रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे कुठल्या ना कुठल्या कारणानं चर्चेत असतात. आता याच पुतिन यांनी रशियातील महिलांना आवाहन केले आहे. पुतिन यांनी आदर्श कुटुंब संकल्पना म्हणजे काय, या संदर्भात एक मोठा संदेशच रशियाच्या महिलांना दिला आहे. त्यातील मुख्य संदेश म्हणजे, आता रशियातील महिलांनी किमान आठ मुलांना जन्म दिला पाहिजे. (Russia)
यासाठी ब्लादिमीर पुतिन यांनी भविष्यात रशियामध्ये आदर्श कुटुंबपद्धती निर्माण झाली पाहिजे, यासाठी हे आवाहन असल्याचे सांगितले आहे. वास्तवात हे त्यांचे आवाहन कशासाठी आहे, याची चर्चा सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सुरु झाली आहे. गेल्या दिड वर्षापासून चाललेले रशिया-युक्रेन युद्ध हे त्यामागचे मुळ आहे.
या युद्धामुळे रशियातील तरुण मुलांना सैन्यात भरती व्हावे लागले. त्यातील हजारो तरुण युद्धभूमीमध्ये मरण पावले आहेत. तर तेवढेच तरुण जखमी झाले आहेत. याशिवाय रशियातील अस्थिर वातावरण पाहता, हजारो कुटुंबांनी रशियातून स्थलांतर केले आहे. त्यामुळे भविष्यात रशियामध्ये फक्त वयोवृद्ध राहणार की काय अशी शंका समाजतज्ञ व्यक्त करीत आहेत.(Russia)
यासंदर्भात तेथील वृत्तपत्रात लेखही येत आहेत. रशियामध्ये वीस वर्षानंतर तरुण अगदी कमी असतील, असा त्यांचा अहवाल आहे. या सर्वांवर प्रत्येक महिलेनं आठ मुलांना जन्म देणे हाच एक उपाय असल्याचे ब्लादिमीर पुतिन यांना वाटते. त्यामुळे त्यांनी रशियातील महिलांना किमान आठ मुलांना जन्म द्या, असा आदेश दिला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी रशियातील महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे ब्लादिमीर पुतिन सध्या सोशल मिडियावर चर्चेत आले आहेत. पुतिन यांनी महिलांनी किमान आठ मुले जन्माला घालून मोठी कुटुंबे आदर्श बनवावीत, असे आवाहन करत असतांना देशात लहान कुटुंबांमुळे लोकसंख्येचे संकट वाढत आहे. त्यामुळे महिलांनी कुटुंब वाढवून राष्ट्राला बळकट करावे असे आवाहन केले आहे. पण ब्लादिमीर पुतिन यांच्या या आवाहनामागे रशियाचे वास्तव सत्य लपल्याची चर्चा आहे. (Russia)
गेल्या दिड वर्षापासून सुरु असलेल्या युद्धात रशियाचीही हानी झाली आहे. युक्रेनवर रशियानं हल्ला चढवला त्याला दीड वर्ष उलटून गेली आहेत. सुरुवातीला आकारानं अगदी लहान असलेल्या युक्रेनला रशिया सहज पराभूत करेल असे चित्र होते. अगदी आठवडाभरात हे युद्ध संपेल आणि युक्रेन रशियाच्या अंकित होईल, असा होरा अनेक मान्यवर तज्ञांनी व्यक्त केला. पण युक्रेनच्या भक्कम आघाडीमुळे हा अंदाज खोटा ठरला. आजही युक्रेन या युद्धात भक्कमपणे उभा आहे. उलट त्यांनी रशियाला अधिक नुकसान पोहचवले आहे.
त्यामुळेच रशियानं युद्धात आपल्या देशातील तरुण पिढीलाही सहभागी करुन घेतलं आहे. रशियाचे मोठ्या संख्येने सैनिक या युद्धात मरण पावले आहेत. हा आकडा नेमका किती आहे, याचे स्पष्टीकरण अद्यापपर्यंत कधीही रशियानं यासंदर्भात खरा आकडा दिलेला नाही. पण हा आकडा लाखात असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. (Russia)
दर दिवसाला या आकड्यात भर पडत आहे. यामुळे रशियातील लोकसंख्येचा समतोल बिघडू लागल्याची ओरड तेथील वृत्तपत्रातून होत आहेत. यावरच मलमपट्टी करण्याचा पुतिन यांचा प्रयत्न चालू आहे. त्यातूनच पुतिन यांनी वर्ल्ड रशियन पीपल्स कौन्सिलमध्ये भाषण देत, महिलांना किमान आठ अपत्ये जन्माला घालण्याचे आणि देशात पुन्हा एकदा मोठ्या कुटुंबांना आपला आदर्श मानण्याचे आवाहन केले. 1990 च्या दशकापासून रशियाचा जन्मदर सातत्याने घसरत आहे. त्यात कोणतीही सुधारणा झालेली नाही. त्यातच युद्ध सुरु झाल्यानं याबाबत अधिक चिंता व्यक्त होत आहे. (Russia)
फेब्रुवारीमध्ये युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून देशात तीन लाखांहून अधिक लोक मारले गेले आहेत. याशिवाय यापेक्षा अधिक नागरिकांना देश सोडून इतरत्र स्थलांतर केले आहे. इंडिपेंडंटच्या अहवालानुसार 1 जानेवारी 2023 रोजी रशियाची लोकसंख्या 146,447,424 आहे. ही लोकसंख्या 1999 च्या तुलनेत कमी आहे. अजून एका धक्कादायक अहवालानुसार पुतिन यांनी रशियाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, रशियाची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. या सर्वांचा परिणाम रशियातील अनेक सेवांवर होत आहे. रशियात कामगारांची संख्या कमी होत आहे. हा आकडा भविष्यात वाढणार आहे. कामगारांअभावी अनेक प्रोजेक्ट बंद करण्याची वेळ रशियावर आली आहे. तर काही ठिकाणी हे प्रोजेक्ट अतिशय संथगतीनं चालू आहेत.
==============
हे देखील वाचा : अन्यथा न्युयॉर्कला जलसमाधी मिळणार…
=============
सातत्यानं कमी होणा-या लोकसंख्येचा परिणाम युद्धावरही झाला आहे. युक्रेनच्या विरुद्ध लढण्यासाठी अतिरिक्त 300,000 नागरिकांना भरती करण्यात आले. पण यामुळे रशियातील अंतर्गत सेवा बिघडली. आता या सर्वांना सावरण्यासाठी पुतिन यांना एकच उपाय सुचला आहे, तो म्हणजे, देशातील महिलांना आठ मुलांना जन्म घालण्याचा सल्ला दिला आहे. या त्यांच्या आवाहनाने मात्र सोशल मिडियावर चर्चा करण्यासाठी नेटक-यांना नवा विषय मिळाला आहे.
सई बने