बहुतांश लोकांच्या घरी वायफाय असतो. अशातच आसपासची लोक सुद्धा तुमच्या वायफायला जॉइन करण्याचा प्रयत्न करतात. खरंतर फ्री वायफाय मिळत असेल तर प्रत्येकजणच जॉइन करणारच.काही लोक वायफायचा पासवर्ड हॅक करण्यास यशस्वी होतात. मात्र असे तेव्हाच होते जेव्हा तुमच्या कनेक्टेड डिवाइसमध्ये वायफाय स्लो होते अथवा व्हिडिओ लोड होण्यास वेळ लागतो. (wifi hack)
अशातच तुम्ही विचार करता की, तुमच्या वायफायच्या स्पीडची समस्या असू शकते अथवा राउटरची समस्या आहे. मात्र हे पाहणे विसरून जातात की, वायफाय हॅक झालेले असू शकते. त्यामुळे समस्या येऊ शकते.
-वायफाय राउटर अथवा फोनचा हॉटस्पॉट, तुमच्या वायफायच्या किती आणि कोणत्या डिवाइसवर कनेक्ट आहे हे जाणून घेण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही.
-तुम्ही वायफाय राउटर किंवा फोनने वायफायला कोणता फोन कनेक्ट आहे हे शोधून काढून तो रिमूव करू शकता.
-यासाठी तुम्हाला तुमच्या वायफाय राउटरमध्ये लॉग इन करावे लागेल. अथवा एखाद्या कंपनीचा राउटर वापरत असाल तरीही सहज चेक करता येईल.
-सिरोटेक,एक्सिटेल, iBall baton, ए्अरटेल राउटर, BSNL, जिओ, टीपी लिंक, डी लिंक अशा काही राउटरचा समावेश आहे. राउटमध्ये लॉग इन करण्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड येतो. होमपेजवर डिफॉल्ट आयपी अॅड्रेस मिळतो.
-वायफायला कनेक्टेट असलेल्या डिवाइस बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुम्ही आपला राउटरचा आयपी अॅड्रेस हा क्रोम ब्राउजरमध्ये सुरु करून लॉग इन करा. (wifi hack)
-त्यानंतर तुम्हाला येथे कनेक्टेड डिवाइस, कनेक्टेड क्लाइंट लिस्ट आणि अटॅच्ड डिवाइसचे ऑप्शन दाखवले जातील. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कनेक्टेड डिवाइसची लिस्ट समोर येईल. तुम्ही त्यामधील काही नावे हटवू शकता. यामुळे तुमचे वायफाय स्लो झाले असेल तर ही समस्या परत होणार नाही.
या व्यतिरक्त अन्य काही ऑप्शन आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या वायफायला कनेक्टेड असलेले डिवाइस शोधून काढू शकता. काही अॅप्स ही यासाठी उपलब्ध आहेत त्याची मदत तुम्ही घेऊ शकता.