सध्या सगळीकडेच मस्त गुलाबी थंडीने वातावरण थंडगार झाले आहे. सकाळ आणि संध्याकाळी कमालीची थंडी जाणवताना दिसते. अशा या कडाक्याच्या थंडीमध्ये मस्त गरम गरम काहीतरी खावे अशी सगळ्यांचीच इच्छा असते. थंड वातावरणात गरमगरम पदार्थ म्हणजे अगदी सुखच जणू. हिवाळ्यामध्ये संपूर्ण वातावरण थंड झालेले असते. त्यामुळे आपल्याला आजार होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळेच हिवाळ्यामध्ये खासकरून उष्ण पदार्थनाचे सेवन मोठ्या प्रमाणावर केले जाते. जेणेकरून हे उष्ण पदार्थ आपले शरीर आतून गरम ठेवतील आणि आपण आजारी जास्त पडणार नाही. असे काही पदार्थ आहेत, जे फक्त आणि फक्त हिवाळ्यामध्ये खायचेच असतात. या ऋतूमध्ये या पदार्थांची चव आणि त्यांचा लाभ आपल्या शरीराला अधिक होतो. मग फक्त हिवाळ्यात खाल्ले जाणारे खाद्यपदार्थ कोणते? पाहूया. (Winter Recipe)
मक्याची रोटी आणि मोहरीची भाजी
मक्के दि रोटी आणि सरसो दा साग हे आपण अनेकदा ऐकले असेल. पंजाबी लोकांमध्ये हिवाळ्यात हमखास केला जाणारा हा पदार्थ. हिवाळ्यात तुम्हाला मक्याची रोटी आणि सरसों का साग खाण्याची संधी मिळाली तर नक्कीच ती सोडू नका. उत्तर भारतातील बहुतेक घरांमध्ये हा पदार्थ बनवला जातो. कारण सरसों का साग फक्त हिवाळ्यात उपलब्ध असतो. लोणी किंवा देशी तूपाचा वापर करुन ही रोटी बनवली जाते. हिवाळ्यात मात्र मक्के दि रोटी आणि सरसो दा साग तुम्हाला गरम ठेवण्यास मदत करतात. हा पदार्थ तुम्ही घरी देखील बनवू शकता. (Marathi News)
गाजराचा हलवा
हिवाळा सुरु झाला की, लालचुटुक असे गाजर बाजारात आपले लक्ष वेधून घेतात. हिलयात गाजर मोठ्या प्रमाणवर येतात. त्यामुळे या ऋतूमध्ये केली जाणारी महत्त्वाची डिश म्हणजे ‘गाजराचा हलवा’. गाजराचा हलवा किंवा खीर या पदार्थांची नावे ऐकताच तोंडाला पाणी सुटते. हा पदार्थ हिवाळ्यात सर्वच घरांमध्येही बनवला जातो. प्रत्येक घराची गाजराचा हलवा बनवण्याची खास पद्धत असते.हिवाळ्यात येणारी लाल-लाल आणि रसाळ गाजरांपासून ही एक चविष्ट रेसिपी बनवली जाते. (Todays Marathi Headline)

तिळाचे लाडू
हिवाळ्यात आपल्या दररोजच्या आहारामध्ये तिळाच्या लाडूचा समावेश करा. हे बनवायला खूप सोपे आहेत. हे गूळ आणि तीळापासून बनवले जाते. तीळ हे त्यांच्या पौष्टिक फायद्यांसाठी ओळखले जातात, तर गूळ हा देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Marathi News)
गूळ आणि पीठाचा हलवा
या हलव्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात पीठ, तूप, रवा आणि गूळ यांचे गुणधर्म असतात. गुळामुळे हा हलवा हिवाळ्यात शरीर उबदार ठेवतो. यसोबतच तुम्ही गूळ-शेंगदाणा चिक्की देखील खाऊ शकता. गूळ-शेंगदाण्याची चिक्की खायला चविष्ट तर असतेच, पण शरीराला आतून उबदार आणि निरोगी ठेवते. (Top Marathi News)
डिंक लाडू
डिंक लाडू हा भारतात बनवला जाणारा एक अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे, हा लाडू प्रत्येक घरात हिवाळ्यात बनवला जातो. डिंक लाडू केवळ स्वादिष्टच नाही तर खूप पौष्टिक देखील आहे. त्यात असलेले डिंक आणि तूप हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यास मदत करते. असे म्हटले जाते की रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी न्याहारीमध्ये 1 कप गरम दुधासोबत गोड लाडू खाणे खूप फायदेशीर आहे. (Latest Marathi Headline)
बाजरीची खिचडी
बाजरीचा गुणधर्म उष्ण असतो. त्यामुळे या दिवसांत बाजरीची भाकरी खाल्ली जाते. मात्र जर तुम्हाला वेगळे काही खायचे असेल तर तुम्ही बाजरीची खिचडी बनवू शकता. हिवाळ्यात महाराष्ट्रातील खान्देश या भागात हि खिचडी सर्रास केली जाते. बाजरी धुऊन 6-7 तास भिजवावी. त्यानंतर ती थोडी वळली की, मिक्सरमधून जाडसर दळावी. त्यानंतर बाजरी आणि भिजवलेली मुगडाळ आणि तांदूळ एकत्र करून कुकरमध्ये शिजून घ्यावे. याला वरून फोडणी द्यावी. यासाठी एका फोडणीच्या भांड्यात थोडे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरं, लसूण, लाल मिरचीचे तुकडे घालून खिचडीच्या वरुन फोडणी द्यावी. आता त्यावर तूप खालून खायला घ्या. (Top Trending Headline)
=========
Egg-VS-Paneer : हाय प्रोटीन डाएटसाठी: अंड की पनीर? पौष्टिकतेचा महासंग्राम!
=========
सुरती उंदियो
सुरती उंधियू हा गुजरातचा एक पारंपरिक हिवाळी पदार्थ आहे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या आणि शेंगा वापरल्या जातात. हा पदार्थ पारंपारिकपणे मातीच्या भांड्यात जमिनीखाली उलटा शिजवला जातो, म्हणूनच याला ‘उंधियू’ असे नाव आहे. हा अनेक भाज्या एकत्र करून बनवला जातो, जो चवीला पौष्टिक आणि स्वादिष्ट लागतो. उंधियू बनवताना खूप वेळ लागतो कारण त्यासाठी खूप साहित्य लागते. मात्र याची चव अप्रतिम आहे. साधारणपणे उंधियू हिवाळ्यात बनवले जाते कारण या हंगामात बहुतेक आवश्यक भाज्या उपलब्ध असतात. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
