डब्लूएचओच्या मते २०२० मध्ये एक कोटी लोकांचा मृत्यू हा कॅन्सरमुळे झाला. प्रत्येक ६ पैकी एकाचा मृत्यू कॅन्सरमुळे होतो. यामध्ये सर्वाधिक संख्या ही स्तनाच्या कॅन्सरची आहे. त्यानंतर महिलांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे सर्वाइक कॅन्सर अथवा गर्भाशय ग्रीवा कॅन्सरमुळे होते. डब्लूएचओच्या आकडेवारीनुसार सर्विकल कॅन्सरमुळे प्रत्येक वर्षी ५.३० महिलांचा मृत्यू होतो. सर्वाइक कॅन्सरचे सर्वाधिक मोठे कारण एचपीवी वायरस आहे. चिंतेची बाब अशी की, हा व्हायरस काही वर्षांपर्यंत महिलांच्या प्रजनन अवयवात निष्क्रिय राहून पुन्हा सक्रिय होतो. हेच कारण आहे की, डॉक्टर वयाच्या २१ वर्षानंतरच्या सर्व महिलांना नियमत रुपात पॅप स्मीयर टेस्ट करण्याचा सल्ला देतात. (Women Health)
पॅप स्मीयर टेस्ट किंवा पॅट टेस्ट महिलांमधील सर्वाइक कॅन्सरच्या तापासाठी केली जाते. या टेस्टसाठी महिलांच्या सर्विक्स मधून कोशिकांचे सॅम्पल काढले जाते आणि त्याचे विश्लेषण केले जाते. यामुळे महिलांच्या प्रजनन अवयवयातील अन्य गोष्टींबद्दल ही कळले जाते.
का गरजेची आहे सर्वाइक कॅन्सर चाचणी?
मायो क्लिनिकच्या मते, महिलांमध्ये सर्वाइक कॅन्सर हा अत्यंत गंभीर आजार असतो. ज्यामध्ये बहुतांश रुग्णांचा मृत्यू होतो. सर्वाइक कॅन्सर महिलांच्या प्रजनन अवयव म्हणजेच गर्भाशयाच्या तोंडाच्या येथे असतो. सर्वाइक कॅन्सरचे मुख्य कारण ह्युमन पेपिलोमावायरस आहे. हा व्हायरस फिजिकल संबंध बनवणाऱ्या प्रत्येक महिलेत असतो. सर्वसामान्यणे शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती तो व्हायरस नष्ट करतो अथवा राहिला तरीही काही नुकसान होत नाही. पण काही-काही महिलांमध्ये हा व्हायरस गर्भाशय ग्रीवाजवळ दीर्घ काळापर्यंत निष्क्रिय होतो आणि वर्षानंतर कधी कधी सक्रिय होतो. पॅप स्मीयर टेस्ट मधून असे कळते की, हा व्हायरस भविष्यात कॅन्सरचा धोका तर उद्भवू देणार नाही ना? जर व्हायरसमध्ये कॅन्सरचा फैलाव करण्याची क्षमता असेल तर तो त्याला हटवून महिलेला मृत्यू दारातून वाचवू शकतो.
कोणी करावी ही चाचणी?
सर्वसामान्यपणे डॉक्टर २ ते ६५ वयातील महिलांना पॅप स्मीयर चाचणी करण्याचा सल्ला देतात. दरम्यान, डॉक्टर हे सुद्धा सांगतात की पॅप स्मीयर चाचणी करण्याची वेळ काय आहे. खरंतर प्रत्येक वर्षानंतर एकदा तरीही ही चाचणी केली पाहिजे असे सांगितले जाते. ३० वर्षावरील महिलांनी एचपीवी चाचणीसह प्रत्येक पाच वर्षात एकदा तरीही ती चाचणी करावी. मात्र महिलांच्या गर्भाशयासंबंधित काही समस्या आहे तर डॉक्टरांचा लवकरात लवकर सल्ला घ्यावा. जर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर आहे, एचआयवी आहे, धुम्रपान करत असेल, स्टेरॉइडचा वापर करत असतील तर अशा महिलांनी लवकरात लवकर चाचणी करण्याची गरज असते. (Women Health)
हे देखील वाचा- महिलांमध्ये लठ्ठपणामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार, वेळीच काळजी घ्या
तपासात काय होते?
पॅप स्मीयर चाचणीत महिलांच्या गर्भाशय ग्रीवा मधून कोशिकांना काढले जाते आणि त्याची चाचणी केली जाते. या प्रक्रियेदरम्यान डॉक्टर संभाव्य प्री-कॅन्सर कोशिका कापून हटवल्या जाता. या टेस्टमध्ये गर्भाशयातील ग्रीवाच्या कोशिकांच्या कोणत्याही असामान्य बदलावांबद्दल कळले जाऊ शकते. जेणेकरुन भविष्यात सर्विक्स मध्ये कॅन्सरचा धोका उद्भवू शकणार का याबद्दल कळते. सर्वाइक कॅन्सरची लक्षण काही वर्षांपर्यंत दिसत नाहीत. त्यामुळेच ही चाचणी नियमित रुपात करण्याची गरज असते. यामुळे लाखो लोकांचा जीव बचावू शकतो.