Home » 2038 ला खरच पृथ्वीवर उल्का आदळणार का ?

2038 ला खरच पृथ्वीवर उल्का आदळणार का ?

by Team Gajawaja
0 comment
Asteroid Strike
Share

आजपासून साडे सहा कोटी वर्षांपूर्वी एका भला मोठा म्हणजेच जवळपास 10 किलोमीटर व्यासाचा उल्का पृथ्वीवर आदळला आणि तब्बल 10 कोटी वर्ष पृथ्वीवर राज्य करणारी डायनॉसोर ही प्रजाती नष्ट झाली. आता तुम्हीच विचार करून बघा, हा आघात किती महाभयंकर असेल. त्यानंतर पृथ्वीवर असे आघात होतच राहिले, पण त्यांचा इतका मोठा परिणाम पृथ्वीवर झाला नाही. सध्या जग फार आधुनिक झालं आहे. त्यातच अंतराळ क्षेत्रातही आपण भरारी घेतली आहे, पण प्रकृतीपुढे सगळंच फिकं. तिचा प्रकोप आपल्याला कधीच झेलता आला नाही. आता याच प्रकृतीचा प्रकोप थेट आकाशातून येत आहे, तेसुद्धा अवघ्या 14 वर्षानंतर. 2038 साली ! आता तुमच्या मनात ते न्यूज चॅनेलवरच्या आता पृथ्वीचा अंत होणार का ? वगैरे प्रश्न तयार झाले असतील, पण घाबरण्याची गरज नाही. (Asteroid Strike)

आपल्या पृथ्वीचं वय साडे चार अब्ज वर्ष आहे. तसे पृथ्वीने अंतराळातून आलेले बरेच धोके पचवले आहेत. त्यातच सध्या पृथ्वीचा अंत होणार, अशी आवई अनेकदा उठली होती. 2012 साली पृथ्वीचं अस्तित्व संपणार, ही बातमी तर अक्षरश: जगभरातल्या लोकांनी खरी मानली होती. मात्र पृथ्वी अजूनही धडधाकट असून अंतराळात मुक्त विहार करत आहे. पण यामुळे अंतराळातून येणारा धोका संपतो, असं नाहीये. तसं पाहायला गेलं तर दररोज पृथ्वीवर हजार एक उल्का आदळतच असतात. पण ते फारच छोटे असतात, त्यामुळे काही हवेतच नष्ट होतात, तर काही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचतात. पण त्यांचा काहीच धोका नसतो. (Asteroid Strike)

पण तरीही पृथ्वीच्या अवतीभोवती आपल्या सूर्यमालेत कितीतरी महाकाय उल्का आहेत. ज्या अनेकदा पृथ्वीजवळून पण जातात. अशाच पृथ्वीच्या जवळून जाणाऱ्या आणि प्रसंगी पृथ्वीला धडक देणाऱ्या उलकेचा एक रिपोर्ट नासाने जारी केला आहे. या रिपोर्टनुसार 12 जुलै 2038 साली एक भला मोठा asteroid किंवा उल्का पृथ्वीवर आदळण्याचा 72% इतका अंदाज वर्तवण्यात आला आहे. नासाच्या जॉन हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीने हा रिपोर्ट जारी केला आहे. या रिपोर्टच्या संशोधन कार्यात नासासोबत जगभरातील 100 एजन्सीसुद्धा काम करत आहेत.

आता रिपोर्ट जारी झालाच आहे तर तशी तयारीसुद्धा नासाने सुरू केली आहे. नासाचे लिंडली जॉनसन यांनी म्हटलय की, एखादा लघुग्रह किंवा उल्का पृथ्वीवर आदळणं, ही एक नैसर्गिक आपत्ति आहे. आणि ही आपत्ती टाळण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न केले पाहिजेत. यावर नासा काम करत आहे. आपण सहसा सिनेमांमध्ये अनेकदा उल्का आदळून महाप्रलय येतो, असं पाहिलच असेल. त्यामुळे उल्का जर 5 किमी किंवा त्याहून जास्त मोठा असेल, तर विनाश अटळच आहे. पण त्यांना रोखण्यासाठी आणि त्यांच्यावरच पाळत ठेवण्यासाठी वैज्ञानिकांनी संशोधन सुरू केलं आहे. कोणता उल्का पृथ्वीच्या किती जवळ आणि किती दूर आहे, याचीही माहिती संशोधकांकडे आहे. (Asteroid Strike)

====================

हे देखील वाचा : टर्ब्युलन्स म्हणजे नेमकं काय ?

====================

आता उल्का पृथ्वीवर आदळला तर काय होऊ शकतं ? पहिलं तर विनाशकारी भूकंप यायला सुरुवात होईल. त्सुनामी येतील. संपूर्ण जीवसृष्टी धोक्यात येईल. शहरं पाण्याखाली जातील. न्यूक्लिअर पावरप्लांट्सचे स्फोट घडतील. थोड्यात दिवसांत प्रचंड रोगराई वाढेल आणि हळू हळू पृथ्वीवरचे सर्व जीव मरु लागतील आणि अखेर या पृथ्वीवर काहीच उरणार नाही. (Asteroid Strike)

एकवेळ उल्का आदळून नाही पण पृथ्वीचा अंत तर निश्चितच आहे. प्रसिद्ध वैज्ञानिक कार्ल सेगन यांनी एकदा म्हटलं होतं, आजपासून 5 अब्ज वर्षानंतर जेव्हा सूर्य लाल राक्षसाचं रूप धारण करेल आणि संपूर्ण सूर्यमालेसह पृथ्वीलाही गिळून टाकेल, त्यानंतर नवीन जग, नवीन आकाशगंगा, नवीन तारे, नवी जीवसृष्टी अस्तित्वात येईल, पण पृथ्वी नावाचा एखादा ग्रह या ब्रम्हांडात अस्तित्वात होता, हे त्यांना माहीत नसेल.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.