Home » थंडीत आलिया भट्ट सारखा ग्लो हवायं? ‘या’ टिप्स करा फॅालो

थंडीत आलिया भट्ट सारखा ग्लो हवायं? ‘या’ टिप्स करा फॅालो

थंडीत प्रत्येकाला त्वचा ड्राय होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावेळी काही गोष्टींची काळजी घेत ड्राय त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता.

by Team Gajawaja
0 comment
Winter Skin Care
Share

थंडीत प्रत्येकाला त्वचा ड्राय होण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. यावेळी काही गोष्टींची काळजी घेत ड्राय त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता. त्वचा ड्राय होण्यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकी एक म्हणजे उन्हात दीर्घकाळ बसल्याने त्वचा काळवंडली जाते. यामुळे वेळीच त्वचेची काळजी घेतली पाहिजे. महागडे ब्युटी प्रोडक्ट्स ऐवजी काही घरगुती उपायांनी देखील थंडीत ड्राय त्वचेच्या समस्येपासून दूर राहू शकता. आलिया भट्ट सारखा थंडीत ग्लो हवायं तर पुढील काही घरगुती उपाय करू शकता. (Winter Skin Care)

मोहरीचे फेसपॅक
मोहरीचे तेल त्वचेसाठी सर्वाधिक उत्तम मानले जाते. पण माहितेय का, मोहरी हे त्वचेचासाठी अत्यंत फायदेशीर असते. मोहरीचा फेसपॅक घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करू शकता.
-मोहरी मिक्सरमधून बारीक करून घ्या
-मोहरीच्या पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करा
-मोहरीचा तयार करण्यात आलेला पॅक चेहरा आणि मानेला लावून ठेवा
-पॅक सुकल्यानंतर थंड पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुवा
-आता चेहऱ्याला आणि मानेला मॉइश्चराइझर लावा

बेदाण्यांचा फेस पॅक
थंडीत चमकदार, स्पॉटलेस त्वचेसाठी बेदाण्यांचा फेस पॅक नक्की चेहऱ्याला लावू शकता. या फेस पॅकमुळे त्वचेच्या रंगात देखील बदल झालेला जाणवेल.
-बेदाण्याचा फेस पॅक तयार करण्यासाठी एक चमचा बेदाण्याची पावडर घ्या
-बेदाण्याच्या पावडरमध्ये चार चमचे दूध मिक्स करा
-बेदाण्याचा तयार करण्यात आलेला फेस पॅक चेहऱ्याला लावा
-फेस पॅक ड्राय झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा
-बेदाण्याच्या फेसपॅकमुळे त्वचा मऊ होईल

नारळाचे तेल
डेली रूटीन स्किन केयरमध्ये नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाच्या तेलापासून फेसपॅक तयार करण्यासाठी फार वेळ लागणार नाही.
-नारळाच्या तेलाचा फेसपॅक तयार करण्यासाठी तेलात दोन थेंब लिंबाचा रस मिक्स करा
-तयार करण्यात आलेला पॅक रात्रभर लावून ठेवू शकता
-सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा
-सकाळी चेहरा मऊ आणि ग्लो दिसेल
-सातत्याने सात दिवस नारळाच्या तेलाचा फेसपॅक लावल्याने त्वचा ग्लो आणि सुंदर दिसेल (Winter Skin Care)

टीप : या लेखातील माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. ‘gajawaja.in’ याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी डॉक्टर, वैद्य किंवा तज्ञांशी संपर्क साधावा.


हेही वाचा-  Make up kit दुसऱ्यांसोबत शेअर केल्याने होईल नुकसान


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.