जगात कोणालाही एकटे राहणे आवडत नाही. आपल्यासोबत आपला मित्रपरिवार किंवा पार्टनर असावा असे प्रत्येकालाच वाटते. जेणेकरुन आपली सुख-दु:ख त्यांच्यासोबत आपण शेअर करु शकतो. परंतु अशी ही काही माणसं आजही आहेत त्यांना फक्त स्वत:च्या जगात, आपल्या मनानुसार राहण्यास आवडते. खरंतर अशी माणसं मूळातच एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात असतील याची शक्यता ही फार कमी असते. परंतु जगातील संयुक्त राज्य अमेरिकेत नेब्रास्काच्या मोनोवी मध्ये राहणारी एक महिला जी गेल्या १९ वर्षापासून गावात एकटीच राहते. (Women living alone)
एल्सी आइलर असे त्या महिलेचे नाव असून ती आपल्या टॅक्सचे पेमेंट स्वत: च करते, स्वत: दारुचा परवाना देते आणि आपल्या महापौर निवडणूकीसाठी जाहिरात ही देते आणि मत ही स्वत:च देते. एल्सी सध्या ८६ वर्षाची असून ती २००४ पासून गावात एकटी राहत आहे. एका रिपोर्ट्सनुसार १९३० पर्यंत तेथे १२३ लोक राहत होते. मात्र हळूहळू तेथील लोकसंख्या कमी झाली. वर्ष १९८० पर्यंत गावात केवळ १८ लोकच राहिली. त्यानंतर २००० या वर्षात एल्सी आइलर आणि तिचा नवरा रुडी आइलर हे दोघेच राहिले.अशा निर्जीव शहरात एल्सी तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटीच राहू लागली.
शहरात स्वत:चेच नियम
एल्सी आइलर शहाराची महापौर, बारटेंडर आणि लाइब्रेरियन आहे. जगातील संपूर्ण लोकसंख्या एकमेकांना भेटण्यासाठी खुप उत्सुक असतात. पण आइल स्वत:ला एकटी असल्याचे मानत ती दु: खी असते. त्यामुळेच तिला दूर-दूरवरुन लोक भेटण्यासाठी सुद्धा काही वेळेस येतात.
शाळा, दुकाने, पोस्ट ऑफिस ही बंद
दुसऱ्या महायुद्धानंतर शेती व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसला होता. त्यामुळे मोनोवीच्या संपूर्ण समुदायाला त्या ठिकाणी फार नुकसान झाल्याचे दिसले. हळहळू सर्व काही बंद होत गेले. सुरुवातीला पोस्ट ऑफिस आणि अखेरीस तीन किराणा मालाची दुकाने १९६७ ते १९७० च्या दरम्यान बंद झाली. त्याचसोबत १९७४ रोजी शाळा ही बंद झाल्या. (Women living alone)
हे देखील वाचा- अमेरिकेतील पहिल्या ट्रांसजेंडर महिलेला दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण
नवऱ्याच्या मृत्यूनंतर पडली एकटी
तिची मुलं सुद्धा कामाच्या शोधासाठी तेथून निघून गेले. काही काळानंतर त्या शहराची लोकसंख्या ही कमी झाली. त्यामुळे ती आणि तिचा नवरा ते एकमात्र स्थानिक तेथे राहिले होते. परंतु सध्या आइलर शहरात एकटी राहते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली आहे. तसेच मनोवी समुदायाची ती एकमेव स्थानिक आहे.