Women Safety Apps : महिलांसोबत होणाऱ्या गुन्हाच्या घटना सध्याच्या घडीला दिवसागणिक वाढत चालल्या आहेत. अशातच महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही मोबाइल अॅप उलब्ध आहेत. याच्या माध्यमातून महिलांना आपली स्वत:ची सुरक्षितता राखता येईल. याच अॅपबद्दल जाणून घेऊया सविस्तर…
Himmat Plus App
महिलांच्या सुरक्षिततेसाठी दिल्ली पोलिसांनी हिंम्मत प्लस अॅप लाँच केले होते. या अॅपमध्ये रजिस्टर करुन ओटीपीच्या माध्यमातून लॉग इन करता येणार आहे. या अॅपमध्ये SOS चे बटण दिले आहे. हे बटण दाबल्यानंतर महिलेची थेट माहिती दिल्ली पोलिसांच्या कंट्रोल रुम पर्यंत पोहोचली जाणार आहे. कंट्रोल रुमला माहिती मिळाल्यानंतर लगेच महिलेच्या जवळ असणाऱ्या पोलीस स्थानकाला तिच्याबद्दल माहिती देत तिची मदत केली जाईल. हा शासकीय अॅप गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पलच्या स्टोरवरही उपलब्ध आहे.
112 India App
112 India App भारत सरकारच्या आपत्कालीन रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टिमचा एक हिस्सा आहे. हा अॅप देशातील बहुतांश राज्यांमध्ये काम करतो. https://112.gov.in/states येथे राज्यांची पूर्ण लिस्ट दिली आहे. सध्या या अॅपच्या अंतर्गत 36 राज्यांना सुविधा पुरवली जाते. अॅपमध्ये कनेक्ट होण्याआधी राज्य आणि मोबाइल क्रमांक टाकून लॉग-इन करावे लागेल. या अॅपमध्ये SOS बटणाचा वापर आपत्कालीन स्थितीत केला जाऊ शकतो. हे बटण दाबल्यानंतर लोकेशन शेअर केले जाईल आणि रिस्पॉन्स टीम तुमच्या मदतीसाठी पोहोचेल. हा महिलांच्या सुरक्षिततेसाठी खास तयार करण्यात आलेला अॅप अॅप्पल स्टोर आणि गुगल प्ले स्टोरवरुन डाउनलोड करता येईल. (Women Safety Apps)
bSafe Never Walk Alone
बीसेफ नेव्हर वॉक अलोन अॅपमध्ये एक अलार्म दिला आहे. या अलार्मला प्रेस केल्यानंतर लोकेशन तुमच्या आपत्कातील क्रमांकासोबत शेअर केले जाईल.