मे १९९९, हाँग काँग शहरात एक १४ वर्षांची मुलगी दुपारच्या वेळी हाँग काँगच्या एका पोलिस स्टेशनमध्ये येते. ती मुलगी खूप घाबरलेली असते. तिची अवस्था बघून पोलिस तिला काय झालं, असं विचारतात, तर ती मुलगी सांगते की गेल्या काही आठवड्यांपासून एका बाईचं भूत मला त्रास देत आहे. यावर पोलिस हसतात. पण ती मुलगी म्हणते, हे मी खरं सांगते आहे. माझ्या स्वप्नात रोज एक बाई येते, ती जखमी अवस्थेत असते, मला मदत मागते, कधी ती इलेक्ट्रिक तारांमध्ये अडकलेली असते, कधी कोणीतरी तिचा गळा दाबत असत, अशा अवस्थेत ती माझ्याकडे मदतीची भीक मागत असते. मला वाचवण्याची विनंती करते आणि नंतर ती मरते.” पोलिस त्या १४ वर्षांच्या मुलीचं बोलणं ऐकून घेतात, पण नंतर तिला परत पाठवून देतात. काही दिवसांनी ती मुलगी पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये येते. पुन्हा तीच गोष्ट रिपीट करते. (Crime Story)
पण ती यावेळी असं काहीतरी सांगते ज्यामुळे पोलिस शॉक होतात. ती पोलिसांना सांगते स्वप्नात येणाऱ्या महिलेचा खून खरंच झाला आहे. आणि ज्या लोकांनी तिचा खून केला, त्यात मी सुद्धा सामील आहे. आता पोलिस मात्र सीरियस झाले. त्या मुलीला घेऊन तपास सुरू झाला तेव्हा समोरं आलं एक धक्कादायक सत्य, जे ऐकून तुम्ही म्हणाल हे सत्य नसतं, तर बर झालं असतं. इतकं ते विदारक आहे. १४ वर्षांच्या मुलीच्या स्वप्नात येणारी बाई कोण आहे? त्या बाईसोबत असं काय घडलं की, ती मदत मागते? ही संपूर्ण गोष्ट जाणून घ्या… (Crime Story)
दुसऱ्यांदा त्या मुलीची गोष्ट ऐकून पोलिस थोडे गंभीर होतात आणि या प्रकरणाची तपासणी करण्याचा निर्णय घेतात. मुलगी पोलिसांना सांगते की तीच्या अपार्टमेंटमध्ये एक फ्लॅट आहे, आणि तिथेच त्या बाईची हत्या झाली आहे. पोलिस तिला घेऊन त्या आपार्टमेंटमध्ये फ्लॅटमध्ये जातात. फ्लॅटचा दरवाजा उघडण्या आधीच त्या फ्लॅटमधून विचित्र वास येत असतो. संशय अजून वाढतो, हाँगकाँग पोलीस त्या फ्लॅटचं दार उघडतात, पाहतात तर पूर्ण फ्लॅट ‘Hello Kitty Dolls’ ने भरलेलं असतो. ते घरात शिरतात तसा तो वास आणखी तीव्र होतं जातो. त्या घरातील अनेक kitty dolls पैकी एक सर्वात मोठी डॉल बेडवर पडलेली असते. त्याच डॉलमधून सर्वात जास्त वास येत असतो. त्या डॉलची अवस्था खूप खराब होती. एखाद्या लहान मुलांच्या खेळण्याची वस्तु ती वाटतच नव्हती. डॉलची तपासणी केली, तेव्हा पोलिस सुद्धा चकित होते. त्या डॉलमध्ये त्यांना एका महिलेचं मुंडकं मिळालं होतं. (Hello Kitty Doll Case)
ज्याला बघून जाणवत होत की, ते मुंडकं गरम पाण्यात शिजवलं होतं. त्याशिवाय असं सुद्धा वाटत होतं की त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ते अर्धवट सोडलं आहे. या महिलेच्या मुंडक्यामुळे पोलिसांना त्या १४ वर्षांच्या मुलीच्या बोलण्यावर विश्वास बसला, एका महिलेची हत्या खरंच झाली होती. ती कोण आहे याचा शोध सुरू झाला. आणि या हत्येवरुन पडदा उठत गेला. त्यांच्या समोर एक पूर्ण स्टोरी आली. फॅन मॅन यी एक अनाथ मुलगी जिला लहानपणीच तिच्या आई वाडिलांनी रस्त्यावर बेवारस सोडलं होतं. त्यानंतर ती बालगृहात राहू लागली होती. 15 वर्षांची झाल्यानंतर तिला बालगृहातून बाहेर काढलं गेलं. कारण त्याठिकाणी वयाची मर्यादा होती. आई वडील नाही, या जगात दुसरं कोणीही नाही, चांगलं काय आणि वाईट काय हे सांगणारं कुणी नाही. त्यामुळे, तिला ड्रग्सची सवय लागली. ती रोज नशा करु लागली. तिचं वय वाढत होतं आणि ड्रग्सची तलप सुद्धा. ती ड्रग्सची इतकी आदी झाली होती की, त्याशिवाय ती राहू शकत नव्हती. पण अनेक वेळा पैशांची कमतरता असल्यानं तिला ड्रग्स विकत घेता येत नव्हते. (Crime Story)
