Home » नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी ‘या’ सेफ्टी टीप्स जरुर वाचा

नव्या शहरात शिफ्ट होण्यापूर्वी ‘या’ सेफ्टी टीप्स जरुर वाचा

by Team Gajawaja
0 comment
Women Safety Tips
Share

महिलांसोबतच्या गुन्ह्याच्या घटना गेल्या काही काळापासून वाढत आहेत. अशातच महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थितीत केला जातो. या अशा गोष्टींमुळे जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा आपण ही नव्या ठिकाणी कामासाठी अथवा शिक्षणासाठी शिफ्ट होतो तेव्हा याबद्दलची भीती आणखीच वाढते. या सर्वांमध्ये महिलांना एखाद्या नव्या ठिकाणी घर शोधण्यापासून ते तेथील कल्चर कसे असेल हा सुद्धा प्रश्न असतो. मात्र तुम्ही तेथील काही गोष्टींची अधिक माहिती घेऊन आपण त्या ठिकाणी शिफ्ट झाल्यावर कशा प्रकारे वागू शकतो किंवा राहू शकतो त्याचे प्लॅनिंग करु शकता. तसेच तेथे महिलांच्या सुरक्षिततेसंबंधित काय नियम आहेत ते सुद्धा पहा. याचा तुम्हाला अधिक फायदा होऊ शकता. परंतु तुम्ही कधी एकट्यानेच नव्या ठिकाणी प्रवास करत असाल तर पुढील काही सुरक्षिततेच्या टीप्स फॉलो करण्यास विसरु नका. (Women Safety Tips)

-प्रथम तेथील कल्चर समजून घ्या
सर्वात प्रथम शहराचे कल्चर समजून घ्या. त्यानंतर स्वत:ला एक्सप्लोर करा. त्यासाठी तुम्ही नाइट लाइफसाठी ते शहर महिलांसंदर्भात किती सुरक्षित आहे हे सुद्धा पहा. सार्वजनिक वाहतूक किंवा कारपूलची कशी तेथे व्यवस्था असते हे ही जाणून घ्या. आणखी महत्वाचे म्हणजे नव्या लोकांच्या प्रति तेथील लोक काय विचार करतात हे सुद्धा पहा.

Women Safety Tips
Women Safety Tips

-घर घेण्यापूर्वी काही गोष्टी तपासून पहा
जर तु्म्हाला तेथे एखादे घर पसंद पडले असेल तर त्याच्या आजूबाजूची स्थिती, तेथील राहणाऱ्या लोकांची वागणूक, रस्त्यावरील लाइट्सची स्थिती, पोलिसांची गस्त, घराचे मालक किंवा परिवार त्यांच्यासंदर्भात अधिक माहिती घ्या.

-मौल्यवान वस्तूची घ्या काळजी
सुरुवातीच्या दिवसात सोन्याचे दागिने घालून रस्त्यावर फिरु नका. यासाठी उत्तम पर्याय की, तुम्ही मौल्यवान वस्तू सुरुवातीला घरातच ठेवा आणि त्या योग्य ठिकाणी ठेवा.(Women Safety Tips)

-महत्वाचे क्रमांक डायरीत लिहा
तुमच्या आजूबाजूची मंडळी, मित्र-परिवार, घरातील मंडळी यांचे क्रमांक तुम्ही एका डायरीत लिहून ठेवा. जरी तुमचा मोबाईल अचानक बंद पडला किंवा हरवला तर ही डायरी तुमच्या कामी येईल.

हे देखील वाचा- Twitter खरेदी केल्यानंतर एलन मस्क अॅक्शन मोडमध्ये, CEO पराग अग्रवालसह CFO यांची केली हकालपट्टी

-धोकादायक परिसरापासून दूर रहा
धोकादायक परिसरापासून नेहमीच दूर राहण्याचा प्रयत्न करा. तसेच एकट्याने प्रवास करणे टाळा. या व्यतिरिक्त तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्याबद्दल आपल्या आसपासच्या लोकांना आणि मित्रांना सांगा.

-घराचा दरवाजा नेहमीच ठेवा लॉक
नव्या घरात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा दरवाजा व्यवस्थितीत लॉक केला आहे की नाही ते पहा. कधीच मालकाच्या चावीचा वापर करु नका. रात्री झोपण्यापूर्वी नेहमीच दरवाजा लॉक करण्यासह खिडक्यासुद्धा व्यवस्थितीत बंद केल्या आहेत की नाही ते पहा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.