नोव्हेंबर महिना सुरु झाल्यावर हलकेच थंड वा-याची येणारी झुळूक अधिक बोचरी होऊ लागते, तेव्हा जाणीव होते, की आता पुढचे दोन महिने तरी थंडीचे आहेत. अर्थात भारतात थंडी कधी सुरु होते, हे काश्मिर, उत्तराखंड, उत्तरप्रदेश मधील थंड वा-यांवरुन समजते. काही दिवसापासून उत्तर भारतातही थंडीचे आगमन झाले आहे. यासह अनेक राज्यात सकाळ आणि संध्याकाळी थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. राजधानी दिल्लीमध्येही तापमानात घट झाली असून रात्री थंडी जाणवू लागली आहे. यापुढच्या काही दिवसात तापमानात अधिक घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र लवकरच काही दिवसात ही सुखावणारी थंडी बोच-या थंडीमध्ये रुपांतरीत होणार असल्याचा इशारा हवामान तज्ञांनी दिला आहे. बदलते जागतिक हवामानाला निनाचा प्रभाव यामुळे जगभरात थंडीचा कडाका यावर्षी जरा जास्तच जाणवणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी बर्फवृष्टीचे प्रमाणही जास्त राहणार आहे. भारतातील काही राज्यासह जगभरातही बर्फवृष्टी प्रमाणाच्या अधिक होणार आहे. त्यात ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश राहणार आहे. नुकतीच सौदी अरेबियामध्येही पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली. ही घटना बदल्या हवामानाची सूचना देणारी आहे. त्यावरुन येत्या काही दिवसातच थंडीचा कडाका आणि पांढ-या वादळाची सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Winter)
भारतात थंडीची सुरुवात होऊ लागली आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये सकाळी आणि रात्री सुखद गारवा पसरु लागला आहे. स्वर्गाची उपमा असणा-या काश्मिरमध्ये यंदा सिझनची पहिली बर्फवृष्टी झाल्यानं पर्यंटक सुखावले आहेत. उत्तर प्रदेशातही अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमान 15 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले आहे. पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्येही 15 नोव्हेंबरनंतर हिवाळा सुरु होणार असल्याची माहिती हवामान खात्यानं दिली आहे. या राज्यात हिवाळा सुरु होणार असला तरी हवामान खात्याने तामिळनाडूच्या कन्याकुमारी, तिरुनेलवेली, तेनकासी, थुथुकुडी, विरुधुनगर, थेनी, दिंडीगुल, तिरुपूर, कोईम्बतूर, निलगिरी येथे मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. केरळमधील तिरुवनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, कोझिकोड, कन्नूर येथेही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यातील बहुतेक भागात वादळी पावसाची शक्यता आहे. या संमिश्र वातावरणामुळे थंडीचा कडाका काही राज्यात कमी असला तरी नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सर्व भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. (Social News)
भारतात यावर्षी थंडीचा कडाका जास्तच जाणवणार असला तरी जगभरातही थंडी अशीच कडाक्याची पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ला नीना मुळे हवामानावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे हिवाळ्यातील सामान्य तापमानापेक्षा तापमान अधिक कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवामान एजन्सी NOAA, ऑस्ट्रेलियन हवामान एजन्सी ABM आणि भारतीय हवामान संस्था IMD यांनी एप्रिलमध्ये ला निना संदर्भातील हा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार युरोपमध्ये यावर्षी बर्फाचे मोठे वादळ असेल असाही अंदाज आहे. त्याची सुरुवात झाल्यासारखी परिस्थिती ब्रिटनमध्ये आहे. ब्रिटनमध्ये पुढील आठवडाभर बर्फाच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील आठवड्याच्या अखेरीस निम्म्याहून अधिक ब्रिटनमध्ये बर्फवृष्टी होणार असल्याचा इशारा तेथील हवामान खात्याने दिला आहे. हे वादळ एवढे मोठे असेल की त्यामुळे सुमारे एक हजार किलोमीटरपर्यंत फक्त बर्फच दिसेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे ब्रिटनमधील तापमान सर्वदूर उणे 7 अंशांपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना आवश्यक अशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Winter)
=====
हे देखील वाचा : हिवाळ्यात ‘या’ सोप्या टिप्स वापरून घ्या ओठांची काळजी
========
नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आवाहन करण्यात आले असून आवश्यक वस्तूंचा साठा करण्याचेही सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसात सौदी अरेबियामध्ये झालेले बर्फाचे वादळ हे जगभरातील हवामान तज्ञांच्या चिंतेत भर घालणारे ठरले आहे. सौदीमध्ये बर्फ पडणार ही घटना सर्वात दुर्मिळ आहे. यामुळे या भागात तापमानात घट झाली असून पाण्याची तळी जागोजागी तयार झाली आहेत. एकीकडे बर्फाचा मारा आणि दुसरीकडे वादळी पाऊस अशी जगभरातील तापमानाची परिस्थिती आहे. स्पेनमध्ये गेल्या आठवड्यात वर्षभराचा पाऊस एका दिवसात पडल्यानं या देशातील हजारो नागरिक उघड्यावर आले, तसेच करोडो रुपयांचे नुकसान झाले. हवामानाचा अभ्यास करणा-या तज्ञांना या गोष्टी आव्हानात्मक वाटत असून प्रगत साधने हाती असतांनाही अशा अचानक येणा-या वादळांचा अंदाज सांगता येत नसल्यामुळे निराशा व्यक्त केली आहे. (Social News)
सई बने