Home » Women Footballers In Bangladesh : आमचा काय दोष !

Women Footballers In Bangladesh : आमचा काय दोष !

by Team Gajawaja
0 comment
Women Footballers In Bangladesh
Share

बांगलादेशमध्ये महिला फुटबॉलपटूंना कसे वागवले जात आहे, हे सर्व जगानं पाहिलं पाहिजे. आम्हाला आमच्या खेळापासून दूर नेले जात आहे. खेळात धर्म असतो का, आम्ही आमच्या देशाचे प्रतिनिधीत्व करतो, यात आमचा काय दोष, असे प्रश्न विचारले आहेत, ते बांगलादेशातील महिला फूटबॉल खेळाडूंनी. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागत असतांना या महिला खेळाडूंना कॅमे-यासमोर रडू येत होते. या खेळाडूंना धर्माच्या नावावर त्यांच्या खेळापासून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या कारकिर्दीत कट्टरपंथीयांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आल्याचा हा आणखी एक पुरावा आहे. (Women Footballers In Bangladesh)

महिला फुटबॉलचा सामना चालू असतांना मदरशातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं मैदानात घुसले. त्यांनी हा सामना बंद पाडलाच शिवाय सामना बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनाही मारहाण केली. शिवाय मैदानाचीही तोडफोड केली. त्यांच्यामते इस्लाममध्ये महिलांच्या फुटबॉल खेळण्यावर बंदी आहे. या सर्व गोंधळामुळे महिला खेळाडू प्रचंड दडपणाखाली आहेत. गेल्या महिनाभरात हा दुसरा सामना रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या खेळाडूंना सोशल मिडियाच्या माध्यामातूनही टार्गेट करण्यात येत आहे. याबाबत मोहम्मद युनूस यांच्याकडेही दाद मागण्यात आली. मात्र मोहम्मद युनूस यांनी कुठलिही कारवाई न केल्यामुळे या महिला खेळाडू हताश झाल्या आहेत. सहा महिन्यांपूर्वी, बांगलादेशात हिंसक जमावाने शेख हसीना यांची सत्ता उलथावून लावली. त्यानंतर बांगलादेशात मोहम्मत युनूस यांचे काळजीवाहू सरकार आले. यावर तेथील नागरिकांना आनंद व्यक्त केला. मात्र बांगलादेशात सत्तांतर झाले नसून संपूर्ण देश तालिबानी विचारसरणीच्या ताब्यात गेल्याचे आता तेथील नागरिकांच्याही लक्षात येत आहे. (International News)

शेख हसीना यांचे सरकार गेल्यापासून बांगलादेशातील हिंदू समुदाय भीतीच्या वातावरणाखाली आहे. तिथे भर रस्त्यात पोलीसांच्या साक्षीनं हिंदूना मारहाण करण्यात येत आहे. हिंदूची मंदिरे जाळण्यात येत आहेत. यासंदर्भात मोहम्मद युनूस सरकारनं कधीही, कोणत्याही उपद्रवींना अटक केलेली नाही. आता याच बांगलादेशात महिलांच्या अधिकाराचेही हनन सुरु झाले आहे. महिनाभराच्या कालावधीत येथील महिला फुटबॉल संघाला दोनवेळा त्यांचा सामना बंद करुन मैदानातून पळ काढण्याची वेळ आली आहे. माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आल्यापासून अशा घटना सातत्याने घडत आहेत. बांगलादेशात इस्लामिक गटांची संख्या वाढली असून त्यांनी आता देशातील महिलांना आपले लक्ष करायला सुरुवात केली आहे. मोहम्मद युनूस यांच्या आडून कट्टरपंथीयांच्या हातीच बांगलादेशाची सत्ता गेल्याचे उघड झाले आहे. (Women Footballers In Bangladesh)

बांगलादेशात जॉयपूरहाट आणि रंगपूर जिल्हा संघांमधील फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा गोंधळ उडाला. या सामन्यादरम्यान मदरशातील विद्यार्थ्यांचा मोठा गट थेट मैदानात उतरला आणि त्यांनी मैदानाची नासधूस करायला सुरुवात केली. यावेळी सामना बघणा-या प्रेक्षकांनी या विद्यार्थ्यांना विरोध कऱण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, मदरशाच्या विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षकही महिला खेळाडूंना धमकावत होते. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. बांगलादेश फुटबॉल फेडरेशनने या घटनेचा निषेध केला आहे. बीएफएफचे मीडिया मॅनेजर साकिब यांनी यासंदर्भात एक निवेदन जाहीर केले आहे. (International News)

==============

हे देखील वाचा : Donald Trump : ऑर्डर टू डिपोर्ट

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

===============

त्यानुसार फुटबॉल हा सर्वांसाठी आहे आणि महिलांना त्यात सहभागी होण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणावर मोहम्मद युनूस यांनी आपले मत व्यक्त केले नाही. त्यामुळे या सर्वांना त्यांचा छुपा पाठिंबा असल्याचेही स्पष्ट झाले आहे. अर्थात युनूस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी, ज्या मदरशातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी हा हल्ला केला, त्या मदरशाचे प्रमुख अबू बकर सिद्दीकी यांनी मुलींनी फुटबॉल खेळणे हे गैरइस्लामी आहे. आपल्या श्रद्धेच्या विरुद्ध जाणारी कोणतीही गोष्ट थांबवणे हे आपले धार्मिक कर्तव्य आहे. यापुढेही असे सामने झाले तर आंदोलन अधिक हिंसक होईल, असा इशाराच दिला आहे. या सर्वांचा महिला फुटबॉल संघातील खेळाडूंना जबर मानसिक धक्का बसला आहे. या संघानं ऑक्टोबर 2024 मध्ये नेपाळच्या संघावर विजय मिळवत SAFF चॅम्पियनशिप ट्रॉफी जिंकली आहे. आपण आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगला खेळ करु शकतो, असा विश्वास त्यांच्यात आहे. अशावेळी कट्टरपंथीयांनी धमकी दिल्यामुळे आणि सरकारनं त्यांच्यावर काहीही कारवाई न केल्यामुळे आपल्या खेळाचे आणि आपलेही भविष्य अंधारमय झाल्याची जाणीव त्यांना झाली आहे. (Women Footballers In Bangladesh)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.