या जगातील प्रत्येक स्त्री ही मासिक पाळीच्या काळातून जाते. स्त्रीच्या आयुष्यातील मोठा काळ ती मासिक पाळीच्या चक्रामध्ये घालवते. मासिक पाळीमध्ये जरी बऱ्याच महिलांना असहनीय त्रास होत असला तरी ही पाळी म्हणजे निसर्गाने महिलांना दिलेले एक वरदानच आहे. याच पाळीमुळे एक स्त्री दुसऱ्या जीवाला जन्म देऊ शकते. पूर्वी तर पाळी शब्द चारचौघात उच्चारणे देखील अपराध असायचा. आजच्या आधुनिक काळात मात्र पाळीबद्दल हळूहळू लोकांचे पर्यायाने समाजाचे विचार बदलत आहे. भारतात आज बऱ्यापैकी महिला खुलेपणाने पाळीबद्दल बोलताना दिसतात. (Women Health)
पाळीच्या काळात महिलांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. एकीकडे सतत आणि मोठ्या प्रमाणावर होणारा रक्तस्त्राव आणि दुसरीकडे शारीरिक त्रास. यात आता शारीरिक त्रास कमी करण्यासाठी अनेक उपाय आणि औषधं उपलब्ध होताना आपण बघत असतो. अशातच आता पाळीमध्ये होणारा रक्तस्त्राव तर आपण थांबवू शकत नाही, मात्र त्यापासून कसा आराम मिळेल आणि रक्तस्त्राव होताना देखील महिला कशा त्यांचे रोजचे काम करू शकतील याचा विचार करून नवनवीन गोष्टी बाजार येताना दिसतात. (Marathi News)
पूर्वी पाळीमध्ये महिला जुने कपडे वापरायच्या मात्र त्यानंतर पॅड आले, टॅम्पॉन आले, पिरियड पॅंटी आल्या आणि आता आले आहे तर मेन्स्ट्रुअल कप. मेन्स्ट्रुअल कप ही संकल्पना तशी पाहायला गेली तर जुनी आहे, मात्र भारतात याबद्दल आता आता महिलांना समजताना दिसत आहे. मेन्स्ट्रुअल कप हे सोशल मीडियामुळे जास्त प्रकाशझोतात आले. अनेक मेट्रो सिटीमध्ये महिला आता सहजतेने मेन्स्ट्रुअल कप वापरताना दिसतात. मात्र हे मेन्स्ट्रुअल कप वापरताना नक्की कोणती काळजी घ्यायची? याबद्दल अनेक महिला अनभिज्ञ आहेत. आज या लेखातून आपण मेन्स्ट्रुअल कप वापरताना नक्की कोणती काळजी घ्यायची हे जाणून घेऊया. (Todays Marathi Headline)

===========
Health : जेवणानंतर अंघोळ करणे योग्य की अयोग्य?
===========
हे मेन्स्ट्रुअल कप सिलिकॉन किंवा थर्मोप्लास्टिक सामग्रीपासून बनविलेले कपच्या आकाराचे उत्पादन आहे, जे मासिक पाळी दरम्यान स्त्रीच्या योनीमध्ये घातले जाते. ते मऊ असते त्यामुळे ते योनीमध्ये टाकणे खूप अवघड नसते. मेन्स्ट्रुअल कप हे पुन्हा वापरता येण्याचे साधन आहे. हा सिलिकॉन कप लवचिक आणि फनेलच्या आकाराचा असतो. एक कप १० वर्षांपर्यंत पुन्हा-पुन्हा वापरता येतो. सॅनिटरी पॅड्स आणि टॅम्पोन्सच्या तुलनेत कप जास्त सुरक्षित मानले जातात. योनीमध्ये गेल्यावर ते आतमध्ये कपाचा आकार घेते आणि त्यात रक्त जमा होवू लागते. पण याची काळजी घेणे खूपच महत्वाचे असते, नाहीतर मेन्स्ट्रुअल कपचे दुष्परिणाम देखील मोठे होतात. (Top Marathi News)
मेन्स्ट्रुअल कप वापरताना कोणती काळजी घ्यावी?
मेन्स्ट्रुअल कप वापरण्यापुर्वी निर्जंतुक करा. वापरण्यापुर्वी प्रत्येक महिन्यात मेन्स्ट्रुअल कप उकळत्या पाण्यात उकळवुन स्वच्छ करा. कप तुमच्या योनीमध्ये घालण्यापूर्वी तुमचे हात व्यवस्थित धुवा. जर वापरण्यापूर्वी भिती वाटत असेल तर, दीर्घ श्वास घ्या. हा कप फोल्ड करून योनिमार्गातून आत टाकावा. याची एक बाजू हाताच्या चिमटीत पकडून बाहेर काढता येतो. दिवसातून दोन वेळा कप बदलावे. (Marathi Top Headline)
मेन्स्ट्रुअल कप खरेदी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या?
