इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम राईसी यांचे एका हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. रईसी यांच्या निधनानंतर इराणचे राष्ट्राध्यक्षपद कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे. रईसी यांचा मृत्यू धक्कादायक आहे. कट्टरपंथीय असलेल्या रईसी यांची जागा कोण घेणार यावर इराणमध्येच नाही तर जगभरात चर्चा चालू आहे. (Zohra Elahian)
मात्र या सर्वानाच एका नावानं धक्का बसला आहे. इराणसारख्या कट्टर मुस्लिम देशात राष्ट्राध्यक्ष पदासाठी आता एका महिलेचे नाव सर्वाधिक चर्चेत आले आहे. विशेष म्हणजे, ही महिलाही कट्टरपंथीय म्हणून ओळखली जाते. याशिवाय अत्याधुनिक शस्त्रांची तिला आवड आहे. फारकाय रईसी यांनी जसे आपल्या विरोधकांना फासावर लटकवले होते, तसेच या महिलेनंही केले आहे. (Zohra Elahian)
या महिलेचे नाव आहे, जोहरेह इलाहियान. सध्या आधुनिक शस्त्रे हातात घेतलेल्या जोहरेह यांचे फोटो व्हायरल होत आहेत. इराणच्या संभाव्य राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचे नाव घेतले गेले तरी, त्या रईसी यांच्यापेक्षाही पाऊलभर तरी अधिक कट्टरपंथीय आहेत. पण इराणची महिला स्वातंत्र्यविरोधी अशी झालेली प्रतिमा त्यांच्यामुळे पुसली जाईल, अशी अपेक्षा आहे. (Zohra Elahian)
इराणच्या इतिहासात १९ मे २०२४ हा दिवस सर्वात धक्कादायक मानला जाईल. कारण याच दिवशी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर खाली झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या जागेसाठी मोठी चढाओढ चालू आहे. इराण हा कट्टरपंथीयांचा देश म्हणून ओळखला जातो. इराणमध्ये सर्वाधिक बंधने ही महिलांवर आहेत.(Zohra Elahian)
गेल्या वर्षभरात याच इराणमध्ये हिजाब आंदोलन गाजले आहे. महिलाविरोधी मानल्या जाणा-या याच इराणमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा होण्याची शक्यता आहे. येथे २८ जून रोजी नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी देशात मतदान होणार आहे. इब्राहिम रायसीच्या जागी कोण हे या निवडणुकीतून स्पष्ट होणार आहे. आतापर्यंत सुमारे ४० उमेदवारांनी या जागेसाठी नोंदणी केली आहे. त्यात माजी अध्यक्ष महमूद अहमदीनेजाद, माजी कमांडर वाहिद हगानियन, सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे माजी सचिव सईद जलिली यांचाही समावेश आहे.(Political News)
यासोबत माजी महिला खासदार जोहरेह इलाहियान यांनीही या जागेसाठी आपले नाव घोषित केले आहे. ५७ वर्षाच्या जोहरेह या एकमेव महिला उमेदवार ठरल्या आहेत. त्यांची या पदावर निवड झाल्यास इराणच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला राष्ट्राध्यक्ष बनण्याचा विक्रम जोहरेह यांच्या नावावर लिहिला जाणार आहे. इलाहियान यांच्या नावाचा फक्त इराणमध्येच नाही तर जगभर दबदबा आहे.(Zohra Elahian)
ज्या हिजाबचा इराणच्या महिला विरोध करीत आहेत, त्याच हिजाबच्या जोहरेह कट्टर समर्थक आहे. त्यांच्या कट्टर विचारांमुळे कॅनडाच्या सरकारने मार्चमध्ये जोहरेह यांच्यावर बंदी घातली आहे. इराणमध्ये ज्या महिलांनी हिजाबचा विरोध करीत आंदोलन करीत होत्या, त्या सर्वांना फाशीची शिक्षा द्यावी अशी शिफारस त्यांनी न्यायालयाकेड केली होती. (Latest International News)
कट्टर विचारांचा प्रभाव असलेल्या जोहरेह या डॉक्टर आहेत. त्या दोनवेळा खासदार राहिल्या आहेत. इराण संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण समितीच्या सदस्यपदीही जोहराह होत्या. आता राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणा-या जोहराह यांनी अर्ज दाखल केल्यावर भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे वचन देत ‘मजबूत सरकार, मजबूत अर्थव्यवस्था आणि मजबूत समाज‘ असा नारा दिला आहे. मात्र इराणमधील राजकीय तज्ञांच्या मते इलाहियान जोहरेह यांचे वय राष्ट्रपती होण्यासाठी खूपच कमी असून त्यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता वर्तवली आहे.(Zohra Elahian)
इलाहियान जोहरेह या इराणच्या राष्ट्रपती होणार की नाही हे तेथील पालक परिषदेवर अवलंबून आहे. ‘पालक परिषद‘ हा इकाणमधील उच्च अधिकाऱ्यांचा गट आहे. हीच मंडळी संविधानातील कलमांचा अर्थ स्पष्ट करु शकतात. या परिषदेने इतिहासात अनेकवेळा महत्त्वाच्या पदांवर महिला उमेदवारांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवली आहे. आता थेट इराणच्या राष्ट्रपतीपदावरच महिलेची उमेदवारी पालक परिषद कशा स्वरुपात घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Zohra Elahian)
============
हे देखील वाचा : ‘या’ मुलानं नुकताच भारताच्या शिरपेचात सोनेरी तुरा रोवला
============
कारण इलाहियान जोहरेह यांची ओळख ही कट्टरपंथीय महिला अशीच आहे. त्या स्वतः हिजाब घालतात. त्यांच्याकडे अत्यंत आधुनिक अशी शस्त्रास्त्रे आहेत. इराणच्या विरोधकांना बंदुकीनेच उत्तर द्यावे अशा मताच्या त्या आहेत. पालक परिषदेने त्यांची उमेदवारी मान्य केली तरीही ही घटना इराणच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे.
सई बने