हिवाळ्यात अनेक आजार पटकन होतात. हा ऋतू आपल्या आरोग्यासाठी अतिशय चांगला मानला जातो. कारण या ऋतूमध्ये आपण जो काही पोषक, सकस आहार घेतो तो आपल्याला वर्षभर टिकेल एवढी ऊर्जा देतो. त्यामुळे हिवाळ्यात चार महिने सगळ्यांनीच उत्तम आहार घेतलाच पाहिजे. हिवाळ्यात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे आलं. आलं हे बाराही महिने भारतामध्ये वापरले जातात. कधी कधी भाज्यांसोबत फ्रीमध्ये मिळणारं आलं, आता खूपच महाग झाले आहे.
आलं म्हटले की सर्वात आधी डोळ्यासमोर येतो तो, आल्याचा चहा. आपल्या देशात आल्याच्या चहाला अनन्यसाधारण महत्व आहे. चहासोबतच आलं भाज्यांमध्ये, विविध प्रकारांच्या डाळींमध्ये देखील वापरले जाते. आल्याची पेस्ट किंवा आलं जसे आपल्या जेवणाला चहाला चव देते तसे ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच फायदेशीर आहे. आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत.
आयुर्वेदिक औषधांमध्येही आल्याच्या वापर महत्त्वाचा मानला जातो. आलं झिंक आणि अँटी-ऑक्सिडंट्ससह अनेक पोषक घटकांनी समृद्ध आहे. आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आले हे सर्वांत उपयुक्त मानले जाते. आलं नियमित खाण्याचे फायदे कोणते चला जाणून घेऊया.
रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यामुळे शरीर रोगांशी लढण्यास सक्षम होते आणि निरोगी राहते. या ऋतूमध्ये आल्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आलं उष्ण असल्यामुळे ते आपल्या शरीराला हिवाळ्यात उब देण्याचे देखील काम करते.
मधुमेहामध्ये लाभदायक
आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आलं सेवनामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.
रक्ताभिसरण होण्यास मदत
थंडीत रक्ताभिसरणाच्या समस्या वाढतात. तसेच आल्यामध्ये असलेल्या विटीमिन, मिनिरल्स आणि अमिनो अॅसिड हे थंडीत रक्ताभिसरण क्रियेस मदत करतात. त्यामुळे खास करुन वयोवृद्धांनी या आल्याच्या चहाचे थंडीत सेवन करावे.
अॅलर्जीपासून बचाव
थंडीच्या काळात हवेची आद्रता खूप वाढते. तसेच काही वेळेस लोकांना श्वास घेण्यास त्रास होतो. या दरम्यन आल्याचा चहा यावर अत्यंत साधा सोपा उपाय आहे.
हाडांना मजबूतपणा येतो
आल्यामध्ये असणारे आयुर्वेदिक तत्वांमुळे थंडीत आल्याचा चहा प्यायल्यास पेशी आणि स्नायूंना थंडीच्या काळात मजबूत राहण्यास मदत होते.
मळमळ होण्यापासून आराम
दैनंदिन आहारात आल्याचा वापर केल्याने सतत वाटणारा मळमळीचा त्रास दूर होऊ शकतो. उलटीचा त्रास झाल्यास आले हे सर्वात गुणकारी औषध मानले जाते.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
आलं हे आयुर्वेदात खूप लाभदायक मानले गेले आहे. हिवाळ्यात आल्याचे सेवन नियमित केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो. घसा खव खव होत असेल तर त्यासाठी आल्याचा चहा फायदेशीर असतो. याशिवाय आलं टाकून काढा घेणे देखील या त्रासांमध्ये फायदेशीर ठरते. यामुळे सर्दी होत नाही आणि शरीर संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.
लिव्हरच्या समस्येते आराम
हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते. जेवणानंतर एक तासाने याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. असे केल्याने लिव्हरची समस्या देखील दूर होते.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
थंडीच्या दिवसात आहारात बदल होतो. त्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा पोटाच्या समस्या अनेकांची डोके दुखी आहे. आलं नियमित खाल्ल्यामुळे पोटाच्या समस्येपासून आराम मिळतो.