देशभरात ठिकठिकाणी थंडी सुरु झाली आहे. याच कारणास्तव देशातील काही ठिकाणी गारवा आला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण लोकरीचे कपडे घालतो. परंतु त्याची काळजी घेणे सुद्धा फार महत्त्वाचे असते. खरंतर लोकरीचे कपडे जाड आणि गरम असतात. परंतु तुम्ही सामान्य कपड्यांची तुलना लोकरीच्या कपड्यांसोबत केली तर त्याची खास काळजी घ्यावी लागते. हे कपडे व्यवस्थितीत ठेवले नाही तर ते लवकर खराब होऊ शकतात. अशातच जाणून घेऊयात थंडीत लोकरीच्या कपड्यांची काळजी कशी घ्यावी. (Woolen cloth care)
ड्राय ठिकाणी ठेवा
काही लोक अंघोळ किंवा कपडे बदलल्यानंतर लोकरीचे कपडे तसेच बाथरूममध्ये ठेवतात. यामुळे लोकरीचे कपडे लवकर खराब होऊ शकतात. अशातच असे कपडे ड्राय ठिकाणी ठेवावेत. उन्हात व्यवस्थितीत सुकवून ते कपटात ठेवावेत.
ओलाव्यापासून दूर ठेवा
थंडीचे कपडे ओलाव्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. ते कपडे कपाट, बॉक्स मध्ये ठेवण्याआधी त्याखाली न्युजपेपर जरूर ठेवा. यामुळे कपड्यांना ओलसरपणा पकडणार नाही. त्याचसोबत कपडे बॅक्टेरिया फ्री ठेवण्यासाठी तुम्ही त्यात कडुलिंबाची पाने सुद्धा ठेवू शकता.
वॉशिंग मशीनमध्ये धुवू नका
काही वेळेस घाईघाईत काही लोक लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुण्यासाठी टाकतात. यामुळे ते सैल पडतात. म्हणून वॉशिंग मशीनमध्ये लोकरीचे कपडे धुवायला टाकण्यापासून दूर रहावे. ते स्वच्छ करण्यासाठई केवळ लिक्विड डिटर्जेंट आणि सॉफ्ट ब्रशचा वापर करावा.
कपड्यांवरील टॅग वाचा
लोकरीचे कपडे जर धुवायचे असतील तर तुम्ही त्यावरील टॅग जरुर वाचा. कपड्यांसाठी कोणते डिटर्जेंट वापरावे किंवा कोणते वापरू नये हे लिहिलेले असते. त्याचसोबत काही महत्त्वाची माहिती सुद्धा दिली असते.
थंड पाण्याने धुवा
थंडीत बहुतांशजण थंडाव्यापासून दूर राहण्यासाठी लोकरीचे कपडे गरम पाण्यात धुतातात. पण असे केल्याने त्याची चमक कमी होते आणि कपडे सैल होतात. त्यामुळे लोकरीचे कपडे नेहमीच थंड पाण्याने धुवावेत. कपडे अधिक अस्वच्छ झाले असतील तर तुम्ही कोमट पाण्यात स्प्रिट मिक्स करून स्वच्छ करू शकता. (Woolen cloth care)
स्टीम आयरने प्रेस करा
लोकरीचे कपडे इस्री करण्यासाठी स्टीम आयरनचा वापर करू शकता. ते कपड्यांना चिकटत नाही. तर स्टीम आयरन असल्याने तुम्ही नॉर्मन आयरनने कपडे इस्री करू शकता. परंतु लक्षात ठेवा की, नॉर्मल प्रेसचा वापर करतेवेळी लोकरीच्या कपड्यांवर सुती कापड टाकावा आणि त्यानंतरच ते इस्री करावेत.
हेही वाचा- कांजीवरम साडी अशी ओळखा