Home » पुतिनशाहीचा अस्त होणार का?

पुतिनशाहीचा अस्त होणार का?

by Team Gajawaja
0 comment
Vladimir Putin
Share

रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची सत्ता रशियामधून संपुष्ठात येईल की काय अशी चुणूक खुद्द रशियामध्ये दिसू लागली आहे. अगदी काही दिवसातच रशियाचे चित्र बदलले आहे. रशियाच्या रस्त्यावर चक्क रणगाडे चालतांना दिसत आहेत. यासर्वांसाठी कारण झाले आहे ते वॅगनर ग्रुपचे बंड आणि त्यांनी व्लादिमीर पुतिन यांना दिलेली धमकी. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासमोर त्यांच्या घरातीलच सुरक्षा सेनेनं आव्हान उभं केलं आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. व्लादिमीर पुतिन यांच्या वैयक्तिक वॅगनर ग्रुपने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वॅगनर ग्रुप आणि रशियन सैन्य यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. रशियाशी संबंधित या गटाचा नेता येवगेनी प्रिगोझिन याने मॉस्कोला शिक्षा करून बदला घेण्याची शपथ घेतली आणि रातोरात व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची सत्ता धोक्यात आल्याची चर्चा रशियात सुरु झाली आहे. त्यात भरीस भर म्हणजे, रशियाची राजधानी, मास्कोच्या रस्त्यावर रणगाडे उतरल्यानं नागरिकही भयभीत झाले आहेत.  

याला कारण ठरले आहे ते युक्रेनमधील वॅगनर प्रशिक्षण शिबिरावर झालेला क्षेपणास्त्र हल्ला. या हल्ल्यासाठी वॅगनर ग्रुपनं रशियाला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यात वॅगनरचे डझनभर सैनिक मारले गेले. त्या बदल्यात आता संघटनेनं चक्क पुतिन यांची सत्ताच उलटून लावण्याची निश्चय केला आहे. वॅगनर ग्रुप ही अतिरेकी विचारांची संघटना असल्याचे मानले जाते. आतापर्यंत ही संघटना पुतीन यांच्यासाठी काम करत होती, अशीही चर्चा आहे. मात्र याच संघटनेच्या वर हल्ला झाल्यानं त्यांनी थेट रशियालाच इशारा दिला आहे.(Vladimir Putin)  

यासंदर्भात वॅगनर ग्रुपच्या 62 वर्षीय येवगेनी प्रिगोझिन यांनी एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यात रशियाचे नेतृत्व उलथून टाकण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्य तैनात करण्याची शपथ घेतली. तसेच ज्यांनी आमच्या लोकांचा नाश केला त्यांना शिक्षा होईल. आम्ही मॉस्कोला जात आहोत आणि जो कोणी आमच्या मार्गात येईल त्याचा लगेच नाश करु अशी धमकीही प्रीगोझिनने दिली आहे. प्रीगोझिनने हा युक्रेनमधील हल्ल्याचे नेतृत्व करत होता.आता तोच रशियाविरुद्ध उठाव करीत आहे. (Vladimir Putin) 

वॅगनर ग्रुपचा प्रमुख येवगेनी प्रीगोझिन याच्या धमकीनंतर रशियात खळबळ उडाली आहे. रशियाच्या संरक्षण मुख्यालयात वाढ करण्यात आली आहे. रशियाचे लष्करी मुख्यालय असलेल्या रोस्तोव या इमारतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. लष्करी मुख्यालयाभोवती चिलखती वाहने आणि सशस्त्र सैनिक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय रशियाला धमकी देणा-या प्रीगोझिनला अटक करण्याच्या सूचना सैनिकांना देण्यात आल्या आहेत. आधीच रशियन सैन्य युक्रेनसोबतच्या युद्धानं बेजार झालं आहे. रशियान सैन्यात भरती होणा-या तरुणांच्या प्रमाणात कमालीची घट झाली आहे. अशात अंतर्गत बंद व्हायला लागल्यावर रशियाची डोकेदुखी वाढणार आहे. या सर्वात प्रीगोझिननंही आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. त्यानं रशियाच्या संरक्षण मंत्र्याची हाकालपट्टी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. सशस्त्र उठाव करणारच म्हणून पुन्हा रशियाला धमकावलं आहे. या सर्वांमुळे रशियातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. (Vladimir Putin)

========

हे देखील वाचा : राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पंतप्रधान मोदींकडून अनोखी भेट

========

वास्तविक वॅगनर ग्रुपला रशियाचे भाडोत्री सैन्य म्हणून ओळखले जाते. हा वॅगनर ग्रुप अतिरेकी विचारांचा ग्रुप आहे. त्यांची स्वतंत्र शस्त्रे आहेत.  त्यासाठी त्यांना रशियाही मदत करत असल्याची माहिती आहे. युक्रेन युद्धात सैन्य कमी पडू लागल्यानं रशियानं या वॅगनर ग्रुपची मदत घेतली होती. त्यांचे सैन्य युक्रेनमधील काबिज केलेल्या भागत बसवले होते. नेमके त्याच कॅम्पवर रशियानं क्षेपणास्त्र डागली आणि त्यात वॅगनर ग्रुपच्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला. यामुळे या ग्रुपचा प्रमुख प्रीगोझिन भडकला आहे. आधीच रशियाच्या एफएसबी सुरक्षा सेवेने त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला सुरू केला आहे. येवगेनी प्रीगोझिन आणि रशियाचे लष्करी उच्च अधिकारी यांच्यातील दीर्घकाळ चाललेला संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यामुळेच हा हल्ला झाल्याचा प्रिगोझिनचा आरोप आहे. येवढ्यावरच तो थांबला नाही तर त्यांनी रशियन नागरिकांना त्याच्या सैन्यात सामील होण्याचे आणि  मॉस्कोच्या लष्करी नेतृत्वाला शिक्षा देण्याचे आवाहन केले आहे. त्याच्या या भूमिकेमुळे रशियन संरक्षण विभाग सतर्क झाला असून रशियाच्या रस्त्यावर रातोरात रणगाडे उतरले आहेत. आधीच युक्रेन युद्धामुळे बेजार झालेल्या रशियन सैन्याला आता अशा अंतर्गत समस्यांनाही सामोरे जावे लागत आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.