मेन्स्ट्रुअल कप वेगवेगळ्या आकारात ऑनलाइन आणि केमिस्टकडे उपलब्ध असतात. हे कप तीन आकारांमध्ये मिळतात. लहान, मध्यम आणि मोठे. त्यामुळे तुम्ही तुमच्या गायनॅकॉलॉजिस्टची भेट घेऊन तुमच्यासाठी कोणता कप योग्य आहे, याची चर्चा करा आणि खरेदी करा. मेन्स्ट्रुअल कप हे दोन प्रकारचे असतात. एक रियुजेबल आणि दुसरा डिसपोजेबल. रियुजेबल तुम्ही पाच वर्ष वापरू शकता तर काही डिसपोजेबल कप हे प्रत्येक मेन्स्ट्रुल सायकलनंतर बदलावे लागतात तर काही प्रत्येक युजनंतर बदलावे लागतात. (Top Trending News)
मेन्स्ट्रुअल कपचे तोटे
* योनीमध्ये वस्तू टाकताना लहान जखमा किंवा वेदना होऊ शकतात. जास्त लांब किंवा मोठ्या आकाराचा कप वापरला असेल तर या समस्या जाणवण्याची शक्यता वाढते.
* मासिक पाळीचे कप वापरल्याने काहीवेळा चिडचिड होण्याची शक्यता असते. जर कप योग्य बसवला गेला नसेल किंवा चुकीच्या आकाराचा असेल किंवा वापर दरम्यान कप योग्यरित्या साफ केला नसेल, तर अशा परिस्थितीमुळे इरिटेशन होऊ शकते. (Latest Marathi News)
* मेन्स्ट्रुअल कप वापरताना एलर्जी होणे शक्य आहे. हे कप वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनचे बनलेले असतात. त्यामुळे जर तुम्हाला सिलिकॉनची ऍलर्जी असेल तर याचा त्रास होऊ शकतो.
* मेन्स्ट्रुअल कप वापरताना काहीवेळा मूत्रमार्गात बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. कारण योनीमध्ये कोणतीही वस्तू घातल्याने मूत्रमार्गाला त्रास होऊ शकतो.

मेन्स्ट्रुअल कपचे फायदे
* मेन्स्ट्रुअल कप आठ तासांसाठी लीकेजपासून संरक्षण प्रदान करतो. तर, पॅड आणि टॅम्पोन्स दर तीन ते चार तासांनी बदलावे लागतात.
* मेन्स्ट्रुअल कप हे पर्यावरणास अनुकूल आहेत. सॅनिटरी पॅडचं विघटन होण्यासाठी ५०० वर्षांहून अधिक काळ लागतो. तर, कप पुन्हा वापरता येण्याजोगे असतात. एक कप अनेक वर्षं वापरता येऊ शकतो.
==========
Health : घरच्या घरी नाकावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी सोप्या ट्रिक्स….
==========
* बाजारातील बहुतेक पॅड आणि टॅम्पोन्समध्ये घातक केमिकल्स आणि कृत्रिम पदार्थ असतात. जे स्त्रीच्या जननेंद्रियाच्या संवेदनशील त्वचेसाठी त्रासदायक ठरू शकतात. शिवाय यामुळे योनीच्या पीएचमध्ये व्यत्यय येऊ शकतो. चांगल्या दर्जाचे मेन्स्ट्रुअल कप हे वैद्यकीय दर्जाच्या सिलिकॉनपासून बनलेले असतात. त्यामुळे यापासून कोणताही त्रास होत नाही. (Top Stories)
* मेन्स्ट्रुअल कप हे पुन्हा वापरता येण्याजोगे आहेत आणि जवळजवळ १० वर्ष ते टिकतात. यामुळे सिंगल युज उत्पादनांच्या असंख्य पॅकपेक्षा कप लक्षणीयरित्या कमी खर्चिक ठरतात.
* मेन्स्ट्रुअल कपमध्ये 15-25 मिली रक्त जमा होऊ शकते. साधारण टॅम्पोन किंवा पॅडपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. परिणामी, तुम्ही ८ तासांपर्यंत एक कप वापरू शकता. शिवाय यामुळे पुरळ उठण्यासारखी समस्याही उद्भवत नाही. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
