Home » वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुवावेत का?

वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुवावेत का?

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या ऋतूत थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे आवर्जून घातले जातात. जेणेकरून आपल्या शरीर उबदार राहण्यास मदत होते. पण लोकरीचे कपडे नक्की कसे धुवावेत असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो.

by Team Gajawaja
0 comment
woolen clothes washing
Share

थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या ऋतूत थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे कपडे आवर्जून घातले जातात. जेणेकरून आपल्या शरीर उबदार राहण्यास मदत होते. पण लोकरीचे कपडे नक्की कसे धुवावेत असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. काहीजण ते मशीनमध्ये धुण्याचा विचार करतात. खरंच वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतले पाहिजेत का? जाणून घेऊयात याचबद्दल अधिक. (Woolen clothes washing)

लोकरीचे कपडे नाजूक असतात आण वॉशिंग मशीनमध्ये ते धुतल्यास खराब होऊ शकतात. अथवा त्याचा रंग फिकट होऊ शकतो. लोकरीचे कपडे तुम्हाला उब देतात. मात्र धुताना ते घासले अथवा त्याच्या दोऱ्यांवर अधिक ताण आल्यास ते डॅमेज होऊ शकतात.

How to Wash Wool Jumpers in the Washing Machine

-वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतल्यास ते खराब होऊ शकतात. या व्यतिरिक्त ते आकसले जातात.
-मशीनमध्ये धुतल्यास ते डॅमेज होण्याची अधिक शक्यता असते. कारण ते खेचले गेल्यास त्याचे धागेदोरे निघू शकतात.
-वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुतल्याने त्याचा रंग फिका पडू शकतो. कारण केमिकलच्या संपर्कात आल्यास त्याचा रंग फिकट होतो.

वॉशिंग मशीनमध्ये कसे धुवावेत कपडे?
जर तुम्ही काही सावधगिरी बाळगल्यास लोकरीचे कपडे धुताना नुकसान होणार नाही. वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी पुढील टिप्स लक्षात ठेवा.
-वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुण्यासाठी वूल वॉश प्रोग्राम निवडा.
-लोकरीचे कडे दुसऱ्या कपड्यांपासून वेगळे धुवा. (Woolen clothes washing)
-लोकरीच्या कपड्यांसाठी खास प्रकारचे डिटर्जेंट वापरा, लक्षात ठेवा त्यामध्ये केमिकल नसावे.
-लोकरीचे कपडे धुण्यापूरवी त्यावर लावण्यात आलेले लेबल व्यवस्थितीत वाचून घ्या
-लोकरीच्या कपड्यांवर डाग असल्यास ते धुण्यापूर्वी त्याचे डाग काढण्याचा प्रयत्न करा.


हेही वाचा- थंडीत लोकरीच्या कपड्यांची अशी घ्या काळजी


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.