Home » ‘या’ देशात महिलांना टॉपलेस पोहता येणार

‘या’ देशात महिलांना टॉपलेस पोहता येणार

by Team Gajawaja
0 comment
Freedom
Share

स्पेन पर्यटकांसाठी आवड असलेल्या या देशामध्ये जगातील चौथ्या क्रमांकाची जागतिक वारसा स्थळे आहेत. स्पेनची स्पॅनिश ही जगातील दुसरी सर्वात जास्त बोलली जाणारी मूळ भाषा आहे. स्पेन ही सोळावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. स्पेनमधील नागरिकांचे आयुर्मान अधिक आहे. विशेषतः या देशात आरोग्यसेवा जगातील सर्वोकृष्ट मानली जाते. अवयव प्रत्यारोपण आणि अवयव दानातही स्पेन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. स्पेन देशाबद्दल एवढे गोडवे गाण्याचे कारण म्हणजे, येथील महिलांनी केलेला एक संघर्ष आणि त्यात त्यांना मिळालेला विजय. स्पेनमधील महिलांनी काही महिन्यापूर्वी एक वेगळा लढा चालू केला. काय तर त्यांना स्विमिंग पूलमध्ये कपड्यांशिवाय आंघोळ करण्याची मुभा असावी. याशिवाय महिलांना स्तनपानही मोकळेपणानं करण्याचे स्वातंत्र हवे होतं. 

विशेष म्हणजे, या लढ्यात स्पेनमधील महिला यशस्वी झाल्या आहेत. आता त्यांना स्विमिंग पूलमध्ये कपड्यांशिवाय पोहण्याचे स्वातंत्र्य उपभोगता येणार आहे. मात्र ही सूट मिळाल्यावर अनेक देशातील महिला संघटनांनी नाराजीचा सूर आवळला आहे. महिलांना स्वातंत्र्य हवे पण त्या स्वातंत्र्यामुळे गैरप्रकार वाढणार असतील, आणि महिलांचीच थट्टा उडवली जाणार असेल तर हे स्वातंत्र्य काय कामाचे असा सवालही विचारण्यात येत आहे. एकीकडे स्विडनसारखा देश खुलेआम सेक्स ऑलिम्पियाडची घोषणा करतो, आणि दुसरीकडे स्पेनमध्ये महिलांना कपड्यांशिवाय स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची परवानगी मिळते या गोष्टी युरोपमधील महिलांच्याच अंगलट येणार नाहीत ना? अशी भीतीही महिला संघटना व्यक्त करीत आहेत. (Freedom) 

युरोपीय देशांमध्ये पुरुषांप्रमाणे महिलांनाही अधिकार देण्याची मोहीम सुरू आहे. त्यात स्पेन सरकारने महिलांना स्विमिंग पूलमध्ये टॉपलेस आंघोळ करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयानंतर स्पेनमधील महिलांना कॅटालोनिया प्रदेशातील जलतरण तलावांमध्ये कपड्यांशिवाय आंघोळ करता येणार आहे. इतकंच नाही तर महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. अमेरिका, कॅनडा, स्वीडनमध्ये महिलांना स्विमींग पूलमध्ये टॉपलेस जाण्यासाठी परवानगी आहे. मात्र अशीच परवानगी स्पेनमध्येही असावी यासाठी येथील महिला खूप दिवसांपासून मागणी करत होत्या. स्पेनच्या ‘कॅटलन समानता कायदा 2020’ अंतर्गत, महिलांना आधीच सार्वजनिक ठिकाणी टॉपलेस सनबाथ करण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र  जलतरण तलावांच्या मालकांनी महिलांना टॉपलेस आंघोळ करण्यास मनाई केली होती. तेव्हापासून स्पेनमध्ये महिलांनी स्विमिंगपूलमध्ये टॉपलेस होण्यासाठी लढा चालू केला. आता यात त्यांना यश आले असून महिलांना रोखणा-यांवरच कारवाई होणार आहे. जर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने महिलांना टॉपलेस होण्यापासून रोखले तर त्यांना 4,30,000 हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. भारतीय चलनात ही रक्कम 4.50 कोटी एवढी आहे.(Freedom)

हा आदेश देताना स्पेन सरकारने स्थानिक प्राधिकरणाला सांगितले आहे की,  महिलांसोबत कोणताही भेदभाव केला जाऊ नये. महिलांना टॉपलेस आंघोळ करण्याची परवानगी देण्याव्यतिरिक्त, महिलांना सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्याची परवानगी आहे. स्पेन सरकारचा हा निर्णय आपला मोठा विजय असल्याचे मत महिलांनी नोंदवले आहे. मात्र आता यावरच जागतिक महिला संघटनांमध्ये वादविवाद सुरु झाले आहेत. महिलांना स्वातंत्र्य हवे आहे, पण त्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग होऊ नये, अशी आशा अन्य संघटना व्यक्त करीत आहेत.  (Freedom) 

=========

हे देखील वाचा : श्रावणात शंकरांच्या ‘या’ मंदिरांना नक्की भेट द्या

=========

स्पेनमधील नवीन कायद्यानुसार प्रत्येक मनुष्याचा त्याच्या शरीरावर पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे कोणीही आपल्याला आवडेल अशा पद्धतीनं स्नान करु शकणार आहे. हे करतांना  ज्या महिलांना फुल बॉडी स्विम सूट घालायचा आहे किंवा ज्यांना ‘बुर्किनी’ म्हणजे बुरख्यासोबत बिकिनी घालायची आहे, त्यांनाही ही सूट मिळणार आहे.  (Freedom)

या निर्णयावरुन महिला संघटनात वाद रंगणार अशी चिन्हे आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी जगातील पहिली सेक्स चॅम्पियनशिप स्वीडनमध्ये होणार असल्याची बातमी आली. सेक्सला खेळ म्हणून कायदेशीर मान्यता देणारा स्वीडन हा पहिला देश ठरला आहे. यावरही महिला संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्याच्या नावावर स्वैराचार होऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. एकीकडे अफगाणिस्तानसारख्या देशांमध्ये महिलांचे जीवन अत्यंत कठिण होत आहे, आणि दुसरीकडे स्वातंत्र्याच्या (Freedom) नावाखाली महिला नको ते स्वातंत्र्य मागत आहेत, ही दरी दूर करण्याची गरज  आहे.  आता यासंदर्भात महिला संघटना आपली भूमिका कशी माडंतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.