Home » जपान करणार ऑटोमॅटिक रस्ता ?

जपान करणार ऑटोमॅटिक रस्ता ?

by Team Gajawaja
0 comment
Japan Automatic Roads
Share

तंत्रज्ञानाचा सर्वाधिक वापर करणारा देश म्हणून जपानचे नाव घेतले जाते. जपान हा जगातीन अन्य देशांच्या मानाने तंत्रज्ञानात २० वर्ष पुढे आहे. घराघरात काम करण्यासाठी रोबोट ते आधुनिक मशिन्स आणि सर्वाधिक वेगवान अशा ट्रेन हे जपानचे वैशिष्ट आहे. आता जपाननं आपल्याच लौकीकात अधिक भर घातली आहे. कारण अन्य देशात गाड्या या रस्त्यांवरुन, पुलावरुन धावतात. मात्र जपान अख्खा रस्ताच धावणारा करीत आहेत. जपानचा हा धावणारा रस्ता तयार झाला की तंत्रज्ञानातील क्रांती (Revolution) म्हणून त्यांची नोंद होणार आहे.

ज्या काही अवघड गोष्टी वाटतात, त्या गोष्टी जपानमध्ये तंत्रज्ञानाने सुलभ झाल्या आहेत. या देशानं अविष्कार केले आहेत. या अविष्कारामध्ये आता धावणा-या रस्त्याची नोंद होणार आहे. कारण जपानमध्ये लवकरच 300 किमी लांबीचा स्वयंचलित रस्ता तयार होत आहे. आपल्याकडे रेल्वेस्थानक वा मॉलमध्ये जी एक्सलेरेटर दिसतात, त्याप्रमाणेच या स्वयंचलित रस्त्याची संकल्पना आहे. अर्थात हा रस्ता कायम धावणारा असणार आहे. जपान एक्सलेरेटरच्याच धर्तीवर जगात पहिल्यांदाच 300 किमी लांबीचा ऑटोमॅटिक रस्ताही तयार करत आहे. हा रस्ता २४ तास गाड्यांच्या सेवेत राहणार आहे. (Japan Automatic Roads)

रोज नवीन तांत्रिक अविष्कार होत असलेल्या जपानमध्ये गेल्या काही वर्षापासून या ऑटोमॅटिक रस्त्याबाबत संशोधन होत आहे. आता जो रस्ता हाती घेण्यात आला आहे, तो यशस्वी झाल्यानंतर अशाच प्रकारचे अन्यही रस्ते होणार आहेत. त्यामुळे पुढच्या काही वर्षात संपूर्ण जपानमधील रस्ते हे असेच ऑटोमेटिक झाल्यास आश्चर्य वाटायला नको. हा पहिला ऑटोमॅटिक रस्ता जपानची राजधानी टोकियोला ओसाका या शहराबरोबर जोडणार आहे. हा रस्ता एस्केलेटरप्रमाणे आपोआप वेगाने पुढे जाणार आहे. यावरुन गाड्याही एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जातील, शिवाय अवजड सामानही पाठवले जाणार आहे. (Japan Automatic Roads)

Germany and Denmark

हा ऑटोमेटिक रस्ता तयार करण्यामागचे कारण मात्र आधुनिक जपानची वास्तविकता सांगणारे आहे. कारण जपानची लोकसंख्या झपाट्यानं कमी होत चालली आहे. जी लोकसंख्या आहे, त्यात वृद्ध नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. जपानच्या लोकसंख्येचा स्तर इतका झपाट्यानं खाली येत आहे की, काही वर्षानंतर या देशात तरुणही नावाला उरणार आहेत. या सर्वांचा फटका जपानच्या आर्थिक व्यवस्थेला बसत आहे. जपानमध्ये तंत्रज्ञान कितीही प्रगत होत असले तरी या देशात भविष्यात मनुष्यबळ लुप्त होणार आहे. त्याचे परिणाम आत्तापासून दिसू लागले आहेत. या देशात गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर मिळत नाहीत. त्यातच माल ट्रक चालवू शकणाऱ्या प्रशिक्षित ड्रायव्हर्सची संख्या अगदी कमी होत चालली आहे. जपानमधून मोठ्या प्रमाणात निर्यात होते. पण वाहतुकीच्या अडचणीमुळे निर्यातीवर मर्यादा आल्या आहेत. हा देश पर्यावरणासाठीही अतिशय जागरुक आहे.(Japan Automatic Roads)

डिझेल आणि पेट्रोलच्या अतिरिक्त वापरामुळे ग्रीन हाउस गॅसची समस्या वाढत आहे. या सर्वांचा विचार करुन पर्यायी म्हणून ऑटोमेटिक रस्त्यांची संकल्पना साकार करण्यात आली. हा स्वयंचलित रस्ता या सर्व समस्यांवर एकमात्र उपाय आहे. हा रस्ता २४ तास काम करणारा आहे. मालाने भरलेले कंटेनर या रस्त्यावर ठेवण्यात येणार असून ते कंटेनर आपोआप हलवून ठरवून दिलेल्या ठिकाणी पोहोचतील. हा रस्ता पूर्ण झाल्यावर व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. शिवाय या रस्त्याच्या नियोजित भागात माल ठेवण्यासाठी जागा असेल, तिथे एक टन माल ठेवता येईल. हा स्वयंचलित रस्ता तयार झाल्यानंतर २५ हजार वाहनचालकांची गरज पूर्ण होणार आहे. हा स्वयंचलित रस्ता महामार्गाखाली, जमिनीवर, आणि मोटारींच्या स्वतंत्र मार्गावरही बांधला जाणार आहे. या स्वयंचलित रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विशेष कॉर्डन करण्यात येणार आहे, जेणेकरून कोणीही माणूस किंवा प्राणी त्यावर धडकू शकणार नाही. यासोबतच त्याच्या संचालनासाठी अनेक नियंत्रण कक्षही उभारण्यात येणार आहेत.

================

हे देखील वाचा :  Mirzapur  Season 3 मध्ये होणार पंचायतमधील या स्टारची एण्ट्री, अली फजलने केला खुलासा

================
जपान त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी जगभरात ओळखला जातो. जपानी इलेक्ट्रॉनिक उत्पादनांचा जागतिक बाजारपेठेत इतर देशांपेक्षा मोठा वाटा आहे. जपानमध्ये फुजी आणि सोनी सारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. टोयोटा, होंडा, निसान, माझदा, मित्सुबिशी, सुझुकी आणि सुबारू याही जगातील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपन्याही या देशात आहेत. आता याच देशात स्वयंचलित रस्ते सुरु झाल्यास या कंपन्याही आपल्या गाडंयामध्ये आधुनिक बदल करणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.