Home » Ramayan : ‘आदीपुरुष’चा डाग नितेश तिवारीचं ‘रामायण’ पुसून काढणार का ?

Ramayan : ‘आदीपुरुष’चा डाग नितेश तिवारीचं ‘रामायण’ पुसून काढणार का ?

by Team Gajawaja
0 comment
Ramayan
Share

२ हजार करोडचा डीरेक्टर… १ हजार करोडचा व्हिलन… ९०० करोडचा हिरो… ७०० करोडचा सपोर्टिंग actor… २ ऑस्कर विजेते म्युझिक माएस्ट्रो… ८ ऑस्कर जिंकलेली व्हीएफएक्स कंपनी… हा आहे आजपर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट… नमित मल्होत्रा आणि दंगल फेम नितेश तिवारी यांच्या magnum opus रामायण! या चित्रपटाची खूप चर्चा सुरूच होती… पण ३ जुलैला या चित्रपटाने आपली पहिली झलक सादर केली आणि सिनेलव्हर्स पार वेडेच झाले. काही ठिकाणी अशाही कमेंट्स पहायला मिळाल्या की… हा ३ मिनिटांचा फर्स्ट ग्लीम्प्स अक्ख्या आदिपुरुष चित्रपटापेक्षा शंभर पटीने सरस आहे. एकीकडे नितेश तिवारींच्या ‘रामायण’चा गाजावाजा होतोय तर दुसरीकडे ओम राऊतसोबत आदिपुरुषला प्रचंड ट्रोल केलं जातंय… तशा आगामी रामायण चित्रपटाकडून सगळ्यांना खूपच अपेक्षा आहेत. त्यामुळे ‘आदीपुरुष’चा डाग नितेश तिवारींचं ‘रामायण’ पुसून काढणार का ? रामायण कसा सरस ठरू शकतो, जाणून घेऊ. (Ramayan)

दोन वर्षांपूर्वी रामायणावर आधारित एक व्हीएफएक्स आणि CGI ने भरलेला चित्रपट रिलीज झाला होता, तो म्हणजे आदीपुरुष… सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की, हा चित्रपट मार्केट खाऊन टाकेल. कारण एकतर भगवान श्रीराम म्हणजे श्रद्धेचा विषय, त्यात रामायण भारताचं सर्वात मोठ महाकाव्य, त्यातच श्रीराम यांची भूमिका साकारत होता… रेबेल स्टार प्रभास… त्यामुळे हा चित्रपट गाजणार असं सगळ्यांनाच वाटलं होतं. पण झालं त्याच्या उलट… चित्रपटाच्या गंडलेल्या व्हीएफएक्स, डायलॉग्स आणि एकदंरीत स्टोरीमुळे प्रचंड निगेटीव्हीटी याला मिळाली आणि आदिपुरुष बॉक्स ऑफिस बॉम्ब ठरला. यालाच एक वर्ष सरतो न सरतो, त्यातच नमित मल्होत्रा आणि डीरेक्टर नितेश तिवारी यांनी पुन्हा एकदा भव्य-दिव्य रामायण मुव्हीची घोषणा केली.

Ramayan

त्यातच श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत रॉकिंग स्टार यश असल्यामुळे सगळ्यांनाच याची उत्सुकता लागली होती… मध्यंतरी रणबीर आणि साई पल्लवीचा एक फोटोसुद्धा व्हायरल झाला होता. पण नुकतचा याचं फर्स्ट ग्लीम्प्स आल्यानंतर सोशल मिडीयावर यांच्या प्रत्येक फ्रेमला भयंकर प्रेम मिळालं. यात cast मधल्या पाच जणांची नावं OFFICIALLY REVEALED केली गेली…ते म्हणजे प्रभू श्री राम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर… रावणाच्या भूमिकेत यश.. सीता माताच्या भूमिकेत साई पल्लवी… पवनपुत्र हनुमान यांच्या भूमिकेत सनी देओल आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत रवि दुबे… पण यासोबतच याची rumoured कास्टसुद्धा सर्वात मोठा चर्चेचा विषय आहे. तर कोण आहेत हे रामायणमधले कलाकार जाणून घेऊ. (Ramayan)

