गेल्या काही दिवसांपासून बांगलादेश प्रचंड पेटलाय. आरक्षणाच्या मुद्द्यावरून लाखो लोकं रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच या हीसंक आंदोलनांमध्ये हजारो लोकांचा जीव गेला आहे. त्यातच आता बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे आणि त्या भारतात आल्या आहेत. यानंतर बांग्लादेशी आर्मीने सगळ्याच गोष्टींचा ताबा घेतला आहे. शेख हसिना गेल्या 20 वर्षांपासून बांगलादेशच्या राजकारणात एक तगड्या नेत्या होत्या, मात्र आता त्यांच्यावर देशातूनच बाहेर जाण्याची परिस्थिती उद्भवली आहे. याच शेख हसिना आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत एक घटना घडली होती. ही घटना इतकी भयानक होती की, जर शेख हसिना बांगलादेशमध्ये असत्या, तर कदाचित त्या जिवंत राहुच शकल्या नसत्या. काय घडलं होतं त्यांच्या कुटुंबासोंबत ? यावेळी शेख हसीना कुठे होत्या ? 1975 हे साल बांगलादेशी इतिहासातील सर्वात दुर्दैवी वर्ष का आहे ? (Sheikh Hasina)
शेख हसिना यांचा इतिहास सुरू होतो शेख मूजीबूर रहमान यांच्यापासून ! बांगलादेश देशाचे निर्माते आणि बांगलाभूमीवर जन्मलेले सर्वात महान व्यक्ती अशी त्यांची ओळख ! 1971 साली बांगलादेशची निर्मिती झाल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान शेख मूजीबूर रहमानच होते. त्यांची एकूण पाच मुल हसिना, कमाल, जमाल, रेहाना आणि रसेल ! 1972 साली बांगलादेशचे पंतप्रधान झाल्यानंतर 25 जानेवारी 1975 साली ते राष्ट्रपती झाले. मात्र याच दरम्यान बांगलादेशमध्ये भ्रष्टाचार वाढायला लागला होता. मूजीबूर रहमान यांच्या फॅमिलीवर नेपोटीजमचे आरोपसुद्धा करण्यात आले होते. याचदरम्यान संधि साधून बांगलादेशातील कम्युनिस्टांनीसुद्धा आपला फणा काढला. (Sheikh Hasina)
याच दरम्यान मेजर सय्यद फारूक रहमान, खोंडाकेर अबदूर रशीद, मेजर शरिफूल हक दलीम, मोहिउद्दीन अहमद अशा अनेक नेत्यांनी आणि आर्मी ऑफिसर्सनी मूजीब यांची हत्या करण्याचा कट रचला होता. नागरिकांनी विद्रोह सुरू केलाच होता यासोबतच सैन्यानेही विद्रोह सुरू केला. पण शेख मूजीबूर रहमान यांच्यासोबत काहीतरी भयानक घडेल, असं त्यांना वाटलं नव्हतं. तो दिवस होता, 15 ऑगस्ट 1975 ! भारतातही आणीबाणी सुरू असल्यामुळे जनतेमध्ये आक्रोश पसरलाच होता. त्यावेळी शेख हसिना 28 वर्षांच्या होत्या आणि आपल्या पती वाजीद मियासोबत जर्मनीमध्ये होत्या. त्यांच्यासोबत त्यांची बहीण शेख रेहानासुद्धा होती. बांगलादेशमध्ये वातावरण चांगलं नसल्यामुळे त्यांना जर्मनीमध्येच थांबण्याचं सांगण्यात आलं होतं.
यावेळी राष्ट्रपती असलेल्या शेख मूजीबुर रहमान यांच्या घरावर अचानक बांगलादेशी आर्मीने हल्ला चढवला. मेजर हुडा यांच्या नेतृत्वात फर्स्ट आर्मर्ड डिवीजनंन आणि बंगाल लांसर्सच्या टीमने हा हल्ला केला. यावेळी मूजीबूर रहमान यांच्या सेक्युरिटीने त्यांना रोखलंसुद्धा नाही. घरात स्वत शेख मूजीबूर रहमान, त्यांची पत्नी. त्यांचा लहान मुलगा रसेल, त्यांचे दोन मुलं जमाल आणि कमाल, दोन सुना, भाऊ शेख नासेर, त्यांचे नोकर इतर पोलिस अधिकारी असे सर्व होते, फक्त शेख हसिना आणि शेख रेहाना यांना सोडून ! गोळ्यांचा आवाज अजून शेख मूजीबूर यांनी आधी आर्मी चीफ जनरल शफ़ीउल्लाह यांना फोन केला होता. ते म्हणाले होते की, तुमची आर्मी आमच्या घरात घुसली आहे. कमालला त्यांनी गोळ्या झाडल्या आहेत. आताच्या आता त्यांना मागे जाण्याचे आदेश द्या.
मुळात जनरल या सर्व कटात Involve नव्हते आणि त्यांना याची काहीच माहिती नव्हती. त्यांनी मूजीबूर रहमान यांना सांगितलं की, तुम्ही जर घराच्या बाहेर पडू शकत असाल, तर आम्ही प्रयत्न करतो. यानंतर फोन कट झाला. आपण आतापर्यंत ते सैनिक त्यांच्या घरात आले होते आणि त्यांनी एक एक करून सर्वांना मारायला सुरुवात केली. त्यांच्या 10 वर्षांच्या लहान मुलालाही सोडलं नाही. सगळ्यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. यावेळी मूजीबूर रहमान यांना राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आलं. मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर त्यांनाही गोळ्या झाडून मारण्यात आलं. यानंतर त्या सर्वांचे शव एका ठिकाणी एकत्र गाडण्यात आले आणि केवळ शेख मूजीबूर रहमान यांना दुसऱ्या ठिकाणी दफन करण्यात आलं. (Sheikh Hasina)
==============
हे देखील वाचा : कमला हॅरिस नेमक्या कोण ?
===============
दुसऱ्या दिवशी शेख हसिना आणि रेहाना यांच्यापर्यंत ही दु:खद बातमी पोहोचली होती. त्या तिथून थेट बांगलादेशला न जाता भारतात आल्या आणि 1981 पर्यंत भारतातच राहिल्या. विचार करा जर 15 ऑगस्ट 1975 च्या त्या दिवशी शेख हसीना आपल्या घरी असत्या, तर आज कदाचित त्या बांगलादेशच्या पंतप्रधान कधीच बनू शकल्या नसत्या. मात्र या घटनेच्या 49 वर्षानंतर आता पुन्हा अशीच परिस्थिती शेख हसीना यांच्यावर येऊन ठेपली आहे. यावेळी त्या बांगलादेशमध्येच होत्या. आणि परिस्थिती इतकी गंभीर होती की, त्या जर बांग्लादेशमधून निघाल्या नसत्या तर त्या लष्करशाहीच्या लक्ष्य झाल्या असत्या. पुन्हा एकदा भारतानेच त्यांना शरण दिली आहे. अशा प्रकारे शेख हसीना दोन वेळा वाचल्या आहेत. सध्या तरी बांग्लादेशची परिस्थिती अगदीच बिकट आहे. त्यातच नागरिकांनी Parliment सोबतच शेख हसीना यांचं घरसुद्धा गाठलं आहे. तिथे चोरया-माऱ्या केल्या आहेत. त्यामुळे आता शेख हसिना पुन्हा बांगलादेशला जातील की आपलं उरलं सुरलं आयुष्य देशाच्या बाहेरच काढतील, हे येणारा काळच दाखवेल. (Sheikh Hasina)