मग पैशांची कमतरता दूर करण्यासाठी तिने देहविक्रीच्या व्यवसायात पाऊल ठेवलं. ती वेश्या बनली. धंदा, पैसा नशा असंच तिचं आयुष्य सुरू होतं. पण तिला हे सगळं सोडायचं होतं. तिला असं काहीतरी करायचं होतं ज्याने थोड का असेना पण तिचं जीवन सुधारेल. तेव्हा तिने तिच्याच एका ग्राहकाशी लग्न केलं. तो सुद्धा एक ड्रग्स अॅडिक्टच होता. लग्न झाल्यानंतर आयुष्य सुधारेल असं तिला वाटलं होतं. पण तिचा नवरा तिला रोज मारू लागला. ड्रग्ससाठी, पैशांसाठी तो हे करायचा. तरीही ती त्याच्या सोबत संसार करत होती. वेश्या व्यवसाय तिने सोडला होता. तिने आता एका नाइट क्लबमध्ये नोकरी सुरू केली होती. तिथे काम करत असताना तिची भेट चेन मॅन लोक याच्याशी झाली. चेन मॅन-लोक हा वेश्या व्ययसाततील एक दलाल होता. तो ड्रग्सची तस्करी सुद्धा करायचा. फॅन मॅन-यीच वय तेव्हा 23 वर्ष होतं. त्या दोघांची मैत्री हसत खेळत सुरू होती. पण चेन मॅन-लोक हा काय साधा माणूस नव्हता तो पैसा कमवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकत होता. तरी अशा माणसाशी फॅन मॅन-यी हिने मैत्री केली, कारण तो वेश्या व्यवसाय करत असताना तिचा एक ग्राहक होता. (Hello Kitty Doll Case)
आता त्या दोघांमध्ये सर्व काही सुरळीत चाललं होतं. पण फॅन मॅन-यीने वेश्या व्यसाय सोडल्यामुळे तिला हवे तसे पैसे मिळत नव्हते. म्हणून तिने मग एके दिवशी चेन मॅन लोकच्या घरी असताना त्याच्या पाकीटातून 4000 अमेरिकन डॉलर्स म्हणजेच तीन ते साडे तीन लाख रूपय चोरले. आणि हीच तिच्या आयुष्यातील शेवटची चूक होती. (Crime Story)
जेव्हा चेन मॅन-लोकला या चोरीबद्दल समजलं, तेव्हा त्याने आपल्या दोन गॅंग मेंबर्संना फॅन मॅन यीचं अपहरण करून एका पत्त्यावर आणायला सांगितलं. गॅंग मेंबर्संनी तिचं अपहरण केलं आणि तिला चेन मॅन-लोकने सांगितलेल्या पत्त्यावर नेलं. चोरीच्या घटनेमुळे चैन मॅन-लोक खूप भडकला होता. त्याने फॅन मॅन यीला सांगितलं, “तुला माझे पैसे आताच्या आता परत करावे लागतील. पण फॅन मॅन यीने ते पैसे खर्च केले होत. त्यामुळे ती ते पैसे परत देऊ शकत नव्हती. तेव्हा चेन मॅन-लोकने दिला त्याच्यासाठी वेश्या व्यवसायात काम कराव लागेल असं सांगितलं. फॅन मॅन यीकडे पर्याय नव्हता. जे ती मागे सोडून आली होती, आता तिला पुन्हा त्याचं वाटेवर जावं लागणार होतं. तीने त्याचे पैसे परत करण्यासाठी त्याचासाठीच काम करायला सुरुवात केली. तरी सुद्धा चेन मॅन-लोकचा राग शांत झाला नव्हता. (Hello Kitty Doll Case)
त्याने तिला त्याच पत्त्यावर पुन्हा बोलावलं आणि तिथे त्याने गॅंग मेंबर्संना तिच्यावर बलात्कार करायला सांगितला. तेही एकदा नाही अनेक वेळा. त्याने तिला त्या फ्लॅटमध्ये जवळ जवळ बंधकच बनवलं होतं. ते गॅंग मेंबर्स यायचे कधीही तीच्यावर आत्याचार करून निघून जायचे. तिच्या सोबत एवढं करून सुद्धा चेन मॅन-लोकचं मन भरलं नाही. त्याने तिला टॉर्चर करण्यास सुरुवात केली. ते लोक रोज तिला मारायचे. तिच्यावर अत्याचार करायचे. सिगरेटने तिला चटके द्यायचे. तिला लटकवून पंचिंग बॅगसारखा तिचा वापर करायचे. एवढंच नाही तर वितळलेल्या मेणाचे आणि प्लॅस्टिकचे चटके सुद्धा तिला दिले जायचे. एवढं होऊन ही तिला हे सुद्धा बोलायला लावलं जायच, की तिला या टॉर्चरमुळे मज्जा येते. तिच्या चेहऱ्यावर सतत तिला हसु ठेवाव लागायचे. जर तसं केलं नाही, तर हे टॉर्चर आणखी वाढायचं. चेन मॅन-लोक हा वेश्या व्यवसायातील दलाल होता. त्यामुळे तो लहान मुलींना या व्यवसायत आणायचा असंच एक दिवस तो एका 14 वर्षांच्या मुलीला घेऊन त्या फ्लॅटमध्ये आला जिथे फॅन मॅन यीवर अत्याचार होत होते. (Crime Story)
