जगात नेहमीच मोठ्या-मोठ्या मंचांवर महिला-पुरुष समानतेबद्दल बोलले जाते. मात्र आज ही काही समाजात असमानता दिसून येते. आपल्या देशातील महिलांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही प्रकारचे आरक्षण आणि अधिकार दिले आहेत. त्याचसोबत बहुतांश अशिक्षित महिलांना आपल्या मुलभूत हक्कांबद्दलच काही सांगितले जात नाही. तर जाणून घेऊयात महिलांना कोणते अधिकार भारतीय संविधान आणि कायदे काय आहेत. (Womens Right)
-समान वेतनाचा अधिकार
बहुतांश वेळा असे पाहिले गेले आहे की, पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी मेहनतीचे काम दिले जाते. कारण महिलेला जमेल की नाही हाच पहिला प्रश्न उपस्थितीत केला जातो. परंतु आपले संविधान महिलांना समान परिश्रम किंवा वेतन मिळण्याचा अधिकार देतो. समान परिश्रमिक अधिनियमाअंतर्गत वेतन अथवा मजूरी मध्ये लिंगच्या आधारावर भेदभाव केला जाऊ शकत नाही. एक समान कामासाठी पुरुष आणि महिलांना एकसमान वेतन मिळण्याचे प्रावधान आहे.
-नाव आणि ओळख याची गोपनियता
जर तुम्ही लैंगिक शोषण अथवा वाईट कामांमध्ये जर महिलेसोबत दुर्व्यवहार झाला असेल तर तिचे नाव गुप्त ठेवले जाते. हा अधिकार ही महिलांना संविधानाने दिला आहे. लैंगिक शोषणाप्रकरणी गोपनियता ठेवण्यासाठी महिला आपली साक्ष एखाद्या महिला पोलीस अधिकाऱ्याच्या उपस्थितीत दाखल करु शकते. त्याचसोबत ती थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ही तक्रार दाखल करु शकते. पोलीस, मीडिया अथवा कोणत्याही अधिकाऱ्याला महिलेची ओळख जाहीर करण्याचा अधिकार नाही.
-मातृत्वाचा लाभ
नोकरदार महिलांना मातृत्वाचा लाभ आणि सुविधा मिळण्याचा अधिकार आहे. मातृत्वाचा लाभ अधिनियमाअंतर्गत प्रसुतीपूर्वीच महिला ६ महिन्यांची सुट्टी घेऊ शखते. या दरम्यान, तिच्या वेतनात कपात केली जाऊ शकत नाही. त्यानंतर ती पुन्हा कामावर परत येऊ शकते. (Womens Right)
-मोफत कायद्याची मदत
लैंगिक शोषणाप्रकरणी भारतीय संविधान महिलांना मोफत कायद्याने मदत देण्याचा अधिकार देते. पीडिता महिला ठाण्यात म्हणजेच एसएचओकडे ही मदत मागू शकते. त्यानंतर एसएचओ जवळच्या विधिक प्राधिकरणाच्या वकिलांची व्यवस्था करण्याची सूचना देते. पीडिता केस नि: शुल्क लढू शकते.
हे देखील वाचा- आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो?
-रात्रीच्या वेळी अटक नाही
कायद्यानुसार महिलेला सकाळच्या वेळेतच अटक करावी. तिला रात्रीच्या वेळी अटक केली जाऊ शकत नाही. गु्न्हा गंभीर असला तरीही प्रथम श्रेणी मॅजिस्ट्रेटच्या आदेशानुसार पोलीस संध्याकाळनंतर ते सकाळ होई पर्यंत महिलेला अटक करु शकत नाही.