Home » ऑस्करच्या सोहळ्यास सहभागी होण्यास विल स्मिथला 10 वर्षांसाठी बंदी

ऑस्करच्या सोहळ्यास सहभागी होण्यास विल स्मिथला 10 वर्षांसाठी बंदी

by Team Gajawaja
0 comment
थप्पड
Share

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने हॉलिवूड अभिनेता विल ‘थप्पड’ प्रकरणी कठोर कारवाई करत 10 वर्षांसाठी ऑस्कर सोहळ्याला उपस्थित राहण्यास बंदी घातली आहे. विल स्मिथच्या ऑस्कर अवॉर्ड शोमध्ये प्रसिद्ध अमेरिकन कॉमेडियन आणि होस्ट ख्रिस रॉकला ‘थप्पड’ मारल्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर अकादमीने ही कारवाई केली आहे.

विल स्मिथ यापुढे पुढील 10 वर्षे ऑस्कर सोहळ्यात सहभागी होऊ शकणार नाही. वास्तविक, ऑस्कर अवॉर्ड शो दरम्यान, विल स्मिथने त्याची पत्नी आणि अभिनेत्री जाडा पिंकेट स्मिथ विरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल होस्ट क्रिस रॉकला थप्पड मारली. मात्र, या घटनेनंतर त्यांनी माफी मागितली होती आणि अकादमीने केलेली कारवाई मान्य करत असल्याचे त्याने सांगितले होते.

Will Smith Banned: Chris Rock ला कानशिलात लगावणे विल स्मिथला पडले महागात; अकादमीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास 10 वर्षांसाठी बंदी

====

हे देखील वाचा: युक्रेनमध्ये चर्चा आहे या दोन लढवय्या महिलांची… 

====

काय म्हणाली अकादमी?

अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अँड सायन्सेसचे अध्यक्ष डेव्हिड रुबिन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅन हडसन यांनी एका निवेदनात म्हटले आहे: “94 व्या ऑस्करचा उद्देश गेल्या वर्षी अविश्वसनीय काम केलेल्या अनेक लोकांचा उत्सव साजरा करण्यासाठी होता. पण यादरम्यान विल स्मिथच्या अस्वीकार्य वागण्याने सोहळ्याचा रंग बदलला.

थप्पड मारल्यानंतर ‘किंग रिचर्ड’ चित्रपटातील अभिनयासाठी विल स्मिथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, पण या घटनेने पुरस्कार सोहळ्याची मजाच उधळली.

94व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात क्रिस रॉकने विल स्मिथची पत्नी जाडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवली होती. तिची टक्कल पडण्याची खिल्ली उडवताना, कॉमेडियनने त्याची तुलना GI Gen 2 शी केली. विल स्मिथला हा विनोद अजिबात आवडला नाही आणि त्याने स्टेजवर जाऊन ख्रिस रॉकला थप्पड मारली.

Sometimes Sh-t Happens”: Stars React to Will Smith and Chris Rock's Oscar  Conflict at the Vanity Fair Oscar Party | Vanity Fair

====

हे देखील वाचा: कीवमध्ये रशियन हल्ल्यात प्रसिद्ध युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यु

====

विल स्मिथने अलीकडेच अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि यासह त्याने पुन्हा एकदा या घटनेबद्दल ख्रिस रॉक आणि सर्वांची माफी मागितली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.