ही पीडितांना पाठिंबा देण्यासाठी, एड्समुळे होणाऱ्या मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि एड्स प्रति समाज प्रबोधनासाठी साजरा केला जातो. वर्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या एका रिपोर्टनुसार, वर्ष २०२१ मध्ये जागतिक स्तरावर जवळजवळ ६,५०,०० लोकांचा मृत्यू एचआयव्हीच्या कारणास्तव झाला होता. तर भारत सरकारने राष्ट्रीय एड्स नियंत्रण (NACO) च्या रिपोर्ट्सनुसार २०२१ मध्ये जवळजवळ ४२ हजार लोकांचा मृत्यू एड्स संबंधित आजारांच्या कारणास्तव झाला आणि वर्षानुवर्ष हा आकडा वाढत चालला आहे. तर वर्ल्ड एड्स डे चा इतिहास काय, त्याचे महत्व याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

जागतिक एड्स दिवस इतिहास
जागतिक आरोग्य संघटनेने स्थानिक आणि राष्ट्रीय अधिकाऱ्यांना, आंतरराष्ट्रीय संघटना आमि खासगी नागरिकांमध्ये एड्स संबंधित सुचना समजून सांगण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरिता १ डिसेंबर १९९८ रोजी जागतिक एड्स दिवसाची स्थापना केली होती. वर्ष १९८८ मध्ये जेव्हा जागतिक एड्स दिवस साजरा केला गेला तेव्हा असा अनुमान लावण्यात आला की, ९० हजार ते दीड लाखांपर्यंत व्यक्ती पॉझिटिव्ह होते. या महारोगाच्या सुरुवातीनंतर जवळजवळ ८४.२ मिलियन लोक एचआयवी व्हायरसमुळे संक्रमित झाली होती. तसेच ४०.१ मिलियन लोक एचआयव्ही मुळे मृत्यू पावली. १९९६ पर्यंत डब्लूएचओने जागतिक एड्स दिवस संदर्भात वर्षभर काही कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यानंतर संयुक्त राष्ट्र एजेंसी युएनएड्सने या जबाबदारीला आपल्या हाती घेतले. एड्स संदर्भात जागृकता वाढवणे आणि जागतिक स्तरावर एड्सची माहिती एकत्रित करण्यासाठी UNAIDS ने १९९७ मध्ये जागतिक एड्स अभियानची स्थापना केली.

World AIDS Day
World AIDS Day

जागतिक एड्स दिवसाचे महत्व
हा दिवस सरकार आणि जनतेला आठवून देतो की, एचआयव्ही आता सुद्धा एक गंभीर आजार आहे. त्यामुळे लोकांमध्ये याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी, या आजाराने ग्रस्त असलेल्यांसाठी धन एकत्रित करणे आणि त्यांच्यासाठी उत्तम शैक्षिक मार्ग निर्माण करण्याची गरज आहे.(World AIDS Day)

कशा प्रकारे पसरतो एड्स?
प्रोटेक्शन शिवाय कोणत्याही व्यक्तीसोबत सेक्स केल्याने एड्स पसरण्याची संभावना सर्वाधिक असते. ऐवढेच नव्हे तर जर एकच सुई किंवा सीरिंजचा वापर एका पेक्षा अधिक वेळा केला गेल्यास यामुळे सुद्धा संक्रमण पसरु शकते. एचआयव्ही झालेल्या रुग्णाची सुई किंवा वैद्यकिय उपकरणे ही दुसऱ्या रुग्णाला वापरल्यास त्याला सुद्धा त्याचे संक्रमण होऊ शकते.

हे देखील वाचा- मधुमेह असलेल्या रुग्णांच्या ‘या’ चुकांमुळे होते रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जाते

HIV आणि AIDS मधील फरक काय?
एड्स ह्युमन इम्युनो डेफिशियेंसी व्हायरसमुळे संक्रमण होणारा रोग आहे. जर एचआयव्हीवर योग्य वेळी उपचार केला नाही तर त्यामुळे एड्स होऊ शकतो. दुसऱ्या शब्दात सांगाचे झाल्यास अक्वॉर्ड इम्युनो डिफिशियंसी सिंड्रोम (AIDS) अशा काही लक्षणांना म्हटले जाते जो ह्युमन इम्युनो डिफिशियंसी व्हायरस (HIV) च्या इन्फेक्शनमुळे होते. एचआयव्हीचा तिसरा आणि सर्वाधिक गंभीर स्टेज AIDS असे म्हटले जाते.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.