Home » पाकिस्तानात महिला दिनावर बंदी…

पाकिस्तानात महिला दिनावर बंदी…

by Team Gajawaja
0 comment
Pak banned Women Day
Share

जगभरात महिला दिनाचा उत्साह आहे.  महिलांसाठी विशेष असलेल्या या दिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  महिलांचा सत्कार, सन्मान करण्यात येत आहे.  मात्र आपल्या शेजाराच्या देशात, पाकिस्तानमध्ये महिला दिनावर बंदी (Pak banned Women Day) आहे. फारकाय या दिवशी काढण्यात येणा-या औरत मार्च, अर्थात महिला मोर्चालाही विरोध करण्यात आला आहे.  तर पाकिस्तानच्या काही विभागात महिलांसाठी हिजाबची सक्ती करण्यात आली आहे.  त्यामुळे पाकिस्तानमध्ये आता महिलांसाठी तालिबानचे कायदे लागू केले आहेत का प्रश्न तेथील महिला संघटनांतर्फे विचारण्यात येत आहे.  

जगभरात साज-या होणा-या महिला दिनासाठी पाकिस्तान अपवाद आहे.  नावाला लोकशाही असलेल्या पाकिस्तानमध्ये महिलांवर अनेक बंधने टाकण्यात येत आहेत.  पाकिस्तानच्या  शहबाज शरीफ यांच्या सरकारने लाहोर शहरात काढण्यात येणा-या महिलांच्या मोर्चाला परवानगी नाकारली आहे.   आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाकिस्तानमध्ये 2018 सालापासून अनेक महिला संघटना एकत्र येत  ‘औरत मार्च’ काढत आहेत.  मात्र यावेळी असा मार्च काढण्यासाठी शरीफ सरकारनं परवानगी नाकारली आहे.(Pak banned Women Day)

2018 पासून, महिलांच्या हक्कांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी पाकिस्तानातील प्रमुख शहरांमध्ये मोर्चे काढण्यात येत आहेत.  मात्र यावेळी असे मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे.  त्यामुळे महिला संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.  या नकारासाठी लाहोर शहरातील पोलीस अधिकार्‍यांनी दिलेले कारणही हास्यास्पद आहे.  त्यांच्यामते या रॅलीमध्ये महिला जे फलक झळकवणार आहेत,  त्यातून सरकारचा निषेध होऊ शकतो, तसे होऊ नये म्हणून या औरत मार्चला परवानगी नाकारली आहे.   अर्थात महिला संघटनांनी असे कुठलेही वादग्रस्त फलक आपल्या मार्चमध्ये नसल्याचे सांगून सरकारी आदेशाचा निषेध केला आहे.  त्यांच्या म्हणण्यानुसार या औरत मार्चला दरवर्षी कट्टरवादी संघटनांकडून विरोध करण्यात येतो.  आता शरीफ सरकार या कट्टरवाद्यांच्या दबाबाखाली मार्चला परवानगीच देत नाही.  गेल्यावर्षीही हा मार्च काढण्यावरुन महिला संघटनांना विरोध करण्यात आला होता.  या मार्चवर दगडफेकही करण्यात आली होती.  महिला दिनाच्या या औरत मार्चच्या आयोजकांपैकी हिबा अकबर यांनी सरकारी धोरणाचा कडक शब्दात निषेध केला आहे.  पाकिस्तानमध्ये दरवर्षी शेकडो महिलांवर अत्याचार होतात.  त्यावर आवाज उठवण्यासाही बंदी असेल तर ही लोकशाही काय कामाची असा प्रश्नच तेथील महिला संघटना विचारत आहेत.  अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या महिलांच्या एका संघटनेनंही सरकारचा निषेध केला आहे(Pak banned Women Day).  दरम्यान, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांनी महिलांचा मोर्चा काढण्यास बंदी घातली असून महिलांनी  शहरातील उद्यानात एकत्र यावे असे आवाहन केले आहे.  पण याचाही महिला संघटनांनी विरोध केला आहे.  यासंदर्भात मोर्चाच्या संयोजकांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही स्त्रीवादी चळवळीच्या कार्यकर्त्या आहोत, आम्ही उद्यानांमध्ये नसून रस्त्यावर उतरणार आहोत. (Pak banned Women Day)

2020 मध्ये काही कट्टरवाद्यांनी  औरत मार्चमध्ये सहभागी झालेल्या महिलांवर दगडफेक केली.  गेल्यावर्षीही अशीच दगडफेक औरत मार्चमधील सहभागी महिलांवर झाली होती.  येथील मानवी हक्क आयोगाने ही धार्मिक संघटनेकडून विरोध झाल्यामुळे औरत मार्चला विरोध केल्याचे सांगितले आहे.  मानवी हक्क आयोगाने सांगितले की, जिल्हा प्रशासन शांततापूर्ण संमेलनाच्या अधिकाराला नियमितपणे आव्हान देत आहे.   महिला मोर्चात सहभागी होणाऱ्या महिलांच्या शांततापूर्ण संमेलनाच्या अधिकाराचा प्रशासनाने आदर केला पाहिजे आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमी दिली पाहिजे,  असेही मानवी हक्क आयोगानं पाकिस्तान सरकारला सांगितले आहे.  दरवर्षी लाहोर, हैदराबाद, सुक्कूर, फैसलाबाद, मुलतान, क्वेटा, कराची, इस्लामाबाद आणि पेशावरसह इतर शहरांमध्ये हा मोर्चा काढला जातो. औरत मार्च मुख्यतः महिलांसाठी वेतन, सुरक्षा आणि शांतता यावर लक्ष केंद्रित करते.  आता त्यावरच बंदी आणल्यामुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे.   

=======

हे देखील वाचा : आता भारतात चित्यांपाठोपाठ पाणघोडे येणार…

======

दरम्यान पाकिस्तान व्याप्त काश्मीर शैक्षणिक संस्थेत हिजाबची सक्ती करण्यात आली आहे.  पीओकेमधील इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ नेतृत्वाखालील सरकारने सह-शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थिनी आणि शिक्षकांसाठी हिजाब आवश्यक असल्याची सूचना केली आहे.  या आदेशाचे उल्लंघन केल्यास संस्था प्रमुखावर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.  या निर्णयाचा महिला संघटनांनी निषेध केला आहे.  तालिबानच्या विचारांना पाकिस्तानमध्ये स्विकारण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.  याबाबतही महिला दिन साजरा करतांना आवाज उठवण्यात येईल हे पाकिस्तानमधील महिला संघटनांनी स्पष्ट केले आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.