तर रामायणमध्ये राजा दशरथ यांची भूमिका अरुण गोविल करणार आहेत , ज्यांची रामानंद सागर यांच्या सिरीयलमधली प्रभु श्रीराम यांची भूमिका जगभरात प्रचंड गाजलेली होती. भगवान शिव यांच्या भूमिकेसाठी मोहित रैनाचं नाव पुढे येत आहे. याआधी आपण सिरीयलमधून मोहितने साकारलेले महादेव तर पाहिलेच आहेत. याव्यतिरिक्त विवेक ओबेरॉय यामध्ये विद्युतजीवाची भूमिका साकारणार आहे. विद्युतजीवा हा शूर्पणखाचा पती होता. आता शूर्पणखा नाव समोरच आलं आहे तर ही भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंग साकारणार असल्याचं बोललं जात आहे.

Ramayan

याशिवाय आपल्या मराठमोळ्या आदिनाथ कोठारेला महत्त्वाचा रोल या चित्रपटात मिळाला आहे, ते म्हणजे श्रीराम यांचे बंधू भरत…आणखी दोन मराठी व्यक्तीमत्त्वाचं पुढे येत आहेत. ते म्हणजे अभिनेते अजिंक्य देव आणि सिनेमेटोग्राफर महेश लिमये… कुणाल कपूर हा इंद्रदेवाच्या भूमिकेत दिसू शकतो.. तर काजल अग्रवाल ही रावणाची पत्नी मंदोदरी साकारणार असल्याचं सांगितलं जातंय. लारा दत्ताला कैकयीचा रोल दिला गेला आहे. तर इंदिरा कृष्णन यांना माता कौसल्या यांचा रोल मिळाला आहे.

बरं ही भलीमोठी स्टारकास्ट इथेच संपत नाही. काही RUMOURS नुसार… चित्रपटात अनिल कपूर हे राजा जनक यांच्या भूमिकेत तर बिग बी अमिताभ बच्चन यांना जटायूचा रोल दिला गेला असल्याचं बोललं जात आहे. अजून एक महत्त्वाचं नाव या starcast मध्ये आहे, ते म्हणजे विक्रांत मस्सी… तर विक्रांत हा मेघनादच्या भूमिकेत दिसू शकतो. विजय सेतुपतीचं नाव विभिषणसाठी पुढे येत आहे. आणि कुंभकर्णसाठी बॉबी देओलच्या नावाची चर्चा आहे. (Ramayan)

Multi Star Cast बरोबरच ‘रामायण’ हा हिंदीतला पहिला सर्वाधिक Budget असणारा चित्रपट असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘रामायण’चं एकूण बजेट ८३५ कोटी असून हा All time big budget सिनेमा चक्क दोन Parts मध्ये Release होणार आहे. याची अजून एक चांगली बाजू म्हणजे हॉलीवूडचे ग्रेटेस्ट म्युझिक कंपोजर hans zimmer आणि भारताचे लीजंड आर रेहमान हे दोघे या चित्रपटाला म्युझिक देणार आहेत. पहिल्यांदाच हे दोन oscar winning दिग्गज एखाद्या चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. याशिवाय ८ वेळा ऑस्कर पुरस्कार जिंकणारी DNEG डीनेग ही व्हीएफएक्स कंपनी रामायणच्या व्हीएफएक्सचं काम करणार आहे.

=================

हे देखील वाचा : Kshiti Jog : क्षिती जोगने तिच्या आयुष्यातील ‘त्या’ खास व्यक्तीसाठी शेअर केली पोस्ट

=================

आतापर्यंत प्रभू श्रीराम यांची भूमिका जरी अनेक अभिनेत्यांनी साकारली असली तरी अरुण गोविल, गुर्मीत चौधरी, जितेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत. त्यामुळे, आता चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम कसे साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे. ‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीत Release होणार असून, २०२७ च्या दिवाळीत दुसरा भाग Release होणार आहे. Big Budget ‘रामायण’ चित्रपट Box Office वर १००० कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज तर आत्तापासूनच बांधण्यात येत आहे. तसं रामायणवर बरेच चित्रपट आले. त्यात रामानंद सागर यांनी साकारलेल्या रामायणाने तर इतिहासच रचला. संपूर्ण देश त्यावेळी एकत्र रामायण पहायचा. पण आजच्या आधुनिक काळात रामायण बनवण्याचं धनुष्य नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांनी पेललं आहे, त्यामुळे आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसचे सगळेच रेकॉर्ड मोडून काढतोय का ? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.