त्या 14 वर्षांच्या मुलीचं नाव होतं, लाउ मिंग फोंग. ती लहान मुलगी जेव्हा त्या फ्लॅटवर आली तेव्हा फॅन मॅन यीला इलेक्ट्रिक तारांमध्ये गुंडाळलं होतं. आणि शॉक देत तिला मारहाण सुद्धा केली जातं होती. तेव्हा चेन मॅन-लोक आणि त्याच्या गॅंग मेंबर्संनी लाउ मिंग फोंग हीला सुद्धा फॅन मॅन यीला मारण्यास सांगितलं. खूप फोर्स केल्यामुळे तिने फॅन मॅन यीच्या डोक्यात फाइट मारली. (Hello Kitty Doll Case)
त्यानंतर पूर्ण एक महिना फॅन मॅन यीवर असाच अत्याचार सुरू राहिला तिला खाण्यासाठी सुद्धा गू खान आणि लघवी दिली जायची. हे टॉर्चर सहन करणं मानवी शरीराच्या पालीकडचं होतं. म्हणूनच या टॉर्चरमुळे एक दिवशी फॅन मॅन यीचा मृत्यू झाला. चेन मॅन-लोकला जशी ही माहिती मिळाली. तेव्हा त्याने त्याच्या गॅंग मेंबर्संना हुकूम दिला की, तिच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून शहराच्या वेगवेगळ्यात भागात टाका. गॅंग मेंबर्संनी तिच्या शरीराचे तुकडे करून ते शिजवून शहराच्या वेगवेगळ्या भागत फेकून दिले. आता उरलं होतं ते फक्त फॅन मॅन यीचं मुंडकं त्याच काय करायचं असं त्यांनी चेन मॅन-लोकला विचारलं, तेव्हा तो म्हणाला की, ते शिजवून Hello Kitty Doll मध्ये टाकून द्या. कोणाला याची जरा सुद्धा भनकही नव्हती की फॅन मॅन यीची इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. (Crime Story)
फॅन मॅन यीची हत्या होऊन एक महिना झाला होता. कोणालाच त्याची खबर नव्हती. ज्यांनी ती हत्या केली होती ते मजेत आपलं आयुष्य जगत होते. पण त्या दिवशी जेव्हा फॅन मॅन यीवर भयावह अत्याचार होतं होते, तेव्हा त्या फ्लॅटवर एक 14 वर्षांची मुलगी आली होती लाउ मिंग फोंग. सर्व गुन्हेगारांच्या डोक्यातून फॅन मॅन यी हिच्यावर केलेला अत्याचार आणि यातना निघून गेल्या असल्या तरी लाउ मिंग फोंगच्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला होता. तिला फॅन मॅन यीचं स्वप्न पडू लागलं होतं. पण हे स्वप्नंचं होतं का? की खरंच फॅन मॅन यीचं भूत तिच्या स्वप्नात येतं होतं? या प्रश्नाचं उत्तर पुढे मिळेलं. पण लाउ मिंग फोंग मुळे या सर्व प्रकरणाचा खुलासा झाला. (Hello Kitty Doll Case)
===============
हे देखील वाचा : Konkan : कोकणात वाघोबांचा वावर वाढला ! सह्याद्रीत हे १२ वाघ कुठून आले ?
===============
पोलिसांनी या प्रकरणाची चांगली चौकशी केली. या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली गेली. पण पुराव्यांं अभावी त्या आरोपींना मृत्यू दंड देता आला नाही. त्यांना जन्मठेपेचीच शिक्षा झाली. हाँग काँग शहरात इतका निर्घुण आणि निर्दयी गुन्हा कधीच घडला नव्हता. पण या प्रकरणाला प्रसिद्धी मिळाली वेगळ्याच कारणांमुळे. जेव्हा हे प्रकरण कोर्टात सुरू होतं, तेव्हा कोर्टात अनेक पॅरानॉर्मल गोष्टी घडत होत्या. अनेक वेळा कोर्ट रूम मधील लाइटस चालू-बंद होत होत्या. ज्या अपार्टमेंटमध्ये फॅन मॅन यीवर अत्याचार झाला होता. तिथे नवीन भाडेकरू राहायला आले. पण त्यांनी लवकरच ते घर सोडलं कारण त्यांना त्या रूममध्ये कोणीतरी असल्याचा भास व्हायचा. नंतर अनेक वर्षांनी ती बिल्डिंग पाडून तिथे एक नवीन हॉटेल उभारण्यात आलं. (Crime Story)
आजही ही हाँग काँगमध्ये Hello Kitty Doll मर्डर केस म्हणून ही केस फेमस आहे.