हिवाळ्याच्या दिवसात त्वचा कोरडी होण्याच्या समस्येचा बहुतांशजण सामना करतात. याशिवाय प्रदुषण आणि त्वचेची काळजी न घेतल्यानेही त्वचा कोरडी होते. पण काहीवेळेस फेस क्लिनिंग आणि मॉइश्चराइझर लावण्याव्यतिरिक्त त्वचेची अधिक काळजी घेतात. यामधील एक भाग म्हणजे त्वचेला स्क्रब करणे. यावेळी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कधी विचार केलाय का, त्वचेला स्क्रब करताना त्वचेचा प्रकार नव्हे ऋतूची देखील काळजी घ्यावी? (Winter Skin Care)
तज्ज्ञ म्हणतात, हिवाळ्याच्या दिवसात त्वचेला अधिक ओलसरपणाची गरज असते. यामुळे स्क्रब करताना कोणतीही चुक करू नये. जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचेला स्क्रब करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर…
एक्सफोलिएशन का गरजेचे?
खरंतर त्वचेवर जमा झालेली घाण यामुळे मृत पेशी तयार होऊ लागतात. या मृत पेशी हटवण्यासाठी एक्सफोलिएशन करणे हा उत्तम पर्याय आहे. स्क्रब करताना त्वचेवरील घाण दूर होते आणि पोर्सचा आकार देखील वाढला जात नाही. यामुळे त्वचेला स्क्रब करणे गरजेचे आहे.
या गोष्टींची घ्या काळजी
-हिवाळ्यात त्वचेला स्क्रब करताना क्रिम असणारे स्क्रब निवडा. स्क्रबमुळे त्वचा कोरडी होतो. यासाठी क्रिम बेस्ड प्रोडक्ट त्वचेला लावल्यास त्यामध्ये ओलसरपणा टिकून राहतो.
-त्वचेला स्क्रब अधिक वेळ करू नका. कारण यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊ शकते..
-स्क्रब केल्यानंतर स्टिम घेण्यास विसरू नका. कोणत्याही ऋतूत चेहऱ्याला स्क्रब केल्यानंतर स्टिम घ्यावी.
हे फेस स्क्रब येतील कामी
कॉफी आणि दूध
एका वाटीत दोन चमचे ऑर्गेनिग कॉफी घ्या. यामध्ये दूध मिक्स करून त्याची पेस्ट तयार करा. दूधामुळे त्वचेवर ओलसरपणा टिकून राहतो.कॉफी आणि दूधापासून तयार करण्यात आलेल्या स्क्रबने चेहऱ्याला हळूवारपणे मसाज करा. स्क्रब 10-15 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा.
ओट्स आणि दही
तुम्ही घरच्या घरी त्वचेला स्क्रब करण्यासाठी ओट्स आणि दह्याचा स्क्रब तयार करू शकता. ओट्स पावडरमध्ये दही मिक्स करून थोडावेळ ते मिश्रण तसेच ठेवा. यामध्ये तुम्ही मधही मिक्स करू शकता. यामुळे त्वचेवर ओलसरपणा टिकून राहण्यास मदत होईल. (Winter Skin Care)
पिठीसाखर आणि बदामाचे तेल
एका वाटीत पिठीसाखर आणि बदामाचे तेल घेऊन ते व्यवस्थितीत मिक्स करा. बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई के व्यतिरिक्त अन्य पोषण तत्त्वे असतात. यामुळे बदामाचे तेल आरोग्य आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. बदामाच्या तेलाच्या या स्क्रबमुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.
हेही वाचा: सेलो स्किन म्हणजे काय? जाणून घ्या याची कारणे आणि उपचार