पावसाळा संपला की सगळे अगदी आतुरतेने वाट बघत असतात ती, हिवाळ्याची. पावसाची चीक चीक नकोशी झाल्यानंतर सगळ्यांना हिवाळा हवाहवासा वाटत असतो. हिवाळा हा ऋतू आपल्या शरीर आणि आरोग्याच्या दृष्टीने वर्षातील सर्वात चांगला आणि उत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये भूकही लागते, पचनशक्ती देखील उत्तम असते. त्यामुळे खाल्लेले उत्तम पचते आणि शरीर सुरळीत काम करत असते. सोबतच शरीराच्या उत्तम विकासासाठी व्यायाम सर्वात श्रेष्ठ असतो. हाच व्यायाम या ऋतूमध्ये करणे खूपच फायदेशीर समजले जाते.
हिवाळा हा ऋतू अनेक बाजूनी लाभदायक आणि फायदेशीर आहे. मात्र यासोबतच हा ऋतू आपल्यासोबत काही त्रास देखील घेऊन येतो. यातलाच एक मुख्य त्रास म्हणजे हिवाळ्यामध्ये कोरड्या हवेमुळे आपली त्वचा कोरडी पडते आणि तिला खाज येते, तडे जातात. त्यामुळे या ऋतूमध्ये त्वचेची काळजी सर्वाधिक घ्यावी लागते. त्यातही ज्यांची त्वचा कोरडी आहे त्यांनी तर अधिकच काळजी घेणे श्रेयस्कर असते.
आता हिवाळा सुरु झाला असून आता हळू हळू वातावरणात थंडावा जाणवू लागला आहे. आपली त्वचा देखील आता कोरडी होत असल्याचे आपल्याला जाणवू लागले आहे. तळपाय कोरडे होत आहे. त्वचा देखील निघत आहे. ओठ देखील कोरडे होत आहे. मग असे होऊ नये यासाठी काय केले पाहिजे. कितीपण व्हॅसलिन लावले तरी ते जास्त काळ टिकत नाही. मग त्वचेमध्ये सतत ओलावा टिकवण्यासाठी आणि तिला कोरडे होण्यापासून वाचवण्यासाठी काय केले पाहिजे. यासाठी काही घरगुती उपाय देखील आहेत, तेच आज आपण जाणून घेऊया.
– रोज सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम चेहरा कोमट पाण्याने फेसवॉशचा वापर करून चेहरा धुवा. थंड पाण्याचा वापर चेहरा धुण्यासाठी केल्याने त्वचा कोरडी पडते.
– हिवाळ्यात आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरू नका आणि जास्त वेळ पाण्यात राहू नका.
– हिवाळ्यामध्ये आंघोळ करताना शरीराला जास्त घासू नका. आंघोळ झाल्यानंतर त्वचेला मॉइश्चरायस ठेवण्यासाठी ओलसर त्वचेवरच मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.
– त्वचा स्वच्छ करण्यासाठी एका भांड्यात हरबरा डाळीचे पीठ, एक चमचे हळद, 2 चमचे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट त्वचेवर लावा तसे केल्यास तुमची त्वचा चमकदार होईल.
– हिवाळ्यात सामान्य मॉइश्चरायजर वापरण्याऐवजी ऑइल बेस्ट मॉइश्चरायजरचा वापर हिवाळ्यामध्ये करावा. त्वचेला अधिक चांगले बनवण्यासाठी रात्री डीप मॉइश्चरायझर देखील वापरू शकता.
– हिवाळ्यात तुम्ही घराबाहेर पडताना नेहमी मॉइश्चरायझर सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन तुमच्या त्वचेची अतिरिक्त सूर्य किरणांपासून सुरक्षा करून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते.
– त्वचा हायड्रेट करण्यासाठी लव्हेंडर ऑईल, खोबरेल तेल, प्राईमरोज ऑईल सारख्या इसेन्शिअल ऑईलचा वापर करा.
– थंडीच्या दिवसांत ओठ मऊ ठेवण्यासाठी कोरफड, साखर आणि नारळाच तेल, हळद, दूध, आणि बदाम तेल आणि लिंबू यांपासून बनलेले स्क्रब ओठांसाठी लाभदायक असते.
– मृत त्वचा काढून टाकण्यासाठी स्क्रबरचा वापर करा. आठवडयातून दोनदा चेहरा स्क्रब करा मात्र त्वचा जास्त कोरडी होणार नाही याची काळजी घ्यावी.
– हिवाळ्यामध्ये गुलाबपाणी आणि ग्लिसरीन असलेली उत्पादने वापरणे देखील फायदेशीर ठरू शकते.यामुळे त्वचा मुलायम आणि हायड्रेट राहील.
– हिवाळ्यामध्ये गरम पाणी आणि साबणाचा खूप कमी करा जमल्यास करूच नका. त्वचेला हिवाळ्यात खाज सुटली असेल तर, कोमट पाण्याने अंघोळ करा. त्यानंतर लगेच मॉइश्चरायझर क्रीम किंवा पेट्रोलियम जेली लावा.
– कडाक्याच्या थंडीत बाहेर पडणे टाळा. अती थंड तापमानामुळे काही जणांना त्वचेचे विकार किंवा हिमबाधा होऊ शकतात.
– हिवाळ्यातील सूर्य देखील त्वचेसाठी धोकादायक असू शकतो. तुम्ही दीर्घकाळ घराबाहेर असाल तर सुर्यापासून बचाव करण्यासाठी योग्य सनस्क्रीन वापरावे.
==========
हे देखील वाचा : जाणून घ्या तुळशी माळ घालण्याचे फायदे आणि नियम
==========
– थंडीच्या दिवसात रोज रात्री झोपण्यापूर्वी बेंबीवर मोहरीचे तेल लावल्याने ओठांची आर्द्रता टिकून राहते, तर दुसरीकडे हात आणि पायांच्या तळव्यावर मोहरीचे तेल लावल्याने त्वचेची आर्द्रता कधीच कमी होत नाही.
– थंडीच्या दिवसात दुधाची साय चेहऱ्यासाठी चांगली असते. त्यात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. हे चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने धुवा. असे केल्याने चेहरा मॉइश्चरायझेशन राहतो.
– स्ट्रॉबेरी, कॅनबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी खाणे फायद्याचे ठरते. बेरीमध्ये जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात, ज्यामुळे आपली त्वचा निरोगी आणि चमकदार राहण्यास मदत होते. हिवाळ्यात आहारात सूप, कोशिंबीर, रस आणि दूध यांचा समावेश करावा. यामुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल.