६ कोटींचे दान करणारी एक महिला सध्या फार चर्चेत आहे. एका मुलाखतीत महिलेने असे म्हटले की, तिच्या आई-वडिल किंवा मुलीसाठी काहीच मागे सोडले नाही. कर्जात बुडालेल्या मुलीची मदत करण्याऐवजी आपली सर्व संपत्ती विक्री करुन त्यामधून मिळालेले पैसे हे दान केले. आता ही मुलाखत समोर आल्यानंतर सोशल मीडियात महिलेवर जोरदार टीका केली जात आहे. हे प्रकरण चीन मधील आहे. (Women donated 6 crore)
साउथ चाइना मॉर्निंग पोस्टनुसार, एक व्लॉगरने संघाईच्या रस्त्यावर फिरत असलेल्या एका महिलेची मुलाखत घेतली. या मुलाखतीत महिलेने असे म्हटले की, २०१९ मध्ये तिने बुद्ध धर्माचा स्विकार केला आणि ती साधवी झाली. या दरम्यान, महिलेने आपले सर्व पैसे दान केले. घर, गाडी सर्व काही विक्री केले आणि त्यामधून आलेली रक्कम ही सुद्धा दान केली. महिलेने असे म्हटले की, तिच्याकडे जवळजवळ ५.८८ मिलियन युआन रुपये दान केले. त्यावेळी तिच्या मुलीला युनिव्हर्सिटीत फी भरण्यासाठी समस्या येत होती. तिच्यावर शैक्षणिक कर्ज सुद्धा होते. पण मुलीची आर्थिक मदत करण्याऐवजी एक मोठी रक्कम दुसऱ्या कोणाला तरी दिली. तिने आई-वडिल किंवा मुलीसाठी काहीच शिल्लक ठेवले नाही.
महिलेने असे म्हटले की, जेथे माझ्या निर्णयाचे आई-वडिलांनी समर्थन केले पण मुलीला हा निर्णय कळला नाही. आई-वडिल खासकरुन काही गोष्टी वेगळ्या दृष्टीने पाहतात. ते समजतात की, मी आपले पैसे दान केले ती माझी कमाई होती आणि त्यावर माझाच हक्क होता.महिलेचा हा व्हिडिओ चीनी सोशल मीडियात खुप व्हायरल झाला आहे.
Weibo वर त्या व्हिडिओला २२० मिलियन पेक्षा अधिक वेळा पाहिले गेले आहे. हजारो युजर्सने यावर विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत. काही लोकांनी महिलेवर टीका ही केली आहे. एका युजरने असे म्हटले की, महिलेने आपल्या मुलीची मदत केली पाहिजे होती. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, जर तु आपल्या मुलीसाठी एक रुपया सुद्धा दिला नाही तर तिला का जन्म दिला? अन्य एका युजरने म्हटले, महिला आपल्या जबाबदारीतून पळ काढत आहे. तसेच ती अत्यंत स्वार्थी स्वभावाची आहे असे ही एकाने म्हटले. (Women donated 6 crore)
हे देखील वाचा- जगातील विचित्र गाव… जेथे लोक अचानक झोपतात
दरम्यान, काही लोकांकडून महिलेच्या निर्णयाचे समर्थन ही केले जात आहे. एका युजरने म्हटले की, तिने मुलीला मोठे केले, शिक्षण दिले तर आता महिलेला तिच्या पैशाचे जे काही करायचे आहे ते ती करु शकते. यामध्ये काही वाईट नाही. तर दुसऱ्याने म्हटले महिला त्यागाच्या मार्गावर आहे.