Home » भाज्यांचे ‘हे’ 5 फेसपॅक हिवाळ्यात देतील चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो

भाज्यांचे ‘हे’ 5 फेसपॅक हिवाळ्यात देतील चेहऱ्याला इन्स्टंट ग्लो

चेहऱ्यावर इंन्स्टंट ग्लो हवा असल्यास तुम्ही काही होममेड फेसपॅकचा वापर करू शकता. यामुळे त्वचा मऊ देखील होईल.

by Team Gajawaja
0 comment
Winter Skin Care
Share

प्रत्येक महिलेला सुंदर दिसायचे असते. प्रत्येक वयोगटातील महिला एखाद्या फंक्शनवेळी नटते. या गोष्टीसाठी महागडे ब्युटी प्रोडक्ट्सही खरेदी केले जातात. पण तुम्हाला अधिक पैसे न खर्च करता इंन्स्टंट ग्लो हवाय? पुढील काही टिप्स नक्कीच तुमच्या कामी येऊ शकतात. (Winter Skin Care)

गाजर

The Origin and History of Carrots | Scrumptious Bites
आपली त्वचा आतमधून हाइड्रेट राहण्यासाठी गाजराचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर असतो. गाजरात बीटा, कॅरेटीन, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी गुणधर्म असतात. जे त्वचेला आतमधून हेल्दी ठेवण्यास मदत करतात.

गाजराचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक कप गाजर मिक्सरमध्ये वाटून घ्या. आता यामध्ये एक चमचा मध आणि दोन चमचे कच्चे दूध मिक्स करा. गाजराचा हा फेसपॅक चेहऱ्यावर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

बीट

Beetroot - Benefits, Nutritional Facts, & Beets Recipes - Blog - HealthifyMe
बीट आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. आपल्या शरीराला डिटॉक्स करण्यासाठी बीट उपयुक्त असते. याशिवाय त्वचेसाठी ही बीट उत्तम असते.

बीटाचा फेसपॅक तयार करण्यासाठी बिटाचा ज्युस तयार करून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. बीटाचा फेसपॅक चेहऱ्याला दहा मिनिटे लावून ठेवा आणि हलक्या हाताने मसाज करा. थोड्यावेळाने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा.

टोमॅटो

World Tomato Day! History, Significance & Interesting Facts About This  Healthy Fruit
टोमॅटोमुळे त्वचा ग्लो होते. याचा फेसपॅक चेहऱ्याला लावल्याने काळवंढलेल्या त्वचेची समस्या दूर होते. टोमॅटोचा फेसपॅक तयार करण्यासाठी टोमॅटोची प्युअरी घेऊन त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा मध मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्याला 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. आठवड्यातून दोनवेळेस हा फेसपॅक लावू शकता. (Winter Skin Care)

बटाटा

Potatoes Can Help Your Gut Health More Than You Think
बटाट्याचा फेसपॅक त्वचेवरील काळे डाग दूर करण्यास मदत करतो. याशिवाय त्वचा ग्लो होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी एका वाटीत बटाट्याचा रस, एक चमचा कोरफडीचे जेल, एक चमचा मध मिक्स करा. आता ही पेस्ट एकत्रित मिक्स करून चेहऱ्याला लावा आणि 10 मिनिटे लावून ठेवा. पॅक चेहऱ्यावर सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. या फेसपॅकमुळे आठवडाभरात तुम्हाला चेहऱ्याच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


आणखी वाचा: उकडलेले बटाटे तुम्ही फ्रिजमध्ये ठेवता? जाणून घ्या ही बाब


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.