थंडीत शरीर आतमधून गरम ठेवण्यासाठई आपण काही प्रकारचे उपाय करतो. या उपायांपैकीच एक म्हणजे गुळ आणि आल्याचे सेवन. आपली आजीसुद्धा थंडीत याचे सेवन करण्यास सांगते. पण आधुनिकतेमुळे याचे सेवन करणे फार कमी झाले आहे. जर तुम्हाला थंडीत तुमचे शरीर नैसर्गिक रुपात आतमधून गरम ठेवायचे असेल तर गुळ आणि आल्याचे सेवन करावे. तुम्हाला माहितेय का, गुळ आणि आल्याचे एकत्रित सेवन केल्याने केवळ शरीरच नव्हे तर काही प्रकारच्या समस्याही दूर होतात. (Winter Health Care)
सूजेपासून सुटका
थंडीत गुळ आणि आलं एकत्रित खाल्ल्याने शरीराला येणारी सूज कमी होते. याचे सेवन करण्यासाठी एक तुकडा आल्याचा घ्या. ते हलके गरम करत गुळासोबत खा. याव्यतिरिक्त तुम्ही गुळ आणि आल्याचा हलवा सुद्धा तयार करून खाऊ शकता.
अर्थराइटिसचे दुखणे कमी होते
थंडीच्या दिवसात अर्थराइटिसची समस्या अधिक वाढली जाते. ही समस्या दूर करण्यासाठी गुळ आणि आल्याचे सेवन करावे. यामुळे अर्थराइटिसमध्ये होणारे दुखणे आणि सूज कमी होण्यास मदत होते. याचे सेवन करण्यासाठी या दोन्ही गोष्टी समप्रमाणात घ्या. यामुळे काही फायदे होऊ शकतात.
शरीराची सुस्ती दूर होते
शरीरातील सुस्ती दूर करण्यासाठी तुम्ही आल आणि गुळचे एकत्रित सेवन करा. यामध्ये थोडेसे त्रिफळा मिक्स करा. आता हे मिश्रण गरम पाण्यासह खा. याचे सेवन केल्याने सुस्ती काही दिवसात दूर होईल.
स्किनसंबंधित समस्या दूर होते
स्किनवर होणारी समस्या दूर करण्यासाठी गुळ आणि आलं खा. यामुळे शरीरात होणारा पित्ताचा विकार दूर करून स्किनवर चमक येऊ शकते. मुख्य रुपात स्किनवर येणारे पिंपल्स, डाग दूर होऊ शकतात.
लठ्ठपणापासून सुटका
आलं आणि गुळाचे एकत्रित सेवन केल्याने वाढता लठ्ठपणा कमी होऊ शकतो. आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. जर तु्म्हाला लठ्ठपणा कमी करायचा असेल तर नियमित रुपात आलं आणि गुळापासून तयार करण्यात आलेली चहा प्यावी. (Winter Health Care)
सर्दी-खोकल्यापासून दूर राहता
आलं आणि गुळाचे सेवन केल्याने सर्दी-खोकल्याच्या समस्येपासून दूर राहताय त्याचसोबत घशात होणारी खवखवची समस्या कमी होऊ शकते. याचे सेवन केल्याने काही लाभ होतात. लक्षात ठेवा की, जर तुमची समस्या अधिक वाढली असेल तर हेल्थ एक्सपर्टचा सल्ला जरूर घ्या.
हेही वाचा- सणासुदीला अशाप्रकारचे कुकिंग ऑइल वापरण्याआधी ‘हे’ वाचा