चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा क्रिकेटच्या महायुद्धांपैकी एक ! एक असा आयसीसी इव्हेंट ज्याची वर्ल्ड कपप्रमाणेच वाट पाहिली जाते. यंदा या स्पर्धेचा यजमान पाकिस्तान जरी असला, तरी भारत काही पाकिस्तानी भूमीवर खेळणार नाहीये. त्यामुळे इंडिया-पाकिस्तानच्या सर्व match पाकिस्तानबाहेर होणार, हे तर तुम्हाला माहितीच आहे. पण चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु व्हायच्या आधीच भारताला सर्वात मोठा झटका लागला, ते म्हणजे भारताचा हुकुमाचा एक्का असलेल्या तगडा बॉलर जसप्रीत बुमराह इंजरीमुळे खेळू शकणार नाही. त्याच्या जागी नवख्या हर्षित राणाला टीममध्ये घेण्यात आलं आहे. पण बुमराहची अनुपस्थिती रोहित सेनेला परवडेल का ? इंडिया यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकू शकेल का ? जाणून घेऊ. (Champions Trophy)
१९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा धमाका रंगणार आहे. त्यातच भारताच्या नॉकआउट स्टेजमध्ये तीन match होणार आहेत आणि सर्वच match दुबईमध्ये होणार आहेत. भारत २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत भिडणार आहे. नंतर २३ फेब्रुवारीला हाय voltage भारत-पाकिस्तान match होणार आहेत. शेवटी २ मार्चला भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हानं असणार आहे. Points table मध्ये top च्या दोन टीम्स सेमीजसाठी qualify होतील. हायब्रीड मॉडेलमुळे शेड्युल बरच बदललं आहे. त्यामुळे पाकिस्तानला याचा चांगलाच फाटका बसलाय. (Match)
इंडियाचं squad पहायचं झालं तर कॅप्टन रोहित शर्मा, व्हाईस कॅप्टन शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, अक्षर पटेल, washington सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, हर्षित राणा, रविंद्र जडेजा, अर्शदीप सिंग, वरून चक्रवर्ती हे भारताला चॅम्पियन करायला मैदानात उतरणार आहेत. पण भारताचा आघाडीचा बॉलर बुमराह यंदा या स्पर्धेला मुकला आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये जबरदस्त बॉलिंग करून बुमराहने कांगारूंच्या चिंधड्या उडवल्या होत्या. त्यामुळे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये तो भारताचा पाया होता. पण आता तो नसल्यामुळे यंदाची स्पर्धा थोडी जड जाऊ शकते. (Champions Trophy)
बिजीटीमध्ये सिडनीत खेळल्या गेलेल्या शेवटच्या कसोटीत त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे उपचारानंतर त्याला आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नुकत्याच इंडिया आणि इंग्लंडची वनडे सिरीज पार पडली. यामध्ये भारताने इंग्लंडला व्हाईट wash केलं. यामध्ये सगळ्यांचाच performance तोडीचा राहिला. त्यामुळे एकंदरीत गौतम गंभीरच्या नेतृत्वातील टीम इंडिया वरचढ ठरू शकते. आता जरा भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या STATS वर नजर टाकूया. (Champions Trophy)
============
हे देखील वाचा : Blood Moon : ग्रहांची परेड, चंद्रग्रहण, ब्लड मून आणि बरंच काही !
============
भारत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सर्वच एडिशनमध्ये सहभागी होता. यामध्ये २००२ आणि २०१३ साली भारताने ही ट्रॉफी जिंकली आहे. २००२ मध्ये भारत श्री-लंकेसोबत COMBINED विनर होता. २००० आणि २०१७ साली भारत रनर अप राहिला. यामध्ये सर्वाधिक भारत आणि ऑस्ट्रेलियाच दोन-दोन वेळा विनर राहिलेले आहेत. यंदा ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमला २० कोटी रुपये विनिंग प्राईज म्हणून मिळणार आहेत, तर रनर अपला १० कोटी मिळतील. त्यामुळे भारत आता तिसरी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून या स्पर्धेचा किंगमेकर बनतोय का ? याकडेच सर्वांचं लक्ष आहे.