जगभरात महिलांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे महिलांना लष्करी सेवेमध्ये सामिल करुन घेतले जात आहे. जगातील बहुतेक देशांनी सैन्यात महिलांच्या (Women’s Army) सहभागास परवानगी दिली आहे. नॉर्वे आणि स्वीडन सारख्या देशांनी महिलांना सैन्य दलात भरती करण्यासाठी खास कायदे तयार केले आहेत.आता जगभरातील सर्वच देशात महिला सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या देशात आणखी एका देशाची भर पडली आहे, तो देश म्हणजे तैवान. तैवानने चीनची घुसखोरी आणि वारंवार येणा-या युद्धाच्या धमक्यामुळे आपलीही युद्धाला तोंड द्यायची तयारी सुरु केली आहे. याचाच एक भाग म्हणजे सैन्य भरतीला सुरुवात केली आहे आणि या भरतीमध्ये महिलांनाही संधी (Women’s Army) दिली आहे. तैवान सरकारने रिझर्व्ह फोर्समध्ये महिलांचा समावेश करून पुरुषांसारखे लष्करी प्रशिक्षण देण्याची घोषणा केली आहे. महिलांच्या या रिझर्व्ह फोर्समध्ये सामील होण्यासाठी उत्सुक असलेल्यांनी स्वेच्छेने प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्याचे आवाहनही केले आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. या वर्षभरात 220 महिला सैनिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयामार्फत ही खास योजना आखण्यात आली आहे. सध्या चिनचे संकट तैवानवर आहे. चिनकडून मोठ्या प्रमाणात घुसखोरी तैवानमध्ये होत आहे. या घुसखोरीला अटकाव करण्यासाठी तैवानमधून सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी प्रमुख म्हणजे सैन्याची संख्या वाढवणे. यात महिलांनाही आता सामावून घेतले जात आहे. तैवानमध्ये 18 ते 36 वर्षांच्या पुरुषांना लष्करी सेवेचा कालावधी अनिवार्य आहे आणि तो त्यांना पूर्ण करावाच लागतो. मात्र महिलांसाठी अशी योजना नव्हती. भविष्यात अशीच योजना महिलांसाठीही येण्याची शक्यता आहे (Women’s Army). तैवानमध्ये आता पुढच्यावर्षापासून पुरुषांसाठी अनिवर्य असलेला लष्करी सेवेचा कालावधीही वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आपसूकच सैन्याची संख्याही वाढणार आहे.
जगभरात अनेक देशात महिला सैन्यामध्ये (Women’s Army) मानाच्या स्थानावर विराजमान आहेत. आपल्या देशातही सैन्यात महिलांचा सहभाग महत्त्वाचा आहे. 2014 मध्ये, भारताच्या सैन्यात 3% महिला होत्या, नौदलात 2.8% आणि हवाई दलात 8.5% महिला होत्या. 2015 मध्ये भारताने महिलांसाठी लढाऊ वैमानिक म्हणूनही संधी द्यायला सुरुवात केली. आता भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर पायलट म्हणूनही महिला काम करत आहेत. (Women’s Army)
लिबियासारख्या छोट्या देशातही सशस्त्र दलात महिला सैनिक (Women’s Army) आहेत. महिला भरती येथे मोठ्या प्रमाणात होते. दक्षिण आफ्रिकेमध्ये महिलांना दक्षिण आफ्रिकन संरक्षण दल आणि आधुनिक दक्षिण आफ्रिकन राष्ट्रीय संरक्षण दलामध्ये सहभागी करुन घेण्यात आले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात महिलांनी दक्षिण आफ्रिकेच्या संरक्षण दलात सहाय्यक भूमिका बजावल्या आहेत. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, जपान, फ्रांन्स, इंग्लडसारख्या देशातही सैन्यात मोठ्या प्रमाणात महिला सैनिकांची संख्या आहे. ऑस्ट्रेलियात तर संरक्षण दलातील सर्व कामांमध्ये महिलांना सहभागी करुन घेण्यात येत आहे. 1998 मध्ये, ऑस्ट्रेलियात महिलांना पाणबुडीवर सेवा करण्याचीही परवानगी देण्यात आली. पाणबुडीवर महिलांना संधी देणारा ऑस्ट्रेलिया हा चौथा देश आहे. आपल्या शेजारच्या बांगलादेशातही काही प्रमाणात महिला सैन्यामध्ये (Women’s Army) भूमिका बजावत आहेत. बांगलादेश सैन्याने 2001 मध्ये महिला अधिकाऱ्यांची गैर-वैद्यकीय भूमिकेत भरती करण्यास सुरुवात केली. 2013 मध्ये प्रथमच महिला सैनिकांची भरती करण्यात आली.
========
हे देखील वाचा : ५ हजार रुपयांच्या भाड्याच्या कंप्युटरवरुन सुरु केला स्टार्टअप, वाचा Just Dial च्या यशाची कथा
========
तैवाननं ज्या देशाच्या धास्तीनं महिलांची सैन्यात भरती सुरु केली आहे, त्या चीनमध्येही महिला मोठ्या संख्येनं सैन्यात (Women’s Army) आहेत. याशिवाय इंडोनेशिया, इराक सारख्या देशातही महिला मोठ्यासंख्येनं सैन्यात आहेत. भारताचा मित्र राष्ट्र असलेल्या इज्रायल मध्ये महिलांची सैन्यातील संख्या मोठी आहे. या देशात मुला-मुलींना सैन्यामध्ये ठराविक वर्षात सेवा करावीच लागते. इस्त्रायलमध्ये महिलांना दोन वर्षांसाठी भरती केले जाते. 2001 मध्ये, इस्रायलच्या पहिल्या महिला लढाऊ पायलटला संधी देण्यात आली. या देशात तोफखाना, फील्ड इंटेलिजन्स, सीमा भागात महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे. न्युझीलँडमध्ये विशेष हवाई सेवा, पायदळ, तोफखाना आदीमध्ये महिला सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पाकिस्तानच्याही सशस्त्र दलात महिलांचा सहभाग आहे, हे विशेष. एकूण जगभरातील बहुतांश देशातील सैन्यात महिला सैनिक मोठ्या संख्येनं आहेत. आता या देशात तैवानची भर पडली आहे. चीनच्या धाकानं का होईना पण आता तैवानमधील महिलांना सैन्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
